राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत मुरघास बनवण्यासाठी सायलेज बेलर मशीन अनुदान म्हणजेच यामशीन साठी दहा लाख रुपयांचे म्हणजेच 50 टक्के अनुदान दिले जाते केंद्र शासनाने राष्ट्रीय पशुधन अभियान 2022 अंतर्गत सन 2021-2022 या वर्षात दिलेल्या मंजुरी नुसार मुरघास निर्मिती करीतासायलेज बेलर मशीन युनिट स्थापन करण्यासाठी ही बाब राबवली जात आहे.
संस्थेने लाभार्थ्यांची मशिनरीची( सायलेज बेलर, किमान दोन मेट्रिक टन प्रति तास क्षमतेचे हेवी ड्युटी कडबाकुट्टी यंत्र, ट्रॅक्टर व ट्रॉली,वजन काटा, हार्वेस्टर, मशीन, शेड ) खरेदी केल्यानंतर पडताळणी करून निधी संस्थेच्या किंवा लाभार्थ्यांच्या बँक खात्या मध्ये वर्ग करण्यात येईल.
या योजनेत 50 टक्के निधी उपलब्ध
या योजनेच्या माध्यमातून प्रति मुरघास निर्मिती युनिट प्रकल्प खर्च वीस लाख रुपये करिता दहा लाख रुपये ( 50 टक्के केंद्र हिस्सा ) निधी असून उर्वरित 50 टक्के रुपये दहा लाख संस्थेने स्वतः खर्च करायचे आहेत.
सदर योजनेचा लाभ हा जिल्ह्यातील सहकारी दूध उत्पादक संघ/ संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, स्वयंसहाय्यता बचत गट व गोशाळा/ पांजरपोळ संस्था यांना द्यायचा आहे. सदर अर्जाचा नमुना पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी यांच्याकडे उपलब्ध करून देण्यात आला आहे.या योजनेचा लाभ लातूर जिल्ह्यातील सर्वसाधारण प्रवर्गातील सहकारी दूध उत्पादक संस्था / संघ,शेतकरी उत्पादक कंपनी/संस्था,स्वयंसहाय्यता बचत गट व गोशाळा, पांजरापोळ तसेच गोरक्षक संस्था यांना अर्ज करता येईल. या योजनेसाठी संस्थेची निवड करताना याच प्राधान्यक्रमाने निवड करावयाचे आहे. जिल्ह्यातील एका संस्थेला योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
25 जानेवारी 2022 ते 1 फेब्रुवारी 2022 या कालावधीत लाभार्थी निवड….
राष्ट्रीय पशुधन अभियान 2021-22 ( सर्वसाधारण प्रवर्ग) अंतर्गत ( एन एल एम ) मुरघास निर्मिती करिता लातूर जिल्ह्यामध्ये एक सायलेज बेलर मशीन युनिट स्थापनेसाठी दिनांक 25 जानेवारी 2022 ते 1 फेब्रुवारी 2022 या कालावधीत लाभार्थ्यांची निवड प्रक्रियेसाठी अर्ज मागविण्यात येत असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.नानासाहेब सखाराम कदम यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे. या अर्जाचा नमुना पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी(वि)त्यांच्याकडे उपलब्ध करून देण्यात आला आहे.(संदर्भ-मीE शेतकरी)
Published on: 26 January 2022, 10:53 IST