Animal Husbandry

शेळींबद्दल जाणून घ्या .शेळी आणि बोकड घ्या एक चालका अर्थशास्त्र तर आहेच,

Updated on 22 April, 2022 1:16 PM IST

शेळींबद्दल जाणून घ्या .शेळी आणि बोकड घ्या एक चालका अर्थशास्त्र तर आहेच, पण त्याचे जीवशास्त्रही विचारात घेणे आवश्यक आहे. बर्‍याच‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍ आपली शेळी कोणत्या जातीची आहे हे माहीत आहे. आपली साधी गावरान शेळी आहे, असे मोघम उत्तर दिले जाते. शेळींच्या जाती आणि प्रजननाचा विचार करणे शेळी पालनाचा कधीही यशस्वी आणि ङ्गायदेशीर होणार नाही. चार-पाच किंवा ङ्गार तर दहा-बारा शेळू पाले देणार्‍यांना ङ्गायद्या-तोट्याचा विचार ङ्गारसा लागत नाही. कारण त्यांच्या शेल्या बिनकर्ची पाल्या जात असतात. काही शेतमजूर आपल्या चार-दोन शेलखिल कामावर जातात. त्या शेळ्या दिवसभर इकडे तिकडे चरतात. त्यांच्या चार्‍यावर खर्चच लागत नाही. 

तो जे काही उत्पन्न तो ङ्गायदाच असतो. अशा लोकांना शेळ्यांची प्रजनन क्षमता, त्यांच्या वास्तवात होणारी प्रगती मुद्द्यांचा विचार करण्याची गरज नाही. अशाप्रकारे चार-दोन दहा-बारा शेळके लोक आपल्या शेळ्यांना किती पिलीत आहेत आणि किती व्हायला पाहिजे याचा कधी विचार करत नाहीत. मग हळु हळु त्यांच्या शेल्यांना होणार्‍या पाटी एकच पिलू व्हायला वापरतात. त्याचे वजनही म्हणावे तसे भरत नाही. बोअर ही शेळ्यांमध्ये सर्वांत जास्त वाढीचा वेग असणारी जात आहे. 

आपल्याकडील वातावरणामध्ये ही जात चांगल्या प्रकारे वाढते. विल्यानंतरचे लहान नर करडाचे वजन 3 किलो, तर मादी करडाचे वजन 2.5 किलो असते. सात महिन्यांच्या नराचे वजन 40 ते 50 किलो आणि मादीचे वजन 45 ते 50 किलो होते. चांगले खाद्य आणि आरोग्य व्यवस्थापन असेल, तर पहिल्या 12 महिन्यांत दररोज वाढीचा वेग 200 ग्रॅम असतो. त्यानंतर 270 दिवसांच्या दरम्यान 250 ग्रॅम प्रति दिन असा वाढीचा वेग असतो.

 या शेळीचा गाभण काळ 148 ते 150 दिवसांचा असतो. 50 टक्के शेळ्या दोन करडे देतात. 

या शेळ्यांची वाढ जास्त असल्याने त्यांच्या वजन वाढीच्या प्रमाणात खाद्य द्यावे लागते. खाद्यामध्ये एक भाग सुका चारा, दोन भग ओला चारा आणि खुराकही द्यावा लागतो. शेळ्यांना पावसाळ्यापूर्वी घटसर्प, ब्रुसेला, लाळ्या खुरकूत, पीपीआर या रोगांच्या नियंत्रणासाठी लसीकरण करणे आवश्‍यक असते. लसीकरण पावसाच्या अगोदर करावे.

 व्यवस्थापन चांगले असेल, तर बोअर जातीच्या शेळ्यांचे जिवंत वजनाच्या 50 टक्‍क्‍यांपर्यंत खाण्यायोग्य मटण मिळते.

      

शेतकरी हितार्थ

विनोद धोंगडे नैनपुर

ता सिंदेवाहि जिल्हा चंद्रपूर

९९२३१३२२३३

English Summary: Know about bor breed goat rearing
Published on: 22 April 2022, 01:10 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)