Animal Husbandry

बेरोजगारीची समस्या तसेच नोकरीमध्ये असलेली अनिश्चितता यामुळे युवकांसमोर फार मोठी समस्या उभी राहते. शेतीचा विचार केला तर ही पावसावर अवलंबून असल्याने तिलाही फटका बसत असतो. परंतु आता तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागल्याने आणि सिंचनाच्या सुविधा निर्माण झाल्याने बरेचशे युवक शेती क्षेत्राकडे वळत आहेत. त्यासोबतच शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून पशुपालन, कुकुट पालन सारख्या व्यवसायांकडे तरुण वर्ग वळत आहे. या लेखात आपण शेती व्यवसायाला चांगला जोड धंदा म्हणून आणि कमी खर्चात व कमी जागेत चांगला नफा मिळवून देणारा व्यवसाय बटेर पालन विषयी माहिती घेणार आहोत.

Updated on 24 July, 2021 11:49 AM IST

 बेरोजगारीची समस्या तसेच नोकरीमध्ये असलेली अनिश्चितता यामुळे युवकांसमोर फार मोठी समस्या उभी राहते. शेतीचा विचार केला तर ही पावसावर अवलंबून असल्याने तिलाही फटका बसत असतो. परंतु आता तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागल्याने आणि सिंचनाच्या सुविधा निर्माण झाल्याने  बरेचशे युवक शेती क्षेत्राकडे वळत आहेत. त्यासोबतच शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून पशुपालन, कुकुट पालन सारख्या व्यवसायांकडे तरुण वर्ग वळत आहे. या लेखात आपण शेती व्यवसायाला चांगला जोड धंदा म्हणून आणि कमी खर्चात  व कमी जागेत चांगला नफा मिळवून देणारा व्यवसाय बटेर पालन विषयी माहिती घेणार आहोत.

 काय आहे बटेर पालन?

 जगामध्ये बटेर चा आहारा मध्ये वापर चिकन पूर्वीही सुरू झाल्याचे समजते. जगाचा विचार केला तर युके, तैवान आणि चीन सारख्या देशांमध्ये व्यापारी दृष्टिकोनातून बटेर पालन केले जाते. भारतामध्ये सर्वप्रथम मध्यवर्ती कुक्कुट संशोधन संस्था इज्जत नगर या अग्रणी केंद्रामध्ये अमेरिकेतून बटेर आणण्यात आले व 1972 सालापासून त्यावर महत्त्वपूर्ण संशोधन सुरू करण्यात आले.

जंगलात आढळणारी लाव्ही आपल्या बऱ्याच जणांना माहिती आहे त्यासारखीच जापनीज बटेर ही जात आहे. परंतु ही आकाराने मोठी जात असून प्रतिकूल हवामानामध्ये हे पक्षी चांगल्या प्रकारे टिकाव धरू शकतो. याचे मांस स्वादिष्ट व रुचकर असल्याने याला मागणी चांगली असते. जापनीज बटेर च्या एकूण शरीराच्या दहा टक्के हाडे,  14% त्वचा आणि जवळजवळ 76 टक्के मांसल भाग असतो. त्याची हाडे पापुद्रे सारखी असतात. याच्या माणसांमध्ये उच्च प्रकारचे प्रथिने व जीवनसत्त्वे असून यात कोलेस्ट्रॉल कमी असते. याच्या नर आणि मादी याचा विचार केला तर  नराच्या मानेखाली लालसर भुरा व धुसर रंग आढळतो. तर मादी च्या मानेखाली पोटावर सुरमई पिवळसर छटा असून त्यावर काळ्या रंगाचे ठिपके आढळतात. जर मादीच्या वजनाचा विचार केला तर नारा पेक्षा 15 ते 20 टक्के अधिक असते.

 कसे करावे बटेर व्यवस्थापन?

सर्वसाधारणपणे एक ते चार आठवडे पर्यंत बटेर पक्षांना कृत्रिम दायी द्वारे उष्णता द्यावी लागते. एक दिवसाचा बटर सहा ते सात ग्रॅम वजनाचा असतो. शेडमध्ये पिल्ले येण्यापूर्वी ब्रूडींग शेडचा भाग, पाण्याची भांडी जमिनीवर पसरविण्यात येणारा भुसा किंवा तूस निर्जंतुकीकरण करून घ्यावा. बटेर ची पिल्ले एक आठवडे वयाची असेपर्यंत त्यांना खूप जपावे लागते. कोंबडीच्या जागेचा विचार केला तर एका कोंबडीच्या जागेत आठ ते दहा बटेर सहज राहू शकता. ब्रूडींग अवस्थेत साधारण शंभर व्हाट्सचा बल्प एक चौरस मीटर जागेतउष्णता देण्यासाठी वापरायला हवा. चार आठवड्यांपर्यंत सतत 24 तास उष्णता द्यावी लागते. पहिले तीन आठवडे प्रति पक्षी 80 चौरस सेंटीमीटर  तर चार ते पाच आठवड्यासाठी 120 चौरस सेंटीमीटर जागा आवश्यक असते.

 सर्वसाधारणपणे सहा आठवड्यांपर्यंत एक पक्षी 546 ग्रॅम खाद्य खातो. बटेर पक्ष्याची मादी वर्षांमध्ये 280 अंडी देते. जर अंड्याचा वजनाचा विचार केला तर ते साधारण 12 ग्रॅम एवढे भरते. बटेर पक्षी स्वतःचा अंडी उबवत नाही त्यामुळे गावठी कोंबडी खाली अंडी उबवली जाऊ शकता किंवा मशिनद्वारे ती उबवली जाऊ शकतात.

 

बटेर पक्षाची कॅरी उज्वल प्रजाती

 पोटावर पांढरा पट्टा असलेल्या कॅरी उज्वल चे चौथ्या व पाचव्या आठवड्यापर्यंत 140 ते 175 ग्रॅम वजन असते. अन्य पांढऱ्या रंगाचे बटेर व पांढरे कवचाची अंडी देणारी बटेर अशा जाती आढळतात. या जातीचे अंडी उत्पादन वर्षाला 285 ते 295 एवढे आहे. ही अंड्याची जात म्हणून ओळखली जाते. कोंबडी पालन यापेक्षा बटेर पालन हे त्यांच्या रोगप्रतिकारक शक्ती मुळे फायदेशीर ठरते. तसेच बटेर पक्षांना कोणत्याही प्रकारची लस द्यावी लागत नाही.

 बटेर पक्ष्यांची अंडी उत्पादन हे 45 दिवसात सुरू होते व एका मादीपासून 280 ते 290 अंडी मिळतात. 50 टक्के अंडी उत्पादन आठव्या आठवड्यात मिळते. 26 व्या आठवड्यानंतर अंडी  उत्पादनात होऊ लागते. बटेर ची विष्ठा गाईच्या शेणाच्या तुलनेत चार पट अधिक सकस असते.

 स्त्रोत – प्रहार

English Summary: how to do management bater bird farm management
Published on: 24 July 2021, 11:49 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)