Animal Husbandry

शरीरात तयार होणारे अनावश्यक घटक तसेच अपायकारक द्रव्ये रक्तातून बाहेर काढणेआणि ते मूत्राद्वारे विसर्जन करण्याचे काम हे मूत्रसंस्थेचे असते.परंतु मूत्रसंस्थेच्या या कामात काही कारणामुळे अडथळा आला तर त्याचे गंभीर परिणाम शरीरावर होतात व या अडथळ्यांना मुतखडा असे म्हणतात.

Updated on 17 November, 2021 12:00 PM IST

शरीरात तयार होणारे अनावश्यक घटक तसेच अपायकारक द्रव्ये रक्तातून बाहेर काढणेआणि ते मूत्राद्वारे विसर्जन करण्याचे काम हे मूत्रसंस्थेचे असते.परंतु मूत्रसंस्थेच्या या कामात काही कारणामुळे अडथळा आला तर त्याचे गंभीर परिणाम शरीरावर होतात व या अडथळ्यांना मुतखडा असे म्हणतात.

मुतखडा मानवाप्रमाणे पशूंमध्ये देखील आढळतो.पशूंमध्ये हा आजार प्रामुख्याने खादयामध्ये असलेल्या ऑक्सीलेट, इस्ट्रोजन आणि सिलिका मुळे होऊ शकतो. तसेच पिण्याच्या पाण्यात जास्त प्रमाणात असलेले क्षार देखील आजारास कारणीभूत ठरतात.जनावरांमध्ये या आजाराची तीव्रता वाढल्यानंतर जनावरे मूत्रविसर्जन योग्य प्रकारे करत नाही व शेवटी शस्त्रक्रियेचा आधार घ्यावा लागतो.या लेखात आपण जनावरातील मुतखडाव त्यावरील उपाय याची माहिती घेऊ.

जनावरातील मुतखड्यावर उपयुक्त असलेल्या औषधी वनस्पती

  • हाडवणी- ही वनस्पती मुतखडा आजारावर उपयुक्त आहे.हाडवणी मध्ये जीवाणू विरोधी गुण असल्याने या वनस्पतीची साल औषधात वापरतात. सालीचे चूर्ण किंवा रस उपचारासाठी वापरतात.
  • पाषाणभेद- ही वनस्पती सर्वत्र आढळते.मुतखडा भेदण्यासाठी ही अतिशय उपयुक्त आहे.
  • सेगमकटी-ही वनस्पती मूत्रसंस्थेच्या बहुतेक आजारांमध्ये उपयुक्त आहे.ही वनस्पती प्रामुख्याने दक्षिण भारतात आढळत असून या वनस्पतीचे मूळ औषधीमध्ये वापरतात.
  • गोरखगांजा- सर्वत्र मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या या वनस्पतीच्या मुळाचे चूर्ण किंवा रस औषधांमध्ये वापरतात.
  • गोखरु- गोखरू ही वनस्पती सर्वत्र आढळते. या वनस्पतीच्या फळाला सराटे असे म्हणतात.हे औषधांमध्ये वापरतात.याचा वापर करत असताना सराटे व्यवस्थित बारीक करून घ्यावेत.कारण हे काटे अन्ननलिका किंवा पोटामध्ये  इजा करू शकता.

( टीप-जनावरांवर कोणत्याही प्रकारचा उपचार करण्या अगोदर पशुवैद्यकाचा सल्ला आवश्य घ्यावा.)

English Summary: kidneystone in animal is very dengerous this plant useful on kidney stone
Published on: 17 November 2021, 12:00 IST