Animal Husbandry

सध्या शेतामध्ये ज्वारीचे पीक असून बऱ्याच प्रमाणात ती कोवळ्या स्वरुपात असते किंवा ज्वारीची कापणी झाल्यानंतर जी ज्वारीची दुरी म्हणतो ती बहुतांशी कापणी झाल्यावर येते.

Updated on 12 April, 2021 2:03 PM IST

सध्या शेतामध्ये ज्वारीचे पीक असून बऱ्याच प्रमाणात ती कोवळ्या स्वरूपात असते किंवा ज्वारीची कापणी झाल्यानंतर जी ज्वारीची दुरी म्हणतो ती बहुतांशी कापणी झाल्यावर येते.

त्यामुळे शेतामध्ये जनावरे गेल्यानंतर त्यांना ज्वारीच्या पिकांजवळ नेल्याने किंवा त्यांना ज्वारीच्या पिकाची आकर्षण होऊन ते खाण्याची इच्छा होऊ शकते, पण असे ज्वारीची कोवळी पिक खाल्ल्याने जनावरांना विषबाधा होऊ शकते. अशा विषबाधेने किरळ लागणे असे म्हणतात.

सायनो जी निक ग्लुकॉयेड नावाचे रसायन ज्वारीच्या कोवळ्या पानांमध्ये तसेच खोडामध्ये आढळून येते. त्याला धुरीन ओळखले जाते.  त्यामुळे जनावरांना विषबाधा होण्यास हे रसायन कारणीभूत ठरते. तसेच हायड्रोसायनिक ऍसिड तसेच प्रसिक ऍसिडचे प्रमाण जास्त असल्याने जनावरे मृत्युमुखी पडण्याची शक्यता असते. शेळ्या, मेंढ्या, गाई, म्हशी यांना ज्वारीची कोवळी पाने खाण्यासाठी दिल्याने ही विषबाधा अधिक वाढते.

   जनावरांना विषबाधा झाली हे कसे ओळखावे

  • ज्वारीची कोवळी पाने, खोड किंवा सायनो जी निक ग्लुकोयेडं ज्या वनस्पतीमध्ये असते अशा वनस्पती खाल्ल्याने जनावरांना लगेच विषबाधा होते.

  • जनावरांच्या नाकातोंडातून खूप फेस येतो.

  • जनावरे अस्वस्थ होतात व त्यांना श्वास घेण्यास त्रास होतो त्यांचा जीव गुदमरतो.

  • स्नायू आकुंचन पावतात व कमजोर झाल्याने जनावरे नीट उभी राहू शकत नाहीत.

  • स्नायूंच्या अर्धांगवायु मुळे, ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे जनावरे दगावतात.

 

अशावेळी उपचार काय करावेत?

 जनावरांनी ज्वारीची कोवळी पाने खाल्ली असतील तर त्यांना तात्काळ पशुवैद्यकीय डॉक्टर कडे तपासणीसाठी घेऊन जावे.जनावरांना विषबाधा झाली हे समजताच तात्पुरता इलाज म्हणून पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने चार लिटर विनेगर वीस लिटर पाण्यात मिसळून जनावरांना पाजावे तेव्हा ताबडतोब मोलॅसिस चे तोंडावाटे दोन डोस द्यावे. हे मिश्रण जनावरांना थोड्या थोड्या प्रमाणात पाजावे. तसेच जनावरांचा फुफ्फुसाचा दाह होणार नाही याची काळजी घ्यावी. पशुवैद्यकीय डॉक्टरच्या सल्ल्याने सोडीयम थायो सल्फेट किंवा सोडियम नायट्रेट या औषधांची इंजेक्शन घ्यावे. त्यामुळे ऑक्सिजन पुरवठा पूर्ववत होतो.

 

प्रतिबंधात्मक उपाय

 जनावरांना ज्वारीची कोवळी पाने खाण्यासाठी देऊ नये किंवा विषारी पाणी असणाऱ्या वनस्पतींच्या जवळ जनावरे चारा खाण्यासाठी फिरकणार नाहीत याची काळजी घ्यावी.

 

 टीप= वरील सर्व उपचार हे पशुवैद्यकीय तज्ञांच्या सल्ल्याने करावेत.

English Summary: How can you save animals from poisoning? Read full information
Published on: 07 April 2021, 08:39 IST