सध्या आपण कुकुटपालनाचा विचार केला तर साधारणता परसातील कुक्कुटपालन आता मागे पडत असून आता व्यावसायिक दृष्टिकोनातून कंत्राट पद्धतीने कुकूटपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जात आहे. कुक्कुटपालनाचा विचार केला तर जास्त करून ब्रॉयलर कोंबड्यांचे पालन व्यावसायिक दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणावर होते.
परंतु बरेच जण आर आर, लेगहॉर्न आणि काही जण देशी कोंबड्यांच्या देखील पालन हे व्यावसायिक दृष्टिकोनातून करत आहेत. परंतु यामध्ये मागील काही वर्षांपासून कडकनाथ कोंबडीची जात फार शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरत असून या कोंबडीमध्ये आर्थिक फायदा देण्याची ताकद देखील तेवढीच आहे.
कारण या कोंबडीचे काही गुणवैशिष्ट्ये याला कारणीभूत आहेत. अगदी कमी खर्चामध्ये सुरुवातीला शंभर ते दोनशे कडकनाथ कोंबड्याच्या मदतीने जर कडकनाथ कोंबडीपालन सुरु केले तर नक्की शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो.
नक्की वाचा:Poultry Farming: 250 अंडी देणारी प्लायमाउथ रॉक कोंबडी पाळा; कमी खर्चात मिळणार जास्त नफा
कडकनाथ कोंबडीची ओळख आणि वैशिष्ट्ये
जर आपण कडकनाथ कोंबडीचा विचार केला तर ही जात मध्यप्रदेश राज्यातील झाबुवा जिल्ह्यात आढळते. ही भारतातील एकमेव डार्क मीट चिकन आहे. जर आपण काही संशोधनांचा विचार केला तर पांढऱ्या रंगाच्या चिकनच्या तुलनेत कडकनाथ चिकनमध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण खूप कमी असते.
त्यासोबतच अमिनो आम्लाची पातळी जास्त असते. जर आपण चवीचा विचार केला तर देशी किंवा बॉयलर चिकनच्या तुलनेत हे खूप चवदार असते. आपल्याला माहित आहेच कि कडकनाथ कोंबडीचे मांस, रक्त, अंडी, चोच म्हणजे एकंदरीत सर्व शरीर काळे असते.
यामध्ये प्रथिने मोठ्या प्रमाणात आढळतात व चरबी खूप कमी आहे त्यामुळे हृदय रोगी आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी ही खूप फायदेशीर आहे. आपल्या भारतामध्ये या कोंबडीच्या झेड ब्लॅक, पेन्सिल आणि गोल्डन या प्रमुख प्रजाती आहेत.
झेड ब्लॅक या प्रजातीचे पंख पूर्णपणे काळे असतात तर पेन्सिल कडकनाथचा आकार पेन्सिलसारखा आहे. तर गोल्डन कडकनाथ कोंबडीच्या पंखांवर सोनेरी ठिपके असतात.
नक्की वाचा:Dairy Farming: डेअरी फार्मिंग म्हणजे काय? कशी करावी सुरुवात? कर्ज आणि सबसिडी….
कडकनाथ कोंबडी पालनाचे एकंदरीत आर्थिक गणित
कडकनाथ कोंबडी पालनाच्या माध्यमातून भरपूर कमाईची संधी उपलब्ध होऊ शकते. कडकनाथ कोंबडीची 100 पिल्ले पाळली तर त्यासाठी तीनशे चौरस फूट जागा लागते. त्याचबरोबर 1000 कडकनाथ कोंबड्या साठी एक हजार पाचशे चौरस फूट जागा लागणार.
परंतु यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कडकनाथ कोंबडी पालनासाठी शहराच्या बाहेर किंवा एखाद्या ग्रामीण भागाच्या बाहेर जागा असणे खूप गरजेचे आहे की ज्या ठिकाणी पाणी आणि वीज यांचा पुरवठा चांगला असेल.
तसेच कडकनाथ कोंबड्यासाठी शेडचे बांधकाम करताना पुरेसा सूर्यप्रकाश व हवा जाऊ शकेल अशा पद्धतीने करावे. समजा तुम्ही तीनही जातींची कडकनाथ कोंबडी पालन केलेतर यामध्ये एका जातीची कोंबडी एकाच शेडमध्ये ठेवावी.
खाद्य देताना या कोंबड्यांच्या पिल्लांना आणि कोंबड्यांना अंधारामध्ये किंवा रात्रीत उशिरा खाद्य द्यावे नाही लागत. जर आपण कडकनाथ कोंबडीच्या अंड्याच्या मागणीचा विचार केला तर हे अंड्याची किंमत 50 रुपये असून एक कडकनाथ कोंबडा नऊशे ते हजार रुपये प्रति किलो दराने विकला जातो.
एका दिवसाच्या पिलासाठी आपल्याला 70 ते 100 रुपये मोजावे लागतात. म्हणजे एकंदरीत अंडी आणि कडकनाथ कोंबड्यांची पिल्ले या माध्यमातून जर विचार केला तर खूप चांगल्या प्रमाणात आर्थिक उत्पन्न मिळू शकते.
नक्की वाचा:दूध उत्पादनासाठी म्हशींच्या 'या' 4 जातीं ठरत आहेत फायदेशीर
Published on: 08 September 2022, 06:48 IST