Animal Husbandry

गेल्या काही दिवसांपासून दुधाचे दर वाढत असल्याने शेतकरी काहीसा समाधानी होता. दोन महिन्यांमध्ये तीन वेळा यामध्ये वाढ करण्यात आली होती. यामुळे आर्थिक परिस्थितीत अडकलेल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला होता. असे असताना आता पुन्हा एकदा दुधाचे दर कमी होण्यास सुरुवात झाली आहे.

Updated on 28 May, 2022 2:11 PM IST

गेल्या काही दिवसांपासून दुधाचे दर वाढत असल्याने शेतकरी काहीसा समाधानी होता. दोन महिन्यांमध्ये तीन वेळा यामध्ये वाढ करण्यात आली होती. यामुळे आर्थिक परिस्थितीत अडकलेल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला होता. असे असताना आता पुन्हा एकदा दुधाचे दर कमी होण्यास सुरुवात झाली आहे. आता महिन्याभरात पुन्हा दुधाचे दर घसरण्यास सुरवात झाली आहे. 

दुधाच्या दरात 2 रुपयांनी घसरण झाली असून त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीवर होत आहे. याउलट पशुखाद्याचे दर हे तसेच वाढत आहेत. यामुळे शेतकरी अजूनच तोट्यात चालला आहे. पशुखाद्याचे दर देखील कमी करा अशी मागणी शेतकरी करत आहेत.
याचा थेट शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर होणार आहे.

पशूखाद्याचे दर महिन्याकाठी वाढतच आहेत. दुधाचे दर पडण्यामागे केंद्राची चुकीची भूमिका असल्याचे सांगितले जात आहे. दूध पावडरच्या दरात झालेली घट, तसेच दूध पदार्थाच्या निर्यातीबाबत केंद्राची धरसोड वृत्ती हीच कारणीभूत असल्याचे मानले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना याचा फटका बसत आहे.

यावर्षीही शेती परवडणार की नाही? बियाणांच्या दरात मोठी वाढ, सोयाबीन बॅग मागे 1 हजाराची वाढ

यामुळे दुधाचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करणे गरजेचे झाले आहे. असे झाले नाही तर शेतकरी अजूनच तोट्यात जाणार आहे. दुधाचे दर आता 35 रुपये लिटरहून थेट 32 रुपयांवर येण्याचा अंदाज आहे. तब्बल वर्षभरानंतर दुधाच्या दरात वाढ झाली होती. मात्र ही दरवाढ टिकून राहत नसल्याचे दिसून येत आहे.

महत्वाच्या बातम्या;
अतिरिक्त उसावर आता प्रशासनही हतबल, आता ऊस फडातच राहणार? पहा आकडेवारी
'या' भांड्यामध्ये ठेवा दूध, उन्हाळा असो किंवा पावसाळा तरी खराब नाही होणार
श्रीलंकेनंतर अजून एक देश आर्थिक संकटात, अन्नधान्यही संपले, भारताकडे मदतीची मागणी

English Summary: Increased milk prices looked Center, reduction milk prices wrong policy Center
Published on: 28 May 2022, 02:11 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)