पशुपालनामध्ये जनावरांच्या आरोग्य हे खूप महत्त्वाचे असून यावरच पशुपालन व्यवसायातील म्हणजेच प्रमुख्याने दूध व्यवसाय आवलंबून असतो. परंतु बऱ्याचदा आपल्याला जनावरांना नेमका आजार झाला आहे की नाही हे कळत नाही व त्यामुळे उपचारांना विलंब होतो व त्याचे नुकसान पशुपालकांना सहन करावे लागते. जर आपण सध्याच्या परिस्थितीत लंपी या आजाराचा विचार केला तर संपूर्ण भारतात या आजाराने थैमान घातले आहे.
नक्की वाचा:'लम्पी स्कीन'ने दगावलेल्या जनावरांसाठी मिळणाऱ्या मदतीमध्ये बदल; मिळणार इतकी रक्कम
या आजारामुळे अमूल्य अशा पशुधनाचे खूप प्रमाणावर जीवितहानी झाली. युद्धपातळीवर लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेतल्यानंतर आता कुठे या आजारापासून थोडासा दिलासा मिळताना दिसून येत आहे.
या पार्श्वभूमीवर आता एक पशु पालकांना दिलासा मिळेल अशी अपडेट्स समोर आले असून ती म्हणजे आता एक महत्त्वपूर्ण यंत्र विकसित करण्यात आले असून या यंत्राच्या साह्याने तुम्ही तुमच्या गोठ्यातील जनावराने चारा किती खाल्ला, ते जनावर व्यवस्थित रवंथ करते कि नाही किंवा प्राण्याच्या ॲक्टिविटी कशा आहेत इत्यादी बद्दल तुम्हाला माहिती कळू शकेल. या तंत्रज्ञानाबद्दल आपण या लेखात माहिती घेऊ.
पालकांसाठी वरदान ठरेल 'जिओ गौ समृद्धी' उपकरण
रिलायन्स जिओने हे 5G कनेक्टेड उपकरण विकसित केले असून या यंत्राची कार्यक्षमता ही पाच वर्षे असणार असून हे 4 इंच असलेले उपक्रम प्राण्याच्या गळ्यात घंटा सारखे बांधले जाणार आहे. जर आपण एकंदरीत संपूर्ण भारताचा विचार केला तर भारतामध्ये तीस कोटी दुभते पशुधन आहे.
त्यामुळे केवळ 5Gस्पीड आणि कमी लिटन्सीद्वारे एकाच वेळी अनेक प्राण्यांवर बारकाईने लक्ष ठेवता येणे या उपकरणाच्या साह्याने शक्य होणार आहे.
या उपकरणाच्या साहाय्याने तुमच्या गोठ्यातील जनावरांची हालचाल तसेच त्यांनी आहार कधी खाल्ला किंवा पाणी कधी प्यायले, जनावराने किती वेळ रवंथ केला इत्यादी माहिती देखील हे यंत्र शोधत राहील. कारण प्रत्येक शेतकऱ्याला माहिती आहे की प्राणी आजारी जर पडले तर त्याचे रवंथ करणे अर्थात चघळणे कमी होते किंवा थांबते.
प्राण्यांचे अन्न चावणे कमी किंवा थांबत असेल तर हे उपकरण संबंधित पशुपालक शेतकऱ्याला अलर्ट जारी करेल व त्यानुसार प्राण्यांवर उपचार करणे शक्य होईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्राण्याची गर्भधारणेची नेमकी वेळ देखील या उपकरणाच्या मदतीने समजेल. मुकेश अंबानी यांनी या 5G तंत्रज्ञानाला कामधेनु असे म्हटले आहे.
नक्की वाचा:शेतकऱ्यांनो जनावरांच्या आरोग्यात लोहाचा समावेश करा; उत्पादनात होईल वाढ
Published on: 11 October 2022, 02:46 IST