शेळी पालन हा एक फायदेशीर व्यवसाय आहे. अगदी कमी जागेत आणि कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवून देणारा व्यवसाय म्हणून याकडे पाहिले जाते. परंतु शेळीपालनासाठी शेळी विकत घेताना ती चांगल्या गुणधर्माचीअसावी तसेच तिचे वय हे 1 ते 3 वर्ष असेल तर शेळीपालनासाठी योग्य राहते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शेळीपालनासाठी शेळीची निवड करतांना आपला मुळ हेतू कोणता आहे हे सगळ्यात अगोदर लक्षात घ्यायला हवे.
म्हणजे मांस उत्पादनासाठी शेळी पालन करायचे असेल तर जन्मताच जास्त वजनाची करडे देणारी, एका वेतामध्ये अधिक करडे देणारी शेळ्यांची निवड करावी.या लेखात आपण शेळी विकत घेताना तिचे वय कसे ओळखावे हे पाहणार आहोत.
शेळी घेताना शेळी चे वय कसे ओळखावे?
- सगळ्यात महत्त्वचे म्हणजे शेळ्यांच्या वरच्या जबड्यात समोरील बाजूस चावण्याचे दात नसतात. त्या जागी कठीण मांसचा भाग असतो. खालच्या जबड्यात समोरील बाजूस एकुण आठ दात असतात .
- करडांना जन्मानंतर काही दिवसात म्हणजे पहिल्या आठवड्यात कालच्या जबड्यात समोरच्या बाजूस दुधाच्या दाताच्या मधल्या तीन जोड्या येतात. चौथी जोडी वयाच्या चौथ्या आठवड्यात येते.दुधाचे दात छोटे व धारदार असतात. हे दात काही काळानंतर पडून कायमचे दात निघतात.
- शेळी 12 ते 14 महिन्याची झाल्यानंतर दुधाच्या दातांची मधील पहिली जोडी पडून पहिल्या पेक्षा मोठे कायमचे दात येतात.
- शेळी 24 ते 26 महिन्यांचे झाल्यानंतर पहिल्या जोडीच्या दोन्ही बाजूस असलेले दुधाचे दात म्हणजेच दुसरी जोडी पडून कायमचे दात येतात.
- शेळी 34 ते 36 महिन्यांचे झाल्यानंतर दुसऱ्या जोडीच्या दोन्ही बाजूस असलेले दुधाचे दात म्हणजे तिसरी जोडी पडून कायमचे दात येतात.
- शेळ्या जेव्हा चार वर्षाच्या होतात तेव्हा तिसऱ्या जोडीच्या दोन्ही बाजूस असलेले दुधाचे दात म्हणजेच चौथी जोडीपडून कायमचे दात येतात.
- जर तुम्हाला शेळ्या स्थानिक बाजारातून किंवा शेतकऱ्यांकडून खरेदी करावयाच्या असल्यास शेळी किंवा बोकड एक ते तीन वर्षे वयोगटातील असणे आवश्यक आहे. बऱ्याचदा स्थानिक बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या शेळ्या या वयस्क असू शकतात. कमी वयाच्या शेळ्या आपण विकत घेतल्या तर आपल्या कळपात जास्त दिवस राहून उत्पन्न देऊ शकतात. म्हणून वर सांगितल्याप्रमाणे ज्यांच्या दातावरून तिचे वय ओळखता आले पाहिजे.
Published on: 21 September 2021, 06:24 IST