गाय किंवा म्हैस गाभण राहते त्यानंतर ती व्याते. व्यायल्यानंतर चिक देते व पाच ते सात दिवसांनी दूध देणे सुरू करते. एक वेत म्हणजे चांगल्या दूध देणाऱ्या गाई मध्ये 305 ते 310 दिवस असतात तर म्हशींमध्ये 270 ते दोनशे 10 दिवस असतात. एकदा गाय किंवा म्हैस व्यायली किती पुन्हा गाभण राहून ज्या दिवशी परत वासरू किंवा रेडकु देते तो कालावधी म्हणजे दोन वेतामधील आंतर असते. दोन वेतांमधील अंतराचा कालावधी हा गाईंमध्ये 12 ते 13 महिन्यांचा असतो तर म्हशीमध्ये 13 ते 14 महिन्याचा असतो.
विण्याच्या अगोदर गायीच्या कासेला पंचेचाळीस दिवस विश्रांती मिळाली पाहिजे. त्यासाठी तिला संपूर्णपणे आटवली पाहिजे. आटवताना पाणी, खुराक, हिरवा चारा हळूहळू कमी करावा. तिच्या काशेत सडाच्या ट्यूबाभराव्यात. त्यामुळे कास एकदम आकुचित होते.मग तिचा आहार पुन्हा पहिल्यासारखा सुरू करावा. या 45 दिवसांचे साधारणपणे तीन भाग पडतात. पहिल्या दहा दिवसात कासची काळजी घ्यावी. तिला आतून बाहेरून कोणत्याही प्रकारची इजा होऊ देऊ नये. त्यानंतरच्या 30 दिवसात तिला पचनीय आहार व व्यायाम मिळेल हे पाहावे.
म्हणजे गर्भाशयातील वासराचे वजन वाढते. 20 दिवसांच्या अंतराने कृमी / जंतुनाशक औषधांच्या दोन डोस दिला द्यावेत. गाईच्या किंवा म्हशीच्या नख्या चांगल्या घासूनवा कापून सरळ काटकोनात कराव्यात. व्याय च्या अगोदर त्यांना संतुलित आहार द्यावा.
विना अगोदरच्या पाच दिवसात त्यांना जास्तीत जास्त स्वच्छ ठेवावी. त्यांना निसरड्या,जास्त उताराच्या, खड्डे असलेल्या जागी बांधणे,डोंगर, टेकड्या अशा जागी पाठवणे योग्य नाही.
त्यांच्या बसण्या उठण्याच्या जागेवर गवताच्या, उसाच्या चीपाड्यांची, गव्हाच्या काडाची,पेंड्याची किंवा अन्य सामग्री वापरून गादी करावी. तसेच त्यांना अत्यंत हलका आहार द्यायचा प्रयत्न करावा.
व्यायल्यानंतर पंचावन्न दिवसात गाय किंवा म्हशीला पौष्टिक आणि संतुलित आहार मिळाला पाहिजे. या दिवसात तिचे गर्भाशय पूर्वस्थितीत येऊन परत माजचक्र सुरू करण्याच्या तयारीत आणणे महत्त्वाचे असते. तिच्या गर्भाशयातून दहा ते बारा दिवस येणाऱ्या स्त्रावामुळे तिच्या शेपटीचा भाग घेऊन, निर्जंतुक रसायने वापरून दररोज स्वच्छ ठेवावा. त्यामुळे गर्भाशयाला इजा होत नाही.
Published on: 22 September 2021, 07:44 IST