Animal Husbandry

इस्राईलमधील पशुपालनाचे त्रिसूत्री म्हणजे गायीचा शरीराचा ताण कमी करणे आराम वाढविणे आणि शरीर क्रिया सुलभ करणे होय. संतुलित आहार,वेळेवर उपचार, गोठ्यात मुक्तपणे फिरण्याची सोय तसेच उच्च क्षमतेचे स्वच्छता ठेवल्याने इस्राईल होल्स्टिन फ्रिजीयन गाई च्या आरोग्य आणि दूध उत्पादनात चांगले आहे. या लेखात आपण गोठ्याचे इस्रायल व्यवस्थापन,मिल्किंग पार्लरआणि संतुलित खाद्य पुरवठा या बद्दल माहिती घेऊ.

Updated on 22 November, 2021 3:25 PM IST

इस्राईलमधील पशुपालनाचे त्रिसूत्री म्हणजे गायीचा शरीराचा ताण कमी करणे आराम वाढविणे आणि शरीर क्रिया सुलभ करणे होय. संतुलित आहार,वेळेवर उपचार, गोठ्यात मुक्तपणे फिरण्याची सोय तसेच उच्च क्षमतेचे स्वच्छता ठेवल्याने इस्राईल होल्स्टिन फ्रिजीयन गाई च्या आरोग्य आणि दूध उत्पादनात चांगले आहे. या लेखात आपण गोठ्याचे इस्रायल व्यवस्थापन,मिल्किंग पार्लरआणि संतुलित खाद्य पुरवठा या बद्दल माहितीघेऊ.

इस्रायली गोठ्याचे व्यवस्थापन

1-लहान वासरे,भाकड गाई,दुधाळ गाई, पहिलाडू गाई,व्यालेल्या गाई आणि गाभण गाई साठी स्वतंत्र विभाग असतात.

2- शेडची दिशा ही उत्तर-दक्षिण असून गेल्व्हनाईझ पाइपने शेडची उभारणी केलेली असते. उंची 25 ते 30 फूट असल्यामुळे शेडमध्ये खेळती हवा असतं.

3- मुक्त संचार गोठा याच्या दोन्ही बाजूंना गाईंची एक समान संख्या तसेच मुक्त संचार गोठा त्याच्या चहूबाजूंनी लोखंडी तारेचे कुंपण केलेलेअसते.

4- गोठ्याच्या छतावरील सोलर पॅनल मधून वीजनिर्मितीकेली जाते. गोठा थंड ठेवण्यासाठी दर 20 फुटांवर पंखे असतात. तसेच गाईंना थंड ठेवण्यासाठी फॉगर्स द्वारे पाण्याचे तुषार गाईंच्या अंगावर सोडण्यात येतात.

5- दोन्ही गोट्यांच्या मध्यभागी चारा देण्यासाठी तीन फुटांचा गाळा असतो..या ठिकाणी एका ट्रॉली मधून पशु खाद्य मिश्रण सर्व गाईंना योग्य प्रमाणात दिले जातात.

6-प्रत्येक गाईच्या पायाला सेन्सर टॅग असतात.प्रत्येक गाईस उभे राहण्यासाठी तीन चौरस मीटर एवढी क्षेत्रफळ असते.

7-गोठ्यात गाईंना उभे राहण्याची जागा, खाद्य पुरवण्याच्या जागेचा भाग सिमेंट कॉंक्रिटचा किंवा फरशीचा असतो.

-गोठ्यातील जमिनीवरील दगड,फरशी किंवा सिमेंट कोबा इत्यादी भाग गाईंचा शरीर तान वाढवितात. त्यामुळे  गाईंना फिरण्यासाठी आणि आराम करण्याची जागा माती भुसभुशीत ठेवलेली असते.

9-चारा खाल्ल्यानंतर गाई बराच वेळ मुक्त संचार गोठा आरामशीरपणे रवंथ करतात.मोकळ्या जागेत गाईंना पुरेसा दैनंदिन व्यायाम मिळाल्याने शरीरताणआपोआप कमी होतो.गोठ्यात असलेल्या थंड हवेमुळे गाईंच्या दूध देण्याच्या क्षमतेवर वाढ होते.

10-गोठ्यामध्ये शेन,मुत्राचे एकत्र संकलनकरून एका पाईपद्वारेटाकी मध्ये वाहून नेले जाते.या टाकीत प्रक्रिया करून शेतीसाठी वापरले जाते.त्यामुळे गोठ्यामध्ये कुठेही माशा, घाणेरडा वास किंवा अस्वच्छता दिसत नाही.

11-गाईचे कृत्रिम रेतन,पशुवैद्यकीय अधिकारी आणि सहकारी संस्थेमार्फत गाईंची वेळोवेळी आरोग्य तपासणी केली जाते.

मिल्किंग पार्लरची सोय

1-गाईंचे दूध हे मिल्किंग यंत्राद्वारे काढले जाते. यामध्ये फ्लोमीटर जोडल्याने सडातून दूध येण्याचे प्रमाण,सडातून किती वेळात दूध देतेतसेच कासदाह रोगाचे निदान अगोदर करता येते.

2- गाईंना धार काढण्यासाठी पार्लर मध्ये आणायच्या आधी त्यांच्या अंगावर 30 सेकंद थंड पाण्याचा फवारा आणि पुढे 30 सेकंद पंखे चालू करून वारासोडला जातो. त्यामुळे गाईंच्यावर येणारा तापमानाचा ताण कमी होतो व दूध उत्पादन क्षमता वाढते.

3-एकावेळी32 गाईंची धार काढली जाते.तासाला सरासरी 270 गाईंची धार काढली जाते.एका दिवसात तीन वेळा गाईंची धार काढली जाते.

4- यंत्राद्वारे काढलेले दूध पाईपने गोळा करून44 हजार लिटर क्षमतेच्या टॅंक मध्ये गोळा केले जाते.तेथे 48 तासांपर्यंत साठवून ठेवले जाते. हे शीतकरण केलेले दूध प्रक्रिया करणाऱ्या कंपनीकडे पाठवले जाते.

 गाईंचा संतुलित खाद्य पुरवठा

  • हिरव्या चाऱ्याची उपलब्धता कमी असल्याने गाईंना गव्हाच्या काड्या पासून तयार केलेला मुरघास बारीक करून मिक्स राशनच्या स्वरूपात दिला जातो.
  • मिक्स राशन मध्ये मुरघास30 ते 35 टक्के,सरकी पेंड,शेंगदाणा पेंड, सूर्यफूल पेंड भरडलेला मका इत्यादी असे एकूण अकरा खाद्य घटक 65 टक्के
  • टोटल मिक्स राशन देण्याचे यंत्रामध्येफीडट्रोल संगणक प्रणालीचा वापरकेलेला असतो. मुरघास आणि त्यामध्ये मिसळल्या जाणाऱ्या 11 खाद्य मिश्रणाचे प्रमाण संगणक या प्रणालीनुसार टी एम आर वॅगन मध्ये भरून व्यवस्थित मिसळले जातेव त्यानंतर खाद्याचा पुरवठा केला जातो.
  • लहान वासरांना दुधापासून तोडल्यानंतरमिल्क रिप्लेसर चा स्वरूपात कृत्रिम दूध दिले जाते.
  • भाकड गाईंचे योग्य पद्धतीने पालनपोषण केले जाते.(स्त्रोत- ॲग्रोवन)
English Summary: israiel technique in animal husbundery and milk production
Published on: 22 November 2021, 03:25 IST