पोल्ट्री, कुक्कुटपालन हे शेतकऱ्यांसाठी उत्पन्न वाढविण्याच उत्तम मार्ग आहे. व्यवस्थित व्यवस्थापन केले तर पोल्ट्रीमधून आपण बक्कळ पैसा कमावू शकतो. बहुतेक शेतरी हे मांससाठी उपयुक्त असलेल्या कोंबड्यांचे पालन करतात, पण अंडे देणाऱ्या कोंबड्यांचे पालन केले तर आपल्या कमाईत वाढ अधिक होत असते. अंडे देणाऱ्या कोंबड्यांमध्ये सर्वात लोकप्रिय एक प्रकार आहे त्या म्हणजे गिरिराज जातीच्या कोंबड्या या अंडे उत्पादनासाठी चांगल्याआहेत. ग्रामीण भागात उत्पादित केलेल्या अंड्यांना व कोंबड्यांना अधिक चांगल्या दराने मागणी असते. यासाठी आपल्या देशात अधिक प्रतिकारशक्ती असलेल्या व ग्रामीण क्षेत्रामध्ये अधिक टिकाऊपणे राहतील अशा विविध रंगांतील जाती विकसीत करुन त्यावरती संशोधन चालू आहे. या संशोधनातून निर्माण झालेली एक जात म्हणजे गिरीराज ही होय. स्वयंरोजगार निर्मितीसाठी गिरीराज कोंबडीचे पालन हा एक चांगला रोजगार ठरत आहे. या व्यवसायातून सतत वर्षभर उत्पन्न मिळण्याची संधी निर्माण झालेली आहे.
जाणून घ्या या कोंबड्याची वैशिष्टये -
गावठी कोंबड्यांप्रमाणे विविध रंगात आढळतात. या जातीच्या कोंबड्या कोणत्याही वातावरणात एकरुप होत असल्याने या कोंबड्यांच्या आरोग्यावर हवामान बदलाचा परिणाम होत नाही. या जातीच्या कोंबड्या मांससाठी चांगल्या असून अंडे देण्याची क्षमता या कोंबड्यांमध्ये अधिक असते. एका वर्षाला १६० ते १८० अंडी या जातीच्या कोंबड्यांपासून आपल्याला मिळतात. या जातीच्या कोंबडी १६६ दिवसात वयात येतात. सफल अंड्यांचे प्रमाण ८७ टक्के असते. याशिवाय अंड्यातून जन्माला येणारी पिल्ले ही सशक्त असतात. या कोंबडीला एक किलो वजनासाठी २.६ किलो खाद्य लागते.
कसे कराल व्यवस्थापन -
या जातीच्या कोंबड्यांचे योग्य व्यवस्थापन केले तर बाजारात या कोंबड्यांना चांगला भाव मिळत असतो त्यामुळे शेतकऱ्यांना अधिकचा आर्थिक लाभ होत असतो. पिल्ले आणल्यानंतर वाहनातून या पिल्लांची वाहतूक केल्यानंतर या पिल्लांना एक प्रकारचा ताण येतो. हा ताण कमी करण्यासाठी त्यांना इलेक्ट्रॉल पावडरचे द्रावण एक ग्रग्रॅम प्रति लिटर पाण्यात द्यावे. चौथ्या दिवसापर्यंत पाण्यात प्रतिजैविक द्यावे लागते. त्यामुळे रोगप्रतिकारक शशक्ती वाढून रोगापासून संरक्षण मिळते. त्यानंतर सहाव्या दिवशी त्यांना बी कॉम्प्लेस द्यावे. तर सातव्या दिवशी लासोटाची लस द्यावी. या लसीमुळे पिल्लांना ताण येत असतो त्यामुळे दुसऱ्यादिवशी बी कॉम्प्लेक्स द्यावे. पंधरा दिवशी गंभोरा लस द्यावी, यानंतर दुसऱ्या दिवशी बी कॉम्प्लेस द्यावे. तीनस दिवसांच्या दरम्यान ५० दिवसादरम्यान लिव्हर टॉनिक २० मिली प्रति १०० पक्ष्यांना द्यावे.
खाद्य का द्यावे -
सुरुवातीला एक-दोन भरडलेला मका द्यावा. त्यानंतर चार आठवडे स्टार्टर खाद्य द्यावे. नंतरचे आठवडे फिनिशर खाद्य द्यावे. सरासरी एका पक्ष्याला मोठे होईपर्यंत २.६ किलो ग्रॅम खाद्य द्यावे. आठ आठवड्यानंतर खाद्य देत राहिल्यास त्याच प्रमाणात त्यांची वाढ होत राहते.
Published on: 20 July 2020, 04:20 IST