Animal Husbandry

भारतात विविध जातीच्या गायी आणि म्हैशी पाळल्या जातात. नेलोर, ब्राह्मण, मवेशी, गेजरेट मवेशी, आदी जाती भारतात लोकप्रिय आहेत. गायीमध्ये साहीवाल, गीर, राठी, थारपारकर आणि लाल सिंधी या जातींचा समावेश आहे. आज आम्ही आपल्याला सर्वाधिक दूध देणाऱ्या जातींविषयी माहिती देणार आहोत.

Updated on 07 July, 2020 4:50 PM IST

Lal Sindhi)

लाल सिंधी - या जातीच्या गायी पाकिस्तानातील कराचीमध्ये अधिक आढळतात. भारतातील हैदराबाद येथे या गायी मोठ्या प्रमाणात पाळल्या जातात.  लाल सिंधी या गायींना लाल कराची असे म्हटले जाते. या गायी ११०० ते २६०० लिटर पर्यंत दूध देतात.

गिर (Gir)

गिर गायी या गुजरातच्या दक्षिण काठिवाडच्या गिर जंगलात असतात. या गायी राजस्थान आणि महाराष्ट्राच्या परिसरात अधिक आढळतात. या गायींना भदावरी, देसन, गुजराती, सोरठी, काठिवाडी आणि सुरती या नावांनीही ओळखल्या जातात.  गिर गायींची दूध देण्याची क्षमता अधिक असते. या गायींमध्ये रोगप्रतिकारशक्ती अधिक असते.  गिर गाय  गिर गायी एका वासरूला जन्म दिल्यानंतर साधारण ५ हजार लिटर दूध देऊ शकतात. परंतु सामान्य गायी २ ते अडीच हजार लिटर पर्यंत दूध देऊ शकतात.

 

(Sahiwal)

साहिवाल गायी  - या गायींना लोला, लैंबी, बार, तेली, मोंटगोमरी आणि मुल्तानी या नावानेही ओळखल्या जातात. साहीवाल जात ही गायींच्या इतर जातीमधील सर्वात लोकप्रिय आणि चांगली जात आहे.  या गायी साधरण १४०० ते २५०० हजार लिटर दूध एका वेतात देत असतात. या गायी हरियाणा, पंजाब, दिल्ली, आणि उत्तर प्रदेशातील अनेक भागात आढळतात.

 (Kankrej)

कंकरेज  - या जातीच्या गायी गुजरातमधील कच्छच्या दक्षिणपूर्व रण, आणि राजस्थानमधील बाड़मेर आणि जोधपूर जिल्ह्यात  जास्त आढळतात. या जातीच्या गायींचा रंग आयरन-ग्रे / स्टील ब्लॅक असतो.  या गायी साधरण १४०० लिटर दूध देतात.

 (Rathi)

राठी  - राजस्थान या राज्यात या गायी आढळतात. या गायींमध्ये दूध उत्पादन क्षमता अधिक असते. एका वेतात १५६० लिटर दूध या गायी देत असतात.

English Summary: high demanding cows breed in india , useful for milk production
Published on: 07 July 2020, 04:49 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)