जनावरांचे वय ओळखता येणे अनेक अंगानी गरजचे आहे.अन्यथा मोठी फसवणूक होऊ शकते. साधारणतः विचार केला तर जनावरांच्या बाह्य स्वरूपावरून, शिंगांवरील वलयांच्या संख्येवरून आणि जनावरांच्या दातांच्या संख्येवरून त्यांच्या वयाचा अंदाज बांधता येतो. त्यासाठी खालील गोष्टी तुम्हाला मदत करतील.अ) जनावरांच्या बाह्य स्वरूपावरून ओळखा :1) जनावरांचे निरीक्षण केले तर लहान, तरुण आणि म्हातारी जनावरे अशा वयोगटात त्यांचे विभाजन करता येते.2) लहान जनावरे या गटात वासरांचा, तरुण जनावरांमध्ये आकाराने लहान असलेली, अंगात चपळपणा, मऊ व घट्ट कातडी, शरीरावरील केस मऊ व दातांची पूर्ण रचना असणारी जनावरे येतील.3) म्हातारी जनावरे म्हणजे आकाराने मोठी, शांत स्वभावाची, सैल कातडी व दातांची अपूर्ण रचना असलेली होय.
मर्यादा काय?:यामध्ये नेमके वय समजणे कठीण आहे.बाजारात विक्रीकरिता जनावरे पाहिल्यानंतर फजिती होऊ शकते.ब) जनावरांची शिंगे व वलयांची संख्या :1) जनावरांची शिंगे बारकाईने पहिली तर त्यावर वलय स्पष्ट दिसते.2) जनावरांच्या वाढत्या वयानुसार त्यांच्या शिंगांवरील वलयांची संख्या व आकार वाढत जातो.3) तीन वर्षे वयाच्या जनावरांच्या शिंगावर पहिले वलय निर्माण होते.जनावरांचे वय हे (वर्षे)= N+2 (N= शिंगावरील वलयांची संख्या) या सूत्रानुसार वय काढता येणे शक्य आहे.मर्यादा काय?बऱ्याचदा शिंगे रंगविलेली असल्याने जनावरांचे वय ध्यानात येत नाही.अनेकदा शिंगे घासून त्यावर तेल लावले जाते. अशाने शिंगांवरील वलय स्पष्ट दिसत नाही.
जनावरांच्या काही जातींमध्ये शिंगाचा आकार खूप छोटा असतो. यामुळे त्यावर वलय पाहणे अवघड जाते.क) जनावरांच्या दातांवरून : जनावरांच्या दातांवरून जनावरांचे वय ओळखता येते.असे आहे दातांचे सूत्र :दुधाचे दात : कृतंक = 0+0 I r+r I 0+0समोरील दाढा : = 3+3 = 20कायमस्वरूपी दातांचे सूत्र कृतंक : = 0+0सूळ दात : = 0+0 I 3+3समोरील दाढा : 3+3 I 3+3मागील दाढा : = 3+3 = 32 I 3+3 जनावरांच्या दातांची संख्येचा विचार केला तर ते वयानुसार बदलत असतात. वासरांना/ कमी वयाच्या जनावरांना दुधाचे दात असतात. वयस्कर/ मोठ्या जनावरांना कायमचे दात असतात. तसेच कृतंक दातांचा उपयोग जनावरांचे वय ओळखण्याकरिता होतो.कृतंक : गाई-म्हशीच्या खालच्या जबड्यात दात असतात व वाढीप्रमाणे दाताचे मूळ अवस्थेमधून बाहेर येऊ लागते.
5 वर्षे वय : या दातांच्या पृष्ठभागावर गोल तारा निर्माण होतो.नंतर वयवाढीबरोबर त्यांचे रूपांतर चौकोनी ताऱ्यामध्ये होत असते.10 वर्षे वय : या जनावरांमध्ये तारा एका दातामध्ये चौकोनी होतो. तसेच सुळे दातांमध्ये तयार होतात.सोबतच दातांच्या समोरील भागावर असलेले दंतवलक देखील निघून जाते. ही क्रिया व तारा मधला कृतंक 1 दातापासून सुरू होऊन कृतंक 4 पर्यंत पोहोचते.समोरील दाढा व मागील दाढा : या दाढा जबड्यात व दोन्ही बाजूला खाली किंवा वर असतात.समोरील दाढा प्रत्येकी 3 पण आकाराने लहान अशा आसतात.मागील दाढासुद्धा प्रत्येकी 3 पण आकाराने लहान अशा असतात.12 वर्षे वयानंतर जनावरांच्या दातांवरून त्यांचे वय ओळखणे अवघड होऊन जाते.
Published on: 14 June 2022, 01:07 IST