Animal Husbandry

शेळीपालन हा एक फायदेशीर व्यवसाय आहे. शेळी पालन व्यवसाय करण्यासाठी कमीत कमी जागा व खर्चही कमीत कमी लागतो. कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवून देणारा हा खात्रीशीर व्यवसाय आहे. शेळीला गरीबाची गाय म्हटले जाते.शेळीपालनामध्ये शेळ्यांना लागणारे खाद्य त्यांचा निवारा व प्रजननाची व्यवस्थापन या गोष्टी वरपुरेसे लक्ष दिले तर शेळीपालनामध्ये तोटा जास्त करून येत नाही.

Updated on 15 September, 2021 12:27 PM IST

 शेळीपालन हा एक  फायदेशीर व्यवसाय आहे. शेळी पालन व्यवसाय करण्यासाठी कमीत कमी जागा व खर्चही कमीत कमी लागतो. कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवून देणारा हा खात्रीशीर व्यवसाय आहे. शेळीला गरीबाची गाय म्हटले जाते.शेळीपालनामध्ये शेळ्यांना लागणारे खाद्य त्यांचा निवारा व प्रजननाची व्यवस्थापन या गोष्टी वरपुरेसे लक्ष दिले तर शेळीपालनामध्ये तोटा जास्त करून येत नाही.

 या शिवाय शेळ्यांमध्ये  होणारे सर्व सामान्य आजार याबाबतही जागरूक राहणे फार गरजेचे आहे.पावसाळ्यामध्ये शेळ्यांना सहजासहजी खुरसडाआजार होतो. याबाबत या लेखात महत्वाची माहिती घेऊ.

 शेळ्यांमधील खुरसडाआजार

खुरसडा आजार हा जिवाणूमुळे होतो.यामध्ये शेळ्यांच्या पायातील दोन खूरांच्या मध्ये असलेल्या जागेवर जंतुसंसर्ग होतो. यामध्ये सुरुवातीला सूज येते व हळूहळू तो भाग सडायला  सुरुवात होते व शेवटी पायाची खूर निकामी होते.

 या आजाराचे लक्षणे

 आजार झाल्यावर शेळ्या लगडत चालतात आणि जाग्यावर उभे असतील तर ज्यापायाच्या खुराला सूज आहे तो पाय वर उचलून धरतात. तसेच या आजारात शेळ्यांचे वजन झपाट्याने कमी व्हायला लागते.

खुरसड आजारावर करायचे उपाय

  • ज्या शेळ्या पावसाळ्यात चरायला जातात त्यांच्या साठी फुट वॉश चा वापर करावा.फुट वॉश साठी  पोटॅशियम परमॅग्नेट वझिंक सल्फेट च्या द्रावणाचावापर करावा. तसेच शेडच्या प्रवेशद्वाराजवळ दोन टक्के फॉर्मलीन द्रावण वापरावे.शेळ्यांमध्ये या आजाराची लक्षणे असो किंवा नसो तरी वरील उपाय योजना करणे आवश्यक आहे.
  • ज्या शेळ्यानंमध्ये  या आजाराची लक्षणे दिसतात अशा  शेळ्यांना  बाहेर चरायला सोडू नये.अशा प्रादुर्भावीतशेळ्यांना पाणी आणि खाद्य जागेवर द्यावे. कारण चरायला बाहेर गेल्यानंतर खुराला जखम होण्याची दाट शक्यता असते.
  • आजार झाल्यास पशुवैद्यकाच्या सल्ल्याने उपचार करावेत असे बरे झालेल्या शेळ्यांना लगेच चरायला न सोडता तीन ते चार दिवस शेडमध्ये चारापाणी द्यावे. आजार झालेला असल्यास खुराकाचे प्रमाण जास्त वाढविल्यास शेळ्या लवकर बरे होतात.

 

या आजारावरील प्रतिबंधात्मक उपाय

  • शेळ्यांच्या खूर जास्तीचे वाढलेली असतील तर ते वेळोवेळी कापून काढावे.
  • खुराच्या वरच्या बाजूचे केस जास्त वाढलेले असतील तर ते कापून काढावीत कारण यामध्ये घाणजमा होऊन नंतर खुरालासंसर्ग होतो.
  • खुराच्या मध्ये सूज आलेली आढळल्यास त्यावर माशा बसू नयेत किंवा आळ्या होऊ नयेत यासाठी topicure स्प्रे मारावा.
  • उपचार करायच्या अगोदर पशुवैद्यकाचा सल्ला अवश्य घ्यावा.
English Summary: khursad didease in goat take precaution
Published on: 15 September 2021, 12:27 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)