देशात तसेच राज्यात अनेक अल्पभूधारक शेतकरी मोठ्या प्रमाणात पशुपालन करतात. पशुपालन मुख्यता दुग्धव्यवसायासाठी केले जाते. अलीकडे पशुपालन व्यावसायिकदृष्टया केले जात आहे, हा व्यवसाय अनेक शेतकऱ्यांना अतिरिक्त कमाईचे साधन बनले आहे. पशुपालन व्यवसायात जनावरांची काळजी घेणे महत्वाचे असते, पशुसाठी चांगला आहार असला तर या व्यवसायातून चांगली कमाई होते. दुधाळू पशुना चांगल्या क्वालिटीच्या चाऱ्याची बारामाही आवश्यकता असते, पण हिरवा चारा बारा महिने पिकवता येणे अशक्य आहे. त्यासाठी चाऱ्याची साठवणूक करणे महत्त्वाचे ठरते.
जर दुधाळ जनावरांना बाराही महिने हिरवा चारा असेल तर यामुळे दुधाळ जनावरांचे दूध उत्पादन क्षमता वाढते, आणि यामुळे दुग्ध व्यवसाय करणारे पशुपालक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढते. आज आपण हिरवा चारा बारा महिने कसा टिकवला जाऊ शकतो किंवा कसा साठवला जाऊ शकतो याविषयी जाणून घेणार आहोत. हिरवा चारा कापून शास्त्रीय पद्धतीने साठवणूक करतात या साठवणूक केलेल्या चाऱ्यालाच मुरघास असे संबोधले जाते.
असा बनवा मुरघास
कोणताही चारा फुलोरा अवस्थेत असताना त्याची कापणी करून दोन महिने कालावधीसाठी एका खड्ड्यात दाबला जातो, त्यावर नैसर्गिक अशी रासायनिक प्रक्रिया घडून चारा आंबतो आणि असा चारा दीर्घकाळ हिरवा ठेवला जाऊ शकतो. या आंबवलेल्या चाऱ्याला मुरघास म्हटले जाते. मुरघासमध्ये हिरव्या चाऱ्यासारखेच पोषकघटक असतात, तसेच मुरघास चवीला देखील उत्कृष्ट असल्याचे सांगितले जाते. शिवाय मुरघास जनावरांना बाराही महिने दिला जाऊ शकतो यामुळे जनावरांना हिरवा चारा प्रमाणेच पोषक घटक बाराही महिने मिळत राहतील. मुरघास बनवण्यासाठी सर्वात आधी आपणास एक खड्डा खोदावा लागेल, मुरघास साठी लागणारा खड्डा आपण आपल्या आवश्यकतेनुसार छोटा किंवा मोठा बनवू शकतात, मात्र खड्ड्याची उंची रुंदी पेक्षा जास्त असायला हवी.
खड्डा हा अशा जमिनीत खोदला गेला पाहिजे, ज्यात पाण्याचा चांगला मित्रा होत असेल. शिवाय जमीन कडक असायला हवी. मुरघास बनवण्यासाठी खड्डा हा उंचीवरील ठिकाणी खोदला गेला पाहिजे. खोदलेल्या खड्ड्यात चारी बाजूंनी बांधकाम करून, आतून प्लास्टर केले गेले पाहिजे. ज्या हिरव्या चाऱ्याचे मुरघास बनवायचे असेल तो चारा कापून साधारणत एक दिवस उन्हात वाळू द्यावा. मित्रांनो मुरघास अशा चाऱ्याचा बनवला जातो ज्यात 60 टक्के ओलावा असतो. त्यामुळे चारा हा पूर्ण चुकलेला नसावा त्यात ओलावा आवश्यक आहे. आंबट-ओला सुकलेला चारा कुट्टी सारखा बारीक कापून घ्यावा.
मुरघासमध्ये पोषक घटक वाढवण्यासाठी खड्ड्यात कापलेला चारा टाकताना दोन टक्के युरियाची द्रावण प्रत्येक थरावर शिंपडावे. कापलेल्या चाऱ्याने जेव्हा खड्डा पूर्णपणे भरेल तेव्हा तो हवा बंद करणे गरजेचे असते. आपण खड्डे हवा बंद करण्यासाठी चारा खड्ड्यात व्यवस्थित दाबून त्यावर पालापाचोळ्याचा तीन-चार फुटापर्यंत चर लावू शकता, पाला पाचोळ्यावर शेणाने सारवून खड्डा पूर्णपणे हवाबंद करून टाकावा. दोन महिन्यानंतर खड्ड्याची एक बाजू मोकळी करावी आणि दूषित वायू बाहेर जाऊ द्यावा. त्यानंतर मुरघास हा तयार होतो आणि तो जनावरांसाठी दिला जाऊ शकतो.
Published on: 29 December 2021, 11:07 IST