Animal Husbandry

शेळीपालन हा व्यवसाय शेतीला पूरक व्यवसाय म्हणून नावारुपास येत आहे. चांगल्या नियोजनबद्ध रीतीने व्यावसायिक रीतीने जर आपण हा व्यवसाय केला तरी शेळीपालन व्यवसायातून चांगल्या प्रकारची आर्थिक प्राप्ती होऊ शकते.

Updated on 07 October, 2020 3:46 PM IST


शेळीपालन हा व्यवसाय शेतीला पूरक व्यवसाय म्हणून नावारुपास येत आहे. चांगल्या नियोजनबद्ध रीतीने व्यावसायिक रीतीने जर आपण हा व्यवसाय केला तरी शेळीपालन व्यवसायातून चांगल्या प्रकारची आर्थिक प्राप्ती होऊ शकते. या लेखात आपण २१ शेळ्यांच्या(२०+१ बोकड) पासून मिळणारे एकूण नफ्याचे गणित समजून घेणार आहोत.  त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

जर आपल्याला सुरुवातीला २१ शेळ्यांचे म्हणजे २० शेळ्या व १ बोकड पालन करायचे असेल तर सर्वप्रथम आपल्याकडे २० ते ३०  गुंठे जमीन असणे आवश्यक आहे.  त्या २० ते ३० गुंठेमधील तीन ते चार गुंठे जागा ही शेडसाठी पुरेशी असते.  उरलेली जमीन आपण शाळांना लागणारा  हिरव्या चाऱ्यासाठी वापरावी.  हे सूत्र बंदिस्त शेळीपालनासाठी आवश्यक आहे हे लक्षात घेतले पाहिजे. जर २१ शेळ्या २०+१ या सूत्राने शेळीपालन करण्यास सुरुवात करायची असेल तर आपल्याला १५ बाय १५, किंवा १५ बाय २० आकाराचे शेड बांधावी लागेल.  एवढ्या शेडमध्ये या शेळ्यांचे संगोपन आपण उत्तमप्रकारे करू शकतो.

 


शेळ्यांसाठी आवश्यक असलेला चारा

शेळ्यांसाठी जी आपण हिरव्या चाऱ्याची लागवड करणार आहोत त्यामध्ये शेवरी सुबाभूळ, मेथी घास, मका, दशरथ घास, कडवळ इत्यादी साऱ्याचे लागवड करणे आवश्‍यक असते.  उपलब्ध क्षेत्रात वरीलपैकी चाऱ्याची ५ गुंठे, १० गुंठे प्लॉट करणे सोयीस्कर ठरते. शेळीपालनाला सुरुवात करण्याअगोदर हिरव्या चाऱ्याची लागवड करणे आवश्‍यक असते.  कारण जर शेळीपालन सुरुवात केल्यानंतर जर आपण चारा विकत घ्यायचे ठरले तर त्याचा खर्च वाढतो. पर्यायाने शेळीपालन व्यवसाय परवडत नाही. त्यामुळे शेळीपालनाला नियोजन आवश्यक असते.

हेही वाचा : शेळीपालनात बोकडाचे महत्त्व आहे अधिक; जाणून घ्या ! काय आहे फायदा

  शेळीपालनाची सुरुवात

यामध्ये दोन महत्त्वाचे मुद्दे असतात. २० शेळ्यांना होणारा खर्च आणि यामध्ये आपल्याला ठरवायचे आहे की आपला व्यवसाय फायद्यात आहे की तोट्यात.

 


२० + १ शेळीपालनासाठी येणारा खर्च

यामध्ये प्रामुख्याने शेळ्यांचा खरेदी खर्च,  शेड बांधणी खर्च, खाद्य खर्च तसेच औषध उपचारावर आणि लसीकरण होणारा खर्च महत्वाचा हा असतो.

शेळ्यांच्या खरेदीचा खर्च

जेव्हा आपण शेळ्यांची खरेदी करतो ते स्थानिक मार्केटमधून करणे फायद्याचे असते. याचा फायदा असा होतो की आपल्याला कमीत-कमी किंमतीत सुदृढ,  उंच,  लांब असणाऱ्या शेळ्या मिळू शकतात. शेळ्या खरेदी करताना आपण काळजी घ्यावी लागते. शेळी घेताना शेळी ही शेळी तीन- चार महिन्याची गाभण किंवा दोन ते तीन करडांची व्यालेली आहे हे पाहणे गरजेचे असते.   जर आपण दोन करडांची व्यायली शेळी विकत घ्यायचे ठरवले तर त्यासाठी आपल्याला १० ते  १२ हजाराची किंमत द्यावी लागते. पण गणित मांडण्यासाठी आपण एका शेळीची किंमत १२ हजार धरु. त्याप्रमाणे २० शेळ्या घेण्यासाठी २० गुणिले १२ हजार = २ लाख ४० हजार रुपये इतका खर्च येतो.

हा झाला २० शेळ्यांचा खर्च.  नंतर वंश वाढवण्यासाठी आपल्याला चांगला सुदृढ बोकड घेणे गरजेचे असते.  ब्रीडिंगसाठी बोकड हा लागणारच.  ब्रीडिंगसाठी आपण गावरान उस्मानाबादी जातीचा बोकड घ्यायचे ठरवले तर त्याची किंमत अंदाजे १५ हजार रुपयांपर्यंत असेल. शेळीपालनाच्या सुरुवातीला उस्मानाबादी किंवा गावरान शेळ्या घेणे उपयुक्त असते. कारण त्यांची रोगप्रतिकारशक्ती चांगली असल्यामुळे सहसा त्या आजाराला बळी पडत नाहीत.

शेडवर लागणारा खर्च

२१ शेळ्या घेऊन जर आपल्याला शेळीपालन व्यवसाय करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला कमी किमतीत शेड उभारणे आवश्यक आहे. कारण शेडवर केलेले इन्वेस्टमेंट हे अनुत्पादक गुंतवणूक( डेड इन्वेस्टमेंट) आहे. कमीत कमी २१ शेळ्यांसाठी  ५० हजार रुपयांपर्यंतचे शेड उभे करणे फायद्याचे असते. यामध्ये १५  बाय १५  किंवा १५ बाय २० आकाराचे शेड २१ शेळ्यांसाठी पुरेशी असते. आजूबाजूला जाळीचे कुंपण तयार करणे आवश्यक असते.

यंत्रावरील खर्च

शेळ्यांना ओला व कोरडा चारा मिक्स करून खायला देणे आवश्यक असते. त्यासाठी कडबा कुट्टी मशीन आवश्यक असते. कारण त्यामुळे आपण चाऱ्याची कुट्टी करून त्यांना खायला देऊ शकतो.कडबा कुट्टी मशीनची किंमतही १५ हजार रुपये आहे.

शेळ्यांचा विमा

 एखाद्यावेळी आजार, नैसर्गिक संकट कधी कारणामुळे जर काही शेळ्यांचा मृत्यू झाला, तर शेळी पालकाला तोटा येऊ शकतो. त्यासाठी शेळ्यांचा विमा काढणे आवश्यक असते. त्यासाठी आपल्याला साधारणतः ६ हजार रुपये खर्च येतो.

आता आपण लागलेला एकूण भांडवली खर्च पाहू

 शेळ्या खरेदी-  दोन लाख ४० हजार

 बोकड खरेदी- १५ हजार

 शेड खर्च- ५० हजार

कुट्टी मशीन-  १५ हजार

शेळीसाठी विमा-

६ हजार, असा सगळा मिळून एकूण खर्च- ३ लाख २६ हजार हा झाला आपला भांडवली खर्च. आता आपण शेळीपालनातून मिळणाऱ्या उत्पादनाचा विचार करू. साधारण १ शेळी १४ महिन्यात दोनदा व्याते. काही शेळ्या एकावेळी दोन करडांना जन्म देतात. काही शेळ्या तीन करडांना जन्म देतात. जर आपण सरासरीचा विचार केला तर आपल्याला दोन करडे देणाऱ्या शेळ्यापालनासाठी परवडतात. जर शेळी एका वेतात दोन करडांना जन्म देते तर दोन वितात एक शेळी ४ करडांना जन्म देते. जर आपण २० शेळ्यांचा विचार केलात तर प्रति शेळी २ करडे तर १४ महिन्यात दोन वितात एकूण करडे होतात ८०. आपण घेतलेल्या एकवीस शेळ्या( एक बोकड धरून) आणि ८० करडे असा एकूण शेळ्यांची संख्या होते. या शेळ्यांना लागणारा खाद्य खर्च एकवीस शेळ्या ५ रुपये प्रतिदिन प्रति शेळी ३६५ दिवसात खाणाऱ्या खाद्याचा खर्च होतो. ३८ हजार ३२५ रुपये८० करड्यांचा प्रति करडे तीन रुपये प्रति दिवस १२० दिवस होणारा खाद्याचा खर्च होतो- २८ हजार ८०० रुपये.  एकूण खाद्य खर्च होतो- ६७ हजार ७२५ रुपये. करडांचे आपण १२०  दिवस पकडले कारण आपण करडे साधारणतः ५ ते ६ महिन्यात विकतो.

 


शेळ्यांचे लसीकरण खर्च

 शेळ्या आजारी पडतात किंवा पडू नयेत, यासाठी आपण औषध उपचार हो लसीकरण करतो.  त्यासाठी आपल्याला वार्षिक खर्च ६ हजार ते ७ हजार रुपये असतो.

लाईट बिलवरील खर्च

शेळ्यांसाठी शेडमध्ये रात्रीच्यावेळी लाईटची व्यवस्था लागते तसेच कडबा कुट्टी यंत्र चालवण्यासाठी ही लाईट लागते. त्यावरील खर्च हा अंदाज १० हजार लागत असतो.

व्यवस्थेवरील एकूण खर्च

 खाद्य- ६७ हजार

 लसीकरण-  ७ हजार

 लाईट बिल-  १० हजार

एकूण खर्च होतो ८४ हजार रुपये होत असतो.

आता समजून घेऊ नफ्याचे गणित

 आपल्याला मिळणारा नफा हा पाच महिन्यात ज्या करडांची विक्री करणार आहोत, त्यापासून मिळणार आहे. पाच महिने आपण काड्यांचे संगोपन व्यवस्थित केले तर करडांचे वजन सरासरी १८ किलोपर्यंत येते. त्या करडांची विक्री आपण बाजारात करायची ठरवली तर एक करडे ६ हजार रुपये प्रति करड्याची विक्री पकडली तर ८० करडांचे एकूण उत्पन्न होते ४ लाख  ८०  हजार रुपये. दुसरे म्हणजे एकूण शेळ्यांपासून आपल्याला लेंडीखत मिळते. त्यापासून मिळणारे उत्पन्न आपण  दोन लाख  रुपयांपर्यंत मिळू शकते. याची टोटल केली केली तर

 करडांची विक्री-  ४ लाख ८० हजार

 लेंडीखत विक्री- २ लाख

एकूण उत्पन्न निघते ५ लाख रुपये एकूण करडांची विक्री ६-७ महिन्यानंतर केल्याने. आता आपण एकूण उत्पन्नातून शिल्लक नफा काढू. अगोदर आपण खाद्य, लसीकरण यावरचा खर्च वजा करून मिळणारा नफा पाहू. खाद्य लसीकरण यावरचा खर्च होतो एकूण ८४ हजार रुपये होतो. एकूण उत्पन्न झालेल्या ५ लाखामधुन ८४ हजार वजा करू शिल्लक नफा मिळाला एकूण ४ लाख १६ हजार रुपये राहत असतो. आता यातून घेण्यासाठी लागणारा खर्च, शेड बांधणीचा खर्च वजा करायचा आहे. तो होता ३ लाख  २६  हजार रुपयांपर्यंत येतो. एकूण नफा ४ लाख १६ हजार राहिल.

 


महत्वाचे यात विचार करण्यासारखे आहे की, दुसऱ्या वर्षी आपल्याला पूर्ण ४ लाख १६ हजार रुपये नफा मिळतो.  कारण दुसऱ्या वर्षी आपल्याला शेड बांधणीचा खर्च करावा लागणार नाही, त्यामुळे आपण दुसऱ्या वर्षापासून चांगला नफा मिळत असतो.  अशा पद्धतीने २० शेळ्या आणि एक बोकडाचे  पालनातील नफ्याचे गणित समजावून घेतले पाहिजे. अशाच पद्धतीने जर आपण शेळीपालनाचा व्यवसाय तंतोतंत आणि काटेकोर व्यवस्थित व्यवहारशीरपणे केले तर चांगल्या प्रकारे नफा मिळतो.

English Summary: How to earn more money from goat rearing
Published on: 07 October 2020, 03:44 IST