Animal Husbandry

जगात कोरोना नामक महाभयंकर आजार आल्यापासून दिवसेंदिवस बेरोजगारीचा दर उच्चांक गाठत आहे. देशात देखील सर्वत्र मोठ्या प्रमाणात बेरोजगारी निर्माण झाली आहे. यामुळे नव युवकांना उदरनिर्वाह भागवण्यासाठी तारेवरची कसरत पार पाडावी लागत आहे.

Updated on 30 March, 2022 3:52 PM IST

जगात कोरोना नामक महाभयंकर आजार आल्यापासून दिवसेंदिवस बेरोजगारीचा दर उच्चांक गाठत आहे. देशात देखील सर्वत्र मोठ्या प्रमाणात बेरोजगारी निर्माण झाली आहे. यामुळे नव युवकांना उदरनिर्वाह भागवण्यासाठी तारेवरची कसरत पार पाडावी लागत आहे.

यामुळे आज आम्ही शेतकरी पुत्रांसाठी एका शेतीपूरक व्यवसायाची माहिती घेऊन आलो आहोत. यामुळे शेतकरी पुत्रांची नोकरीचे टेन्शन निश्चित हवेतच विरणारं आहे. आज आम्ही आपणास ज्या व्यवसायाविषयी माहिती देणार आहोत तो व्यवसाय सुरू करून कोणीही अल्प कालावधीतच चांगली मोठी कमाई करू शकतो. मित्रांनो आज आम्ही आपणास ज्या व्यवसायाविषयी माहिती देणार आहोत तो व्यवसाय आहे कुक्कुटपालनाचा.

या व्यवसायाची सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या व्यवसायासाठी सरकार देखील मदत करत असते. कुकुट पालनाचा व्यवसाय पाच ते नऊ लाखांच्या दरम्यान सहज सुरू केला जाऊ शकतो. मित्रांनो जर आपण हा व्यवसाय अतिशय छोट्या लेव्हल पासून सुरू केला म्हणजेच कमीत कमी 1500 कोंबड्यांचे संगोपन करून हा व्यवसाय सुरू केला तर या व्यवसायातून महिन्याकाठी 50 हजारपासून ते एक लाख रुपयांपर्यंत सहज कमाई करू शकता.

कुक्कुटपालन व्यवसाय सुरु करण्यासाठी, आपल्याला प्रथम एखादी जागा शोधावी लागेल. यानंतर पोल्ट्री फार्म उभारण्यासाठी सुमारे 5 ते 6 लाख रुपये खर्च करावे लागतील. मित्रांनो जर आपणास 1500 कोंबड्यांचे संगोपन करायचे असेल तर आपणांस यापेक्षा 10 टक्के कोंबड्या अधिक खरेदी कराव्या लागतील. आम्ही आपणास सांगू इच्छितो की या व्यवसायात तुम्ही अंड्यांमधूनही भरपूर कमाई करू शकता.

देशात आता अंड्याचे भाव कमी झाले आहेत कारण की तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. मात्र  उन्हाळा संपताच अंड्याच्या भावात मोठी वाढ होणार आहे. अशा परिस्थितीत अंडी विकून देखील आपण भरपूर कमाई करू शकता. लेयर पॅरेंट बर्थची किंमत सुमारे 30-35 रुपये असते. अशा पद्धतीने आपणास कोंबडी खरेदी करण्यासाठी 50 हजार रुपयांचे बजेट ठेवावे लागणार आहे. याशिवाय त्यांना वाढवण्यासाठी अन्न द्यावे लागणार आणि औषधावरही खर्च करावा लागेल.

वर्षाकाठी किती रुपयांची कमाई- कोंबड्यांना सलग 20 आठवडे आहार देण्यासाठी सुमारे 1 ते 1.5 लाख रुपये खर्च येतो. एक थर पालक पक्षी एका वर्षात सुमारे 300 अंडी घालतो. 20 आठवड्यांनंतर, कोंबड्या अंडी घालण्यास सुरवात करतात आणि वर्षभर अंडी घालतात. 20 आठवड्यांनंतर त्यांच्या खाण्यापिण्यावर सुमारे 3-4 लाख रुपये खर्च होतात. अशा परिस्थितीत 1500 कोंबड्यांच्या पोल्ट्री फार्मपासून वर्षाला सरासरी 290 अंडी प्रत्येकी या हिशोबाने सुमारे 4,35,000 अंडी मिळतात. वाया गेल्यानंतरही 4 लाख अंडी विकता येत असतील तर एक अंडे 3 ते 4 रुपये घाऊक दराने विकले जाते. अर्थातच आपण फक्त अंडी विकून वर्षाकाठी कोंबडी फार्म व्यवसायातून भरपूर कमाई करू शकता.

English Summary: Job tension will be in the air Sons of farmers, this business will make you prosperous
Published on: 30 March 2022, 03:52 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)