Animal Husbandry

दुधाचा व्यवसाय आपण करत असाल तर आपल्याला दुभत्या जनावराची विशेष काळजी घ्यावी लागते. दुधातील स्निग्धांश हा प्रतवारीच्या दृष्टीने एक महत्त्वाचा घटक आहे.

Updated on 04 August, 2020 4:43 PM IST


दुधाचा व्यवसाय आपण करत असाल तर आपल्याला दुभत्या जनावराची विशेष काळजी घ्यावी लागते. दुधातील स्निग्धांश हा प्रतवारीच्या दृष्टीने एक महत्त्वाचा घटक आहे. दुधाची चव, स्वाद बऱ्याच प्रमाणात दुधातील स्निग्धांश यावर अवलंबून असतो.  दुधाची किंमत स्निग्धांश (फॅट) च्या प्रमाणावर ठरवली जाते. महाराष्ट्रामध्ये गाईच्या दुधात किमान ३.८ तर म्हशीच्या दुधाचा फॅट सहा असणे आवश्यक असते.  त्यापेक्षा कमी फॅट असल्यास ते दूध अप्रमाणित समजले जाते.  त्यामुळे दुधाचा फॅट वाढविण्यासाठीचे उपाय जाणून घेणे गरजेचे आहे.

असा असावा आहार 

जनावरांच्या दैनंदिन आहारात हिरव्या चाऱ्याबरोबर वाळलेल्या वैरणीचा समावेश करावा.  

उसाच्या वाढ्यांचा वापर टाळावा.

 उसाचे वाढे, भाताचा पेंढा, गव्हाचे काड असा निकृष्ट दर्जाचा चारा दिल्यामुळे दूध उत्पादन व दुधातील स्निग्धांश कमी होतात.

गाई-म्हशींना खाद्य म्हणून खाद्यतेलाच्या पेंडी, मका भरडा, तूर हरभरा मूग चुणी भात, गव्हाचा कोंडा इत्यादी योग्य प्रमाणात द्यावे. बारीक दळलेले धान्य किंवा तेल देऊ नये.

या गोष्टी ठेवा लक्षात 

जर आपल्याकडे जास्त दूध उत्पादन देणाऱ्या पण दुधातील स्निग्धांश कमी असणाऱ्या गाई असतील व अधिक उत्पादन यामुळे आपण त्यांचा सांभाळ करत असल्यास त्यांच्या पुढील पिढ्या जर्सी जातीचे रेतन करून तयार कराव्यात. त्यामुळे दूध उत्पादनाबरोबर दुधातील फॅटचे प्रमाण देखील वाढते.  दूध काढण्यातील अंतरसमान असावे. जर सकाळी सहा वाजता दूध काढले तर सायंकाळी सहा वाजता दूध काढावे.  अंतर वाढले तर दूध वाढते पण फॅट कमी होतात. दूध काढताना जनावरांची कास स्वच्छ पाण्याने धुवावी म्हणजे कासेतील  रक्ताभिसरण वाढेल व दुधातील स्निग्धांश यांच्या प्रमाणात देखील वाढ होईल. दूध जास्तीत जास्त सात मिनिटांमध्ये काढावे

दूध काढताना पुरेशी स्वच्छता बाळगावी म्हणजे कासदाह सारखे आजार दुधाळ जनावरांना होणार नाहीत. कासदाह झाल्यास पशु तज्ञांकडून त्वरित उपचार करावेत. दुधाळ जनावरांना शक्य असल्यास मोकळे सोडावे, जेणेकरून त्यांचा व्यायाम होईल. व्यायाम झाल्यामुळे गाईच्या दूध उत्पादनात व फॅटच्या  प्रमाणात वाढ झालेली दिसते. जास्त वयस्कर जनावरे, सातव्या विता च्यापुढे दुधाळ जनावरे गोठ्यात ठेवू नयेत.

English Summary: Improper diet will increase milk fat
Published on: 04 August 2020, 04:42 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)