गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणावर लम्पी रोगाचा प्रभाव वाढत आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामध्ये अनेक गाई मृत्यूमुखी पडल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. जालना येथील बदनापूर तालुक्यातील रोषणगाव येथे एक घटना समोर आली आहे. रोषणगाव येथे लम्पी संसर्गजन्य (Lumpy Disease) आजारामुळे 16 जनावरे दगावली आहे.
जिल्हा प्रशासनातील जबाबदार अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या गावाकडे पाठ फिरवत बहिष्कार टाकला असल्याचा आरोप करत, संतप्त शेतकऱ्याने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना रक्ताने लिहिलेले पत्र पाठवून मदतीची मागणी केली आहे. यामुळे आता तरी प्रशासन याठिकाणी लक्ष देणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जालना जिल्ह्यात 50 जनावरांचा या संसर्गजन्य आजाराने मृत्यू झाला आहे. त्यातील 16 जनावरे एकट्या रोषणगावातील असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे ग्रामस्थांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रक्ताच्या पत्राद्वारे माहीती दिली आहे. रोषणगावात गावात एकूण 749 जनावरे आहेत. यामध्ये 201 जनावरे लम्पी आजाराने बाधित आहेत, तसेच १६ जनावरे दगावली आहेत.
FRP पेक्षा जास्त दर, 'या' कारखान्याचे राज्यात कौतुक, शेतकऱ्यांना सुखद धक्का..
गटविकास अधिकाऱ्यांसह ग्रामसेवकाने रोषणगाव ग्रामपंचायतीवर बहिष्कार टाकल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे .त्यामुळे या सर्व प्रकाराची चौकशी करून सरकारने ग्रामस्थांना न्याय द्यावा, अशी मागणी शेतकरी कृष्णा एकनाथ खरात यांनी स्वतःच्या रक्ताने लिहिलेल्या पत्राद्वारे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
IoTechWorld Avigation 100% स्वदेशी ड्रोन बनवणार, शेतकऱ्यांना मिळणार फायदा, किंमतही येणार मापात
ग्रामसेवक महिनाभर गावात आलेच नाही. याबाबत त्यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे गावकऱ्यांनी तक्रार केली असता ग्रामसेवक आणि गटविकास अधिकारी संघटनांनी गावावर बहिष्कार टाकला. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यामुळे आता तरी सरकार याकडे लक्ष देणार का याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या;
रब्बी पिकाच्या पेरणीपूर्वी मागणीपेक्षा डीएपी ४४ टक्के कमी आणि युरिया २८ टक्के कमी, शेतकरी चिंतेत
कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक, केले कांदा बाजार सत्याग्रह तिरडी आंदोलन
शेतकरी का तोट्यात जातोय? औषधे आणि कीडनाशकांच्या किमतीवर लावलाय 18 टक्के जीएसटी
Published on: 13 October 2022, 10:20 IST