Animal Husbandry

शेतकरी वर्ग शेतीबरोबरच पशुपालन सुद्धा करत असतो. या मध्ये गाई, म्हैस, शेळी, बैल या प्राण्यांचा वापर तो करत असतो. शेतकरी आपली जनावरे जीवापाड जपत असतो. तसेच काहीं शेतकऱ्यांचा तर छंद सुद्धा असतो.बंगळूर मध्ये कृषी मेळाव्याला काल पासून सुरवात झालेली आहे. हा कृषी मेळावा 4 दिवस चालणार आहे. प्रत्येक वर्षी हा कृषी मेळावा कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे नेहमी चर्चेत असतोच. यंदा च्या या कृषी मेळाव्यात कृष्णा नावाच्या या बैलाला चक्क 1 कोटी रुपयांची बोली लागलेली आहे

Updated on 16 November, 2021 11:37 AM IST

शेतकरी वर्ग शेतीबरोबरच पशुपालन सुद्धा करत असतो. या मध्ये गाई, म्हैस, शेळी, बैल या प्राण्यांचा वापर तो करत असतो. शेतकरी आपली जनावरे जीवापाड जपत असतो. तसेच काहीं शेतकऱ्यांचा तर छंद सुद्धा असतो.बंगळूर मध्ये कृषी मेळाव्याला काल पासून सुरवात झालेली आहे. हा कृषी मेळावा 4 दिवस चालणार आहे. प्रत्येक  वर्षी  हा  कृषी  मेळावा  कोणत्या  ना कोणत्या गोष्टीमुळे नेहमी चर्चेत असतोच. यंदा च्या या कृषी मेळाव्यात कृष्णा नावाच्या या बैलाला चक्क 1 कोटी रुपयांची बोली लागलेली आहे.

कृषी मेळाव्यात कृष्णा नावाचा बैल चर्चेत:

बसला ना धक्का, परंतु हे खरे आहे कर्नाटक राज्यातील या कृष्णा नावाच्या बैलाची बोली ही 1 कोटी रुपये लागली आहे. बैलांच्या मालकाच्या म्हणण्यानुसार या बैलाचे सिमेन ची किंमत ही 1 हजार रुपयांच्या पुढे आहे तसेच या सिमेन ला शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात मागणी सुद्धा आहे.या मुळे यंदा च्या कृषी मेळाव्यात हा कृष्णा नावाचा बैल चर्चेचा विषय बनलेला आहे. तसेच मेळाव्यात येणाऱ्या अनेक लोकांनी या बैलांबरोबर सेल्फी सुद्धा काढलेल्या आहेत.

कृष्णा ची बोली 1 कोटी वर कशी पोहचली:-

कृष्णा हा एक देशी गोवंश प्रजातीचा बैल आहे. या प्रजातीचा अंत होत चालला आहे. त्यामुळे कृष्णा चे मालक यांचा देशी जात वाढवण्याचा प्रयत्न आहे. तसेच हा बैल दिसायला देखणा असल्यामुळे व्यापाऱ्यांची नजर याच बैलावर पडली आणि तब्बल कृष्णा ची बोली 1 कोटी वर पोहचली.


या बैलाची विशेष गोष्ट म्हणजे हा बैल केवळ साडे तीन वर्षांचा आहे. तसेच या बैलाचं वजन हे 800 ते 1 हजार किलोपर्यंत आहे आणि या बैलाची लांबी साडेसहा ते 8 फुटांपर्यंत आहे. जर का बैलाची योग्य प्रकारे काळजी घेतली तर या बैलाच आयुष्य हे 20 वर्षांहून जास्त होईल असे सुद्धा या बैलाच्या मालकाने सांगितले आहे.

English Summary: In the agricultural fair held in Bangalore, a bull named Krishna was offered Rs. 1 crore
Published on: 16 November 2021, 11:37 IST