Animal Husbandry

मत्स्यपालना मध्ये अनेक प्रकारचे व्यवसाय आहेत. मात्र यासाठी मोठी जागा असावी असे अनेकांना वाटते. मात्र तसे काही नाही. मत्स्यपालनासाठी नेहमी मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता नसते.

Updated on 28 June, 2022 1:53 PM IST

 मत्स्यपालना मध्ये अनेक प्रकारचे व्यवसाय आहेत. मात्र यासाठी मोठी जागा असावी असे अनेकांना वाटते. मात्र तसे काही नाही. मत्स्यपालनासाठी नेहमी मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता नसते.

अनेक प्रजाती साठी मत्स्यपालन घरांमध्ये किंवा घराबाहेर असते, त्यामुळे अनेक शेतकर्‍यांनी शेती सोडून हा व्यवसाय स्वीकारण्यास सुरुवात केली आहे.

 लहान प्रमाणात मत्स्यपालन कसे सुरु करावे?

यामध्ये सर्वप्रथम हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की,आपण समान मासे ठेवू शकता, जेणे करून कमी खर्चात अधिक नफा मिळेल. याचा अर्थ तुम्ही एकाच फिश फार्मिंग अर्थात मत्स्य फार्ममध्ये पाण्यात अनेक प्रकारचे मासे वाढवू शकतात.

यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, मत्स्यशेती तील तुमचा चांगला नफा फक्त मत्स्य शेतीचा प्रकार आणि तुम्ही निवडलेल्या माशांच्या प्रजातींचे आधारावर ठरवला जातो.यासाठी लहान स्तरावर मत्स्य पालन कसे सुरु करावे हे माहीत करून घेणे खूप गरजेचे आहे.

नक्की वाचा:नंदीदुर्गा, बिद्री आणि भाखरवाली या शेळ्यांच्या जाती आहेत शेळी पालनासाठी उत्तम, वाचा या शेळ्यांची सविस्तर माहिती

 फिश फार्म म्हणजे काय आणि त्याची वैशिष्ट्ये

1- फिश फार्म ही अशी जागा आहे जिथे माशांचे कृत्रिम रीत्या संगोपन केले जाते.

2- होलिस्टिक फिश फार्मिंग चा एक प्रकार असू शकतो. या प्रकारच्या मत्स्य शेती मध्ये एका तलावात पाच ते सहा जातीचे मासे पाळले जातात.

3- मासेमारी हा मत्स्य शेतीचा भाग आहे. मत्स्यपालन यामध्ये वाढणारे क्रुस्टॅसिअन आणि मोलस्क देखील समाविष्ट आहेत.

4- आगामी काळात मासे हा सागरी खाद्यपदार्थांमध्ये सर्वाधिक खाल्ले जाणारा जलचर प्राणी मानला जाईल.

5- शेतीच्या तुलनेत मत्स्यपालनाचा व्यवसाय तीन पटीने वाढत आहे त्यामुळे लोकांना चांगला नफा मिळत आहे.

6- केज फार्मिंग अर्थात पिंजरे आणि जाळी असलेले तलाव, टाक्यामध्ये मत्स्य पालन केले जाते.

 घरातील आणि बाहेरील मत्स्य पालन कसे करावे?

1-माशांना ऑक्सिजन,ताजे पाणी आणि अन्न आवश्यक असते.

2- जर तुमच्याकडे आधीपासून अस्तित्वात असलेल्या तलावाची जमीन असेल तर तुम्ही ती सुरू करू शकता. परंतु तलाव नेहमी सर्वोत्तम पर्याय नसतात कारण ते बर्‍याचदा खूप खोल असतात त्यामुळे मासे पकडणे कठीण होते.

नक्की वाचा:आता नाही शेततळ्याची गरज, या तंत्राने करा मत्स्यपालन अन कमवा पाचपट अधिक उत्पन्न

3- त्यामुळे तलावांची व्यवस्था चार ते सहा फुटांपेक्षा जास्त खोल नसावी आणि पाण्याचा निचरा करता येईल असा प्रयत्न करावा.

4- इंडोर मत्स्यपालन यामध्ये पक्षी वगैरे जे मासे खातात अशा समस्यांपासून मुक्तता मिळते.

5- इंडोअर अर्थात घरातील मत्स्यपालन यामध्ये पाण्याची इष्टतम गुणवत्ता राखणे सोपे जाते. कारण ते बाहेर घटकांच्या आधीन नसते.

6- यामध्ये तापमान नियंत्रित करणे देखील सोपे जाते.

 इंडोर मत्स्यपालना साठी मूलभूत आवश्यकता

1- ऑक्सिजन- तुम्ही घरामध्ये असाल किंवा घराबाहेर तुम्हाला पाण्याचे पुनरावर्तन किंवा वायूविजन प्रणाली आवश्यक आहे. प्रत्येक टाकी किंवा तलावासाठी तुम्ही वायुवीजन प्रणाली अवलंबली पाहिजे.

2- पाणी- आपल्याला प्रत्येक पृष्ठभागावर किमान पंधरा गॅलन प्रतिमिनिट पाणी आवश्यक आहे. जेव्हा हे पाणी बदलले जाते तेव्हा ते स्वच्छ आणि ताजे असल्याची खात्री करावी.

3- अन्न- सध्याच्या काळामध्ये व्यवसाय खाद्य तसेच माशांचे खाद्य सहज उपलब्ध होते.

नक्की वाचा:Fishary Technology: 'आरएएस' टेक्नॉलॉजी ठरेल मत्स्यपालनासाठी वरदान, 10 पट अधिक मत्स्यउत्पादन शक्य

 इंडोअर आणि आउटडोअर मत्स्यपालन सुरू करण्यासाठी खर्च

 मत्स्य पालना साठी इनडोअर आणि आउटडोअर अर्थात घरात आणि घराच्या बाहेर सेट अप च्या किमती मध्ये बदल संभवतो.

तलाव बांधण्यासाठी तीन हजार ते 10 हजार च्या दरम्यान खर्च येऊ शकतो तसेच इंडोअर अर्थात घरातल्या घरात मत्स्यपालन सुरू करायचे असेल तर टाकी तयार करण्यासाठी तुम्हाला एक हजार ते तीन हजार रुपये खर्च येतो.

English Summary: indoor fishing technology is so profitable ways in fish farming
Published on: 28 June 2022, 01:53 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)