Animal Husbandry

कमी पैसा आणि कमी जागेत व्यवस्थित उत्पन्न देणारा व्यवसाय म्हणजे शेळीपालन. शेळीपालनाला खर्च हा फार कमी लागत असतो, आणि मोठा नफा यातून मिळत असतो. पण हा व्यवसायासाठी व्यवस्थित नियोजन करणे आवश्यक असते. शेळीपालन व्यवसायामध्ये संगोपन व व्यवस्थापनाला करताना असताना शेळ्यांचे आरोग्य अधिक महत्त्वाचे आहे.

Updated on 15 January, 2022 5:05 PM IST

कमी पैसा आणि कमी जागेत व्यवस्थित उत्पन्न देणारा व्यवसाय म्हणजे शेळीपालन. शेळीपालनाला खर्च हा फार कमी लागत असतो, आणि मोठा नफा यातून मिळत असतो. पण हा व्यवसायासाठी व्यवस्थित नियोजन करणे आवश्यक असते. शेळीपालन व्यवसायामध्ये  संगोपन व व्यवस्थापनाला करताना असताना शेळ्यांचे आरोग्य अधिक महत्त्वाचे आहे.

शेळ्यांच्या आरोग्य व्यवस्थपनात निष्काळजीपणा  केल्यास कळपातील शेळ्यांना विविध रोगांची लागण होऊन मृत्यू संभवतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ शकते. दरम्यान आपण आजच्या लेखात आपण शेळ्यांच्या आजार आणि आजारी शेळ्या कशा ओळखाल्या पाहिजेत याची माहिती घेणार आहोत..

हेही वाचा : पाळा ही शेळी आणि कमवा लाखो रुपये

कशी करावी आजारी शेळ्यांची ओळख

  • शेळीची हालचाल कमी होऊन भुक मंदावते.

  • शेळी कळपापासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करते.

  • शेळ्यांच्या लेंड्यांचे प्रमाण कमी होऊन त्या अधिक घट्ट किंवा पातळ होतात.

  • शेळ्यांच्या नाकपुड्या कोरड्या पडतात.

  • पायाला जखम झाल्यास शेळी लंगडते.

  • अंगावरील केस ताठ होऊन त्याची चमक नाहीशी होते.

  • शेळ्यांचे वजन घटते.

याशिवाय शेळ्यांमध्ये अनेक जीवाणुजन्य, विषाणूजन्य तसेच परजीवीमुळे होणारे आजार प्रामुख्याने दिसून येतात. त्याबद्दल  माहिती घेऊया.

1) जीवाणुजन्य आजार

आंतविषार, घटसर्प, फन्या, सांसर्गिक, फुफ्फुसदाह

2) विषाणूजन्य आजार

निलजिल्हा, बुळकांडी (पी.डी आर), मावा

3) एकपेशीय जंतूपासून होणारे आजार

रक्तीहगवन, लाल घलवीचा आजार

4) बाह्य किटकांपासून होणारे आजार

खरूज 

प्रतिबंधात्मक उपाय योजना

  • शेळ्यांना आणि करंड्यांना नवीन उगवलेले ताजे गवत, पाला जास्त प्रमाणात खाऊ घालू नये, लहान करंड्यांना, कोकरांना गरजेपेक्षा दूध पाजू नये.
  • कळपातून बाधित शेळ्यांना तर निरोगी शेळ्यांपासून वेगळे ठेवावे.
  • गोठा व आजूबाजूचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवावा तसेच गोठ्यात जंतूनाशक फवारणी नियमितपणे करावी.
  • साथीच्या काळात शेळ्या बाजारातून आणू नये व आणल्यास पशुवैद्यकांकडून शेळी निरोगी असल्याची खात्री करुन घ्यावी.
  • शेळ्यामधील विविध आजारांचे ताबडतोब पशुवैद्यकांकडून निदान करुन आजारी शेळ्यांचे उपचार करुन घेणे फायदेशीर ठरते.
English Summary: How to identify sick goats if you are raising goats
Published on: 15 January 2022, 05:03 IST