Animal Husbandry

पोल्ट्री उद्योग करत असलेल्यांसाठी हिवाळा हा सगळ्यात आव्हानात्मक असा ऋतू आहे. या काळामध्ये कोंबड्यांना विविध प्रकारच्या आजारांनी वेढले जाण्याची दाट शक्यता असते. जरा व्यवस्थित नियोजन केले नाही तर मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते.

Updated on 09 November, 2020 4:42 PM IST


पोल्ट्री उद्योग करत असलेल्यांसाठी हिवाळा हा सगळ्यात आव्हानात्मक असा ऋतू आहे. या काळामध्ये कोंबड्यांना विविध प्रकारच्या आजारांनी वेढले जाण्याची दाट शक्यता असते. जरा व्यवस्थित नियोजन केले नाही तर मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. तरी आपण या लेखात हिवाळ्यात कोंबड्यांचा रोग नियंत्रणासाठी कोणत्या आवश्यक उपाययोजना कराव्यात याविषयीची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

 रोग नियंत्रणासाठी करावयाच्या आवश्यक उपाय-योजना

  • हिवाळ्यामध्ये कोंबड्यांच्या शरिराचे तापमान टिकविण्यासाठी आणि उबदार अन्नासाठी पक्षी जास्त प्रमाणात खाद्य खातात. त्यामुळे त्याचा सरळ परिणाम हा फुड कॉन्जुपशन रेशो( एफसीआर) वाढण्यावर होतो. म्हणजे जास्त खाद्य खाल्ल्यामुळे खाद्यावरील होणारा खर्च हा वाढतो तसेच शरीरात उर्जा तयार करण्यासाठी न लागणारी पोषणतत्वे वाया जातात. यावर उपाय म्हणजे ऊर्जायुक्त खाद्य पदार्थ जसे तेल, स्निग्ध पदार्थ, प्रोटिन्स यांचे प्रमाण वाढवावे व इतर पोषणतत्वांची प्रमाण तितकेच ठेवावे.
  • शेडमधील तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी शेडच्या दोन्ही बाजूस असलेल्या जाळ्यावर पडदे लावावेत. पडदे लावताना ते फक्त रात्रीच्या वेळेस आणि सकाळी नऊपर्यंत असू द्यावेत. वातावरणात थोडीशी उष्णता जाणवू लागल्यानंतर पडदे उघडावेत.
  • शेडमध्ये पुरेशी उब  ठेवण्यासाठी विजेचे बल्ब, शेगडी किंवा ब्रूडर चा वापर करावा.
  • हिवाळ्यामध्ये जर लोड-शेडिंगचा काळ असेल तर शेडमधील तापमान वाढविण्यासाठी जनरेटर, इन्व्हर्टर इत्यादींचा वापर करावा.
  • पक्ष्यांना पिण्यासाठी गार पाणी न देता कोमट पाणी उपलब्ध करावे. त्यामुळे पक्ष्यांच्या शरीरातील ऊर्जा टिकविण्यास मदत होते.
  • बऱ्याच वेळा शेडमध्ये पाणी सांडून खालचे बेड म्हणजेच लिटर्स ओले होते. त्यामध्ये जर आद्रता वाढून आळ्या निर्माण होतात. त्यासाठी शेडमधील बेड्स म्हणजेच लिटर्स कोरडे ठेवावे. आणि दर तीन महिन्याला जंतनिर्मूलन करून घेणे फायद्याचे असते.
  • कोंबड्यांना आवश्यक असलेले लसीकरण वेळेवर करावे त्यासाठी जवळच्या पशुवैद्यकाची मदत घ्यावी.
  • हवामानात अचानक बदल झाल्यामुळे पक्षांवर ताण येतो. त्यामुळे पक्ष्यांच्या आहारात इलेक्ट्रोलाईट व जीवनसत्वचा वापर करावा. जेणेकरून पक्षांवर येणारा ताण कमी होईल.पडदे जर जास्त वेळ बंद ठेवले तर शेडमध्ये अमोनिया तयार होऊन त्याचा परिणाम कोंबड्यांच्या आरोग्यावर होऊ शकतो.
English Summary: How to take care of hens in the shed in winter, read the full information
Published on: 09 November 2020, 04:41 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)