कामठी: ग्रामीण भागातील (rural areas) लोक मोठ्या प्रमाणात पोळा साजरा करतात. या दिवशी बैलांना (bull) सजवून त्यांची पूजा करून गावातून मिरवणूक (Procession) काढली जाते.
महाराष्ट्रात (Maharashtra) दरवर्षी पिठोरी अमावस्येच्या दिवशी (Pithori Amavasya 2022) बैल पोळा सण (Bull Pola festival) साजरा केला जातो. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैल पोळा हा सण साजरा केला जातो. दरवर्षी प्रमाणे यंदा ही बैलपोळा सण मोठ्या उत्साहाने कामठी करांनी साजरा केला.
1.51 लाखाची बैलजोडी ठरली पोळ्याचे आकर्षण
7th Pay commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा झटका! महागाई भत्त्याबाबत सरकारने दिली ही माहिती...
कामठी गावातील युवा शेतकरी गणेश शिवाजी शिंदे यांची 1.51 लाख रुपयांची बैलजोडी संपूर्ण बैल पोळ्याची आकर्षण ठरली. पांढरा शुभ्र रंग, सारखी जोड आणि डौलदार शरीर असे या बैलांचे वैशिष्ट्ये होते. या बैलांची मिरवणूक काढत असताना फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.
युवा शेतकरी गणेश शिंदे म्हणाले, शेती हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात बैलांवर अवलंबून आहे. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैल पोळा हा सण साजरा केला जातो.
आला रे आला पंजाबरावांचा अंदाज आला; या ठिकाणी पडणार जोरदार पाऊस...
ग्रामीण भागातील लोक मोठ्या प्रमाणात पोळा साजरा करतात. या दिवशी बैलांना सजवून त्यांची पूजा करून मिरवणूक काढली जाते. शेतकऱ्यांच्या जीवाला जीव देणारा आवडता प्राणी म्हणजे त्याचे बैल-राजा आणि सर्जा!
महत्वाच्या बातम्या:
Subsidy On Solar Pump: शेतकऱ्यांचा होणार फायदा! सोलर पंपावर मिळतेय 60 टक्क्यांपर्यंत अनुदान
Tomato Rate: टोमॅटो उत्पादकांचे येणार अच्छे दिन! दर पुन्हा कडाडण्याची शक्यता...
Published on: 27 August 2022, 09:40 IST