Animal Husbandry

दूध व्यवसाय मध्ये म्हैस पालनाला खूप महत्त्व आहे. भारतामध्ये जवळजवळ एकूण उत्पादनापैकी पंचावन्न टक्के वाटा म्हशीचा च्या दुधाचा आहे. वाढीव उत्पादनासाठी जातिवंत म्हशी पाळणे फार गरजेचे आहे. त्यामुळे पशुपालकांना म्हशी संबंधी असलेली बारीक-सारीक माहिती असणे आवश्यक आहे.

Updated on 01 January, 2022 5:30 PM IST

दूध व्यवसाय मध्ये म्हैस पालनाला  खूप महत्त्व आहे. भारतामध्ये जवळजवळ एकूण उत्पादनापैकी पंचावन्न टक्के वाटा म्हशीचा  च्या दुधाचा आहे. वाढीव उत्पादनासाठी जातिवंत म्हशी पाळणे फार गरजेचे आहे. त्यामुळे पशुपालकांना म्हशी संबंधी असलेली बारीक-सारीक माहिती असणे आवश्यक आहे.

जर तुम्हीसुद्धा डेअरी व्यवसायाशी संबंधित आहात किंवा म्हशीपालन करू इच्छिता तर तुम्हाला या पाच गोष्टी कायम लक्षात ठेवणे गरजेचे आहे. जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रतीचे दूध उत्पादन मिळून त्यापासून चांगला नफा सुद्धा कमवता येईल. त्यासाठी खालील गोष्टींवर लक्ष देणे गरजेचे आहे.

 म्हैस पालन करताना त्या जातिवंत असणे गरजेचे आहे. जातिवंत असणे त्यांना योग्य प्रकारचा संतुलित आणि पोषक आहार देणे गरजेचे आहे. त्यांच्यासाठी गोठ्याची रचना करताना ती आरामदायक अशी असावी. रोगनियंत्रणासाठी प्रभावीपणे लक्ष देणे गरजेचे आहे तसेच म्हैस प्रजननाच्या बाबतीत उत्तम असावी. पालनातील म्हशी जातिवंत असाव्यात.

 जातीवंत म्हशींची निवड आवश्यक

पशुपालकांना म्हशींची निवड करताना उच्च दर्जाच्या आणि जातिवंत आहे त्याची खात्री करावी. जर जातिवंत नसतील तर त्याचा परिणाम प्रत्यक्ष दूध उत्पादनावर होतो. म्हणून जातिवंत दर्जाच्या म्हशी निवडाव्यात. जसे की मुऱ्हा,जाफराबादी, महेसाना, पंढरपुरी आणि भदावरी इत्यादी जातीच्या म्हशी चांगल्या दर्जाच्या असतात.

त्यातल्या त्यात मुरा जातीची म्हैस दूध उत्पादनासाठी अतिशय चांगले मानले जाते. हिच्या दुधामध्ये फॅटचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे या म्हशीचीकिंमतही जास्त असते. या जातीच्या म्हशी चे वैशिष्ट्य म्हणजे ते कुठल्याही वातावरणात तग धरू शकते. तसेच तिची देखभाल करणे सोपे असते. क्या सामान्यतः पंजाब आणि हरियाणा राज्यांमध्ये जास्त पाळल्या जातात. या जातीची म्हैस गावरान जातीच्या म्हशी पेक्षा दुप्पटदूध देतात. दररोज जास्तीत जास्त 15 ते 20 लिटर दूध मिळू शकते. या म्हशींच्या दुधामध्ये फॅटचे प्रमाण जास्त प्रमाणात असल्याचे आढळून आले आहे.

 संतुलित आहार आवश्यक

 जातिवंत म्हशी असण्याबरोबर त्यांना खायला संतुलित आहार असणेही महत्त्वाचे आहे.

जर म्हशी  साठी असलेले खाद्य उत्तम दर्जाचे असेल तर त्यापासून मिळणारे दूध उत्पादन हे जास्त मिळते हिरवा व कोरडा चारा समप्रमाणात विभागून देणे म्हणजे अभ्यास करून संतुलित आहार असतो. त्याचा उपयोग खाद्यामध्ये जर केला तर वाढीव उत्पादन मिळते.

 चांगल्या प्रजनन क्षमतेच्या म्हशी असणे आवश्यक

 दरवर्षी म्हैसगाभण राहणे आवश्यक असते. जर प्रत्येक वर्षी म्हैसगाभण राहत नसेल तर तिला पशुवैद्यकाकडून उपचार करून घेणे फायद्याचे असते. एवढेच नाही तर म्हशीचे वजन जवळ जवळ 350 किलो ग्रॅम च्या जवळ असावे.

English Summary: importsnt thing apply in milk bussiness for more milk production
Published on: 01 January 2022, 05:30 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)