शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो हे आपल्याला माहिती आहे. पशुपालनामध्ये सगळ्यात जास्त आवश्यकता असते ती चाऱ्याची होय. कारण पशुपालकांचा सगळ्यात जास्त खर्च हा जनावरांच्या चारा व्यवस्थापनावर होतो. जनावरांना चाऱ्याची उपलब्धता व्हावी यासाठी शेतकरी वेगवेगळ्या प्रकारच्या चाराची लागवड करतात.
परंतु बऱ्याच शेतकऱ्यांची समस्या असते की त्यांचा पशुपालनाचा आवाका मोठा असतो परंतु त्यामानाने त्यांच्याकडे उपलब्ध चारा लागवडीसाठीचे क्षेत्र कमी असते व असे पशुपालक हे चारा विकत घेऊन जनावरांची आहाराची गरज भागवतात.
म्हणून यापार्श्वभूमीवर जर आपण काही चारा पिकांची लागवड करून त्यांच्या विक्री माध्यमातून चांगला पैसा कमावू शकतो.
सुपर नेपियर गवत एक पौष्टिक चारा
जर आपण या गवताचा विचार केला तर हे मूळचे थायलंड या देशातील असून आता आपल्याकडे देखील मोठ्या प्रमाणात याची लागवड केली जाते. पशुपालकामध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय असल्यामुळे सुपर नेपिअर लागवडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळणे शक्य आहे.
काही ठिकाणी जवळ-जवळ सात ते आठ एकर जमिनीत सुपर नेपियर लागवडीच्या माध्यमातून शेतकरी बंधू लाखो रुपये प्रति महिन्याला कमवत आहेत. विशेष म्हणजे हे कमी पाण्यात येणारे पीक असून दुष्काळग्रस्त पट्ट्या देखील याची लागवड केली जाऊ शकते.
पशुखाद्य म्हणून याचा खूप उपयोग होतो.सुपर नेपियर गवताचे उत्पादन हे वर्षभर सुरु राहत असल्यामुळे डेरी मालकांना हिरवा चारा पशुसाठी वर्षभर उपलब्ध होतो.जर आपण याच्या उत्पादनाचा विचार केला तर एकदा लागवड केल्यानंतर सात ते आठ वर्ष यापासून उत्पादन मिळत राहते.
यामध्ये क्रमाक्रमाने त्याची कापणी केली जाते व दुसर्या बाजूने शेतात एक कलम टाकल्यानंतर दुसरे कलम तयार होत असते. सुपर नेपियर गवत 15 फूट उंच वाढते व यापासून चांगल्या प्रतीचा हिरवा आणि सुका चारा देखील मिळतो.सुपर नेपियर गवताला खर्च कमी असून मात्र त्या तुलनेत उत्पादन जास्त मिळते.
Published on: 08 October 2022, 11:04 IST