1. पशुधन

पशुपालन करताय का? अहो मग ही बातमी तुमच्यासाठीच. जाणून घ्या गाईंच्या जाती

1) सहिवाल- स्थानिक नावे: लोला, मोटंगोमेरी, उगमस्थान : ही जात पंजाब आणि पाकिस्तानातील मोटंगोमेरी या जिल्ह्यांमध्ये आढळते. ह्या जातीचे शरीर मोठे, त्वचा सैल, पाय लहान, शिंगे अखुड, असतात. ह्या गाईचा स्वभाव काहीसा आळशी असतो.या जातीच्या नराचे वजन 450-500 किलोपर्यंत असते व मादाचे वजन 300-400 किलोपर्यंत असते. साहिवाल जातीच्या नराच्या पाठीवर मोठे कुबड असते.नराची उंची 136 सेमी पर्यंत असते व मादीची उंची 125 सेमी पर्यंत असते.ह्या गाइंचा रंग लाल आणि गडद भुरा असतो.कधी कधी पाठीवर पांढरे ठिपके पन असतात ही गाय एका वेताला 2150 कि.ग्रॅ एवढे दूध देते. 2)लालसिंधी - स्थानिक नावे - लाल कराची, उगमस्थान - ही जात कराची व हैद्राबाद (सिंध, पाकिस्तान) येथे आढळते. ही जात आकाराने मध्यम असते. शरीरबांधा चांगल असतो. शिंगे जाडजुड असतात, रंग गडद लाल असतो. ही खूप नम्र जात आहे. ही गाय एका वेताला 1475 कि.ग्रॅ. प्रति वेत एवढे दूध देते. 3)गीर- स्थानिक नावे -काठीयावाडी सुरती, डेक्कन, उगमस्थान - गीर जंगल, गुजरात. ही जात आकाराने मोठी, शरीर लयबद्ध कान आकाराने मोठे, चेहरा लांब, रंग हा लाल ते काळसर या वाणात असतो. या गायी 1465 कि.ग्रॅ. प्रति वेत एवढे दूध देतात.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
kind of cow

kind of cow

1) सहिवाल-

स्थानिक नावे: लोला, मोटंगोमेरी,

उगमस्थान : ही जात पंजाब आणि पाकिस्तानातील मोटंगोमेरी या जिल्ह्यांमध्ये आढळते. ह्या जातीचे शरीर मोठे, त्वचा सैल, पाय लहान, शिंगे अखुड, असतात. ह्या गाईचा स्वभाव काहीसा आळशी असतो.या जातीच्या नराचे वजन 450-500 किलोपर्यंत असते व मादाचे वजन 300-400 किलोपर्यंत असते. साहिवाल जातीच्या नराच्या पाठीवर मोठे कुबड असते.नराची उंची 136 सेमी पर्यंत असते व मादीची उंची 125 सेमी पर्यंत असते.ह्या गाइंचा रंग लाल आणि गडद भुरा असतो.कधी कधी पाठीवर पांढरे ठिपके पन असतात

ही गाय एका वेताला 2150 कि.ग्रॅ एवढे दूध देते.

 

2)लालसिंधी -

स्थानिक नावे - लाल कराची,

उगमस्थान - ही जात कराची व हैद्राबाद (सिंध, पाकिस्तान) येथे आढळते. ही जात आकाराने मध्यम असते. शरीरबांधा चांगल असतो. शिंगे जाडजुड असतात, रंग गडद लाल असतो. ही खूप नम्र जात आहे. ही गाय एका वेताला 1475 कि.ग्रॅ. प्रति वेत एवढे दूध देते.

 

3)गीर-

स्थानिक नावे -काठीयावाडी सुरती, डेक्कन, उगमस्थान - गीर जंगल, गुजरात. ही जात आकाराने मोठी, शरीर लयबद्ध कान आकाराने मोठे, चेहरा लांब, रंग हा लाल ते काळसर या वाणात असतो. या गायी 1465 कि.ग्रॅ. प्रति वेत एवढे दूध देतात.

4)थार पारकर-

 स्थानिक नावे -थारी, पांढरी सिंधी,

उगमस्थान- थार पारकर ही जात आकाराने मध्यम, मजबूत बांधा, आखूड मजबूत पाय, लयबद्ध शरीर व शिंगे मध्यम आकाराची असतात. ही गाय एका वेताला 1474 कि.ग्रॅ. एवढे दूध देते.

 

5)देवनी-

स्थानिक नाव -डोंगरपट्टी

उगमस्थान- देवगी, ता. उदगीर, जि. लातूर, वैशिष्ट्ये: या जातीच्या गायी दिसायला गीर जातीच्या गायीसारख्या दिसतात. शरीरबांधा मजबूत, चेहरा लहान असतो व रंग पांढरा व काळपट किंवा लालसर आणि त्यावर पांढरे चट्टे असतात. दूध उत्पादन 1900 कि.ग्रॅ. प्रती वेत देतात. ह्या जातीची बैले मुख्यत्वे जडकामासाठी उपयुक्त ठरतात.

 

गाईच्या दुभत्या व जड कामाच्या जाती-

 

1)हरियाना-

उगमस्थान -पूर्व पंजाब, रोहतकू, हिसार, करणाल व दिल्ली येथे आढळतात. वैशिष्ट्य-शरीरबांधा लयबद्ध, मान उंच, आखूड शिंगे, लांबट चेहरा, लहान कान, कास मोठी, लांब व मजबूत पाय, शेपटी लहान व काळ्या रंगाचा गोंडा आणि गायीचा रंग पांढरा असतो. दूध उत्पदान 1400 कि.ग्रॅ. प्रती वेत.

 

2)ओंगल-

स्थानिक नाव - नेल्लोर

उगमस्थान -ओंगल खोरे (आंध्र प्रदेश),

वैशिष्ट्ये-जनावर आकाराने खूप मोठे, बळकट शरीर, काळपट मोठे, जाड व आखूडशिंगे, रंग पांढरा असतो. जनावरे चपळ असतात. दूध उत्पदान 1255 कि.ग्रॅ. प्रती वेत देतात. ह्या जातीचे बैल मुख्यत्वे जडकामासाठी उपयुक्त ठरतात.

3)कांक्रेज -

स्थानिक नाव- बन्नई, वढेर, नगीर,

उगमस्थान-उत्तर गुजरात, कच्छ,

वैशिष्ट्ये -या जातीच्या गायी वजनाने जास्त, कपाळ मोठे मजबूत बांधा व सरळ पाठ आणि रंग राखेरी काळपट, मध्यम लांबीची शेपटी आणि चालीने संथ असतात. दूध उत्पादन 1333 कि.ग्रॅ. प्रती वेत. ही बैले मुख्यत्वे जडकामासाठी उपयुक्त ठरतात.

 

4)निमारी  -

उगमस्थान - नर्मदा नदीच्या खोऱ्यात मध्यप्रदेश, या जातीच्या गायींचे शरीर हे लांब व पाइ सरळ असते. लांब व कपाळ चपटे असते. शिंगे खूप लांब व विशिष्ट पद्धतीने वाढलेली असतात. रंग लालसर असून त्यावर पांढरे चट्टे असतात. जनावरे खूप चपळ व कामासाठी उपयुक्त असतात. दूध उत्पदान 450 ते 500 कि.ग्रॅ. प्रती वेत.

 

गाईच्या जड कामाच्या जाती-

 

1खिल्लार-

उगमस्थान -महाराष्ट्रातील सोलापूर आणि सातारा ह्या जिल्ह्यात

वैशिष्ट्ये - ही जनावरे घट्ट बांध्याची दंडगोलाकार असतात, शरीराचा रंग करडा पांढरा, चेहरा लांब अरुंद, कपाळ किंचीत बाह्य गोल आकार असा फुगीर असून, दोन डोळ्यांजवळ खाच असते. डोळेबारीक पण रागीट असतात. शिंगे गोलाकार, लांब असून टोकाकडे निमुळती होत जातात. या गायी ९०० ते 1000 कि.ग्रॅ. प्रती वेत एवढे दूध देतात.

 

2)लाल कंधारी-

उगमस्थान -नांदेड जिल्ह्यातील कंधार, मुखेड, बिलोली, देगलूर या तालुक्यात आढळते. वैशिष्ट्ये - ही गुरे लहान ते मध्यम आकारमानाची असून बांधेसूद असतात. शरीराचा रंग फिकट ते गडद लाल रंगाचा असतो. कपाळ रुंद पण फुगीर असते, शिंगे मध्यम आकाराची असून प्रथम बाहेरील बाजूस व नंतर आत वळलेली असतात. कान मध्यम लांबीचे व दोन्ही बाजूस खाली झुकलेले असतात. शरीर लांब व दंडाकृती असते.

 

3)डांगी-

स्थानिक नावे-कलखेरी, सोनखेरी,

उगमस्थान -अहमदनगर, नाशिक (महाराष्ट्र) , ही जात मध्यम आकाराची, त्वचा तेलकट, लहान डोके, आखूड शिंगे, लहान कान व रंग काळा आणि पांढरा असतो. ही जात मुख्यत्वे साळीच्या शेतात व उपयुक्त ठरते.

 

4)हलीकर-

उगमस्थान - कर्नाटक (हसन, तुमकुर),

वैशिष्ट्ये -ही जनावरे मध्यम व घट्ट बांध्याची असतात. शिंगे आणि डोके वैशिष्ट्यपुर्ण आहेत. टोकदार वळलेली वर जाणारी शिंगे, लहान कान असलेल्या या जातीचे बैल शेती व वाहतुकीच्या कामासाठी चांगले असतात.

 

5)अमरीतमहल-

उगमस्थान -कर्नाटक,

वैशिष्ट्ये-लयबद्ध शरीर, मजबूत बांधा, निमुळता चेहरा, लांब शिंगे, मध्यम लांबीची शेपटी व रंग करडा भुरा व डोके, मान आणि बांधा काळा. ही जनावरे खूप चपळ आणि कामासाठी उपयुक्त म्हणून भारतात प्रसिद्ध आहेत.

 

6)

मालवी-

उगमस्थान - माळवा प्रांत ;मध्यप्रदेश,

 वैशिष्ट्ये -भक्कम मजबूत बांधा, रंग करडा, या जातीचे बैल कामासाठी उत्तम आहेत. या गायी 450 ते 500 किलो ग्रॅम प्रती वेत एवढे दूध देतात.

 

7)कृष्णा व्हेली -

उगमस्थान - कृष्णा खोरे (कर्नाटक),

वैशिष्ट्ये - ही जात गीर, ओंगल व स्थानिक म्हैसूर जातीच्या जनावरांचे गुणधर्म असलेली, रंग भुरा, लांब व मजबूत शरीरयष्टी, मजबूत व चपटे कपाळ, कान लांब व लोंबकळते. ही बैले खूप मजबूत व जडकामासाठी उपयुक्त असतात.

 

8)गौळाऊ -

 उगमस्थान - विदर्भातील वर्धा, नागपूर व मध्यप्रदेशात आढळतात.

वैशिष्ट्ये - ही जात ओंगल या जातीसारखी दिसते. ही गुरे रंगाने पांढरीशुभ्र असतात. ही जनावरे हलक्या बांध्याची आणि मध्यम उंचीची असतात. कपाळ फुगीर पण बाह्यगोल भिंगासारखे असते. ही जनावरे जडकामासाठी उपयुक्त असतात. या गायी 1000 कि.ग्रॅ. प्रती वेत एवढे दूध देतात.

 

9)खेरीगर

उगमस्थान - उत्तर प्रदेश

वैशिष्ट्ये -मध्यम आकार, लहान डोके, शेपटी मध्यम लांबीची आणि मजबूत व लांब शिंगे, रंग राखेरी असून बैल खूप चपळ व शेती कामासाठी उपयुक्त ठरतात.

 

संकरित (विदेशी) गायीच्या जाती :

 

1)जर्सी  -या गायीचे मुळस्थान इंग्लिश खाडीतील जर्सी बेट आहे. जर्सी गाई दुधासाठी चांगल्या असून बैल जड कामासाठी उपयुक्त आहेत. विदर्भात या गायींचे संगोपनासाठी शिफारस केली जाते. एका वेताचे दुग्ध उत्पदान 4 हजार किलो असून दुधाची फॅट 4.5% असते.

 

2)होलेस्टीयन_फिजीयन -या जातीचे मुळ स्थान हॉलंड असून दुग्ध उत्पादनासाठी ही जात सर्वोत्तम समजली जाते. शरीर मोठे असून त्यावर काळे, पांढरे मोठे ठिपके असतात. एका वेताला 6 हजार किलो दुध देतात.

 

English Summary: kind of cow Published on: 13 July 2021, 12:14 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters