पावसाळ्यात जनावरांना संसर्गजन्य रोग, आजार होण्याची शक्यता असते. काही आजारामुळे जनावरे दगावण्याची शक्यता असते. यामुळे अशा रोगांना आपण प्रतिबंधक लसीकरण करून होणारे आर्थिक नुकसान टाळू शकतो. संसर्गजन्य किंवा साथीच्या रोगांचा प्रतिबंध करण्यासाठी अशा रोगांची रोगप्रतिकारक शक्ती आपल्या जनावरात आधीच निर्माण करण्यासाठी लसीकरण करणे आवश्यक असते. दरम्यान लसीकरण करताना आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. ते आपण जाणून घेऊ..
लसीकरण करताना घ्यावयाची काळजी
१. लसीकरण करण्यापूर्वी बाह्य परजीवी यांचे निर्मूलन करावे
२. लसीकरण करण्यापूर्वी एक आठवडा अगोदर जंत किंवा कृमिनाशक औषध द्यावे
३. योग्य प्रतिकार शक्ती निर्माण होण्यासाठी आपल्या जनावरांना योग्य पोषक आहार क्षार व खनिजे
यांचे मिश्रण द्यावे
४. लसीकरण हे नेहमी निरोगी व तंदुरुस्त जनावरांमध्ये करावे
५. चांगल्या कंपनीची नामांकित लसच द्यावी
६. लस ही योग्य तापमानाला व योग्य अवस्थेत साठवावी तसेच लसीची वाहतूक करताना योग्य प्रकारे
करावी
७. गाभण जनावरांना लस टोचू नये
८. लस देताना लसीची मात्रा व देण्याची पद्धत तंतोतंत पाळावी
९.सर्व जनावरांना एकाच वेळी लस द्यावी
१०. लसीकरण हे नेहमी दिवसाच्या थंड वेळेतच करावे सकाळी किंवा संध्याकाळी
११. दोन वेगळ्या लस्सी एकत्र करून कधीही देऊ नये
१२. लसीकरणाच्या सुया व सिरींज एस घ्या गरम पाण्याने उकळून घ्याव्यात रसायने वापरू नये
१३. लस टोचलेल्या जागी स्पिरिट किंवा टिंचर आयोडीन चा किंवा कोणत्याही जंतु नाशकाचा वापर करू
नये
१४. पूर्णपणे बर्फा तच ठेवावी जेणेकरून तिची कार्यक्षमता कमी होणार नाही.
१५. शिल्लक राहिलेली लस वापरू नये
१६. लसीचा तपशील म्हणजे स्त्रोत प्रकार बॅच नंबर इत्यादींची योग्य प्रकारे नोंद ठेवावी
१७. लसीकरणानंतर जनावरांना अतिशय कष्टाची कामे करू देऊ नयेत किंवा त्यांना थकवा येईल अशी
कामे लावू नयेत
१८. लसीकरण हे पशुवैद्यकाच्या सल्ल्यानेच करावे
लसीकरणानंतर गंभीर लक्षणे आल्यास कशी ओळखावी
१. लसीकरणानंतर लगेच विचित्र क्रिया येऊ शकते अशावेळी त्वरित पशुवैद्यकाची संपर्क साधावा.
२. लस पोचल्याच्या जागी सूज येणे गरम लागणे दुखणे इत्यादी घटसर्प किंवा पर्याची लस टोचल्यावर दिसू शकतात.
३. काही वेळेस ताप येणे भूक मंदावणे थकवा येणे आणि दुभत्या जनावरांचे दूध उत्पादन घटने इत्यादी लक्षणे दिसू शकतात.
लसीकरणानंतर घ्यावयाची काळजी
१. लसीकरणानंतर सुया व सिरींज एक तास उकळत्या पाण्यात ठेवाव्यात
२. काळपुळी व ब्रुसेला सांसर्गिक गर्भपात या रोगांच्या लसी फार काळजीपूर्वक हाताळावे लागतात कारण त्यांच्या पासून संसर्ग होण्याचा धोका असू शकतो.
गायी म्हशींना कधी करणार लसीकरण
घटसर्प (गळसुजी)
दरवर्षी मे जून महिन्यात पावसाळ्यापूर्वी
एक टांग्या/ फऱ्या
दरवर्षी मे जून महिन्यात पावसाळ्यापूर्वी
तोंडखुरी
दरवर्षी मार्च एप्रिल व नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात
पी पी आर
मे जून किंवा नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात
आंत्रविषार
मे जून महिन्यात
Published on: 19 June 2021, 08:46 IST