Animal Husbandry

खिल्लार दुधासाठी नाही खिल्लार फक्त खोंडांच्या पैदाशीसाठीच असा बर्याच लोकांचा भयानक गैरसमज आहे.

Updated on 02 March, 2022 1:39 PM IST

खिल्लार दुधासाठी नाही खिल्लार फक्त खोंडांच्या पैदाशीसाठीच असा बर्याच लोकांचा भयानक गैरसमज आहे. खिल्लार गाई जास्त दुध देवुच शकत नाहीत हा दुसरा. 

तर आता थोडं खिल्लारच्या दुधाबाबत..

भारतामध्ये बॉस इंडिकस स्पेसिस मध्ये ३७ गाईंच्या जाती आहेत, ज्या मुळच्या भारतीय आहेत. आणि ७ च्या आसपास जर्सी, एचएफ, सारखे क्रॉस ब्रिड आहेत जे की फॉरेन कंट्रिज मधून इंपोर्ट केले गेले आहेत.

A1/A2 दुधातला फरक, BCM7, alpha beta casin, हे आता जवळजवळ सर्व लोकांना माहीत आहेच. आपल्या सर्वच भारतीय गाई A2 टाईपचं दुध देतात. आणि A2 सगळ्यात सेफेस्ट दुधाचा प्रकार आहे.

आता जर भारतातील सर्वच देशी गाई A2 दुध देतात मग

खिल्लारच का ?

तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 

Khillar is the most smart, agile and aggressive cattle species in the india.

साईंटिफिक स्टडी नुसार दुधाद्वारे आईचे मुड, हेल्थ इशुज्, इंटेलिजन्सि सारखे गुण लहान बाळामध्ये तसेच कॉपी होतात. आणि खिल्लार जगातल्या सर्वात हुषार, चपळ आणि आक्रमक जातींमधली एक आहे. त्यामुळे खिल्लार मध्ये असलेले हे गुण बेशक आपल्याला तिच्या दुधाद्वारे फिड होत राहतात. आणि याचं उदाहरण पहायच असेल तर मराठा सैन्य, स्वराज्याच्या कालखंडामधील मराठा सैन्याच्या चपळतेच, आक्रमकतेच, आणि हुषारी च कारण हे खिल्लार गाईच दुध सांगितल जात होतं, आजून ही बरीच जुनी लोकं हे सांगतात.

( खिल्लार इतकी चपळता, हुषारी आणि आक्रमकता गिर, कांकरेज, हरियाणी, थारपारकर, सिंधी इ. कोणत्याही जातीमध्ये नक्कीच नाही )

 

दुसरं प्रमुख कारण अस की 

खिल्लार महाराष्ट्राच्या सांगली सातारा कोल्हापुर सोलापुर सांगोला या जिल्ह्यांमधल्या खेड्यामध्ये संभाळल जाणारं ब्रिड आहे. आलिकडच्या काळामध्ये हीच खेड्यातली खिल्लार शहरात आली आहे पण पुर्वी तीच्या कमी दुध देण्याच्या क्षमतेमुळं या गाईंना शक्यतो कोण दुधासाठी पाळत नव्हत आणि म्हणुनच आपल्या खिल्लारचा प्रचार आणि प्रसार मर्यादित राहीला पण याच दुख: मुळीच नाही जे झाल ते चांगल्यासाठीच.. मर्यादित असल्यामुळं आपल्या गाईंवर जास्त संशोधनं झाली नाहीत, काही काळापासुन सिमेंन्स् मुळं वंशावळ जरी बिघडली असली तरी बर्याच ठिकाणी जातिवंत खिल्लारच संगोपण केलं गेल/जातय, आपणही करतोय..त्यामुळं खिल्लारच जेनेटिक्स असेल, तिचे मुळ गुणधर्म असतील तिचा रांगडा, राकट, हुषार पणा असेल तो तसाच राहिला आहे. बाकी गिर थारपारकर, राठी, कांकरेज सारख्या गाईंवर संशोधनं झाली त्यांच्या वर दुध वाढीसाठी बरेच प्रयोग झाले 

त्यामध्ये त्यांच मुलत्व त्यांना गमवावं लागल आहे, त्यांना ग्रोथ हार्मोन्स, स्टेरॉईडस्, अल्कोहोल मिश्रीत फिड, एंटिबायोटिक्स दिले जातात यामुळं त्यांची मेंटल आणि फिजीकल हेल्थ बिघडते, त्याचा परिणाम दुध पिणार्यांवर होतो, गाईंच दुधं नक्किच वाढतं पण दुधाची गुनवत्ता ढासळते, त्या गाई न राहता थोडक्यात दुध तायार करायची मशीन बनत जातात. 

दुसर्या बाजुला Every sip of Khillars milk is pure and natural. खिल्लार मध्ये ती गुनवत्ता टिकुन आहे आपण ती टिकवुयात यासाठी पैदाशी वर लक्ष देवू, गाईंच्या आहारामध्ये जास्तित जास्त नैसर्गिक चारा फिड्स देवुयात आणि खिल्लारच्या दुधाची गुणवत्ता जशी आहे तशी टिकवुन ठेवू.

 

खिल्लार मध्ये सर्व बॉस इंडिकस स्पेसिस मध्ये वेगळे वाय क्रॉमोसोमल लिंकेजेस आहेत त्यामुळे खिल्लार मध्ये इंडिकस बरोबर टोरिन कैरेक्टर्स सुद्धा दिसून येतात आणि आपल्याला खिल्लार कडून दोन्हिही गुणधर्म असलेले दुध एकत्रित मिळतं

पुढचा महत्त्वाचा विषय म्हणजे दुधाची फैट, सगळ्या भारत वंशाच्या गाईंची सरासरी फैट ४.५ टक्के ( इंक्लुडिंग गिर साहिवाल कांकरेज हरियाणी) पण खिल्लार ची सरासरी फैट ४.२ टक्के आहे. जितकी फैट कमी तितकं दुध पचायला हलकं, तितक कोलेस्ट्रॉल लेवल वाढायच प्रमाण कमी. कॉलेस्ट्रॉल वाढल्यामुळं काय होतं हे सांगण्याची आवश्यकता नक्किच नाही.. त्याचबरोबर गिर गाईंच्या दुधामध्ये सरासरी प्रोटिन कंटेन्ट हे ३.२ आहे तर खिल्लार च्या दुधामध्ये हेच ३.३ टक्के इतकं आहे. म्हणजे खिल्लारच्या थोड्या दुधामध्येच आपण बाकी गाईंपेक्षा जास्त प्रमाणात प्रोटिन मिळवतो.

 

खिल्लार सर्वात जास्त उष्णता आणि रोग प्रतिकार शक्ती असलेली गाई आहे. ती जास्त ऊष्णतेपासुन जास्त थंडिपर्यंत सहच सर्व्हाईव करू शकते. बाकि गाईंना त्यांच्या मुळ प्रदेशापासुन राज्य बदलून आपल्या इकडं आणलं जातं बरेचदा त्यांचा इकडच वातावरण मैच न झाल्यामुळं म्रुत्यू देखिल होत असतो. खिल्लारच्या काटकपणामुळे तिला शक्यतो कोणताही रोग, आजार होत नाही.

त्याचबरोबर खिल्लार ही सर्वात हायजेनिक प्रजात आहे.

 

शेतीतज्ञ श्री. मनोहरजी खके 

English Summary: Khillar breed dought in khillar breed use for this
Published on: 02 March 2022, 01:39 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)