भारतात अनेक युवक शिक्षणानंतर नोकरीच्या शोधात असतात तसेच अनेक युवक व्यवसाय देखील करू पाहतात. पण त्यांना व्यवसायाची योग्य ती कल्पना नसल्यामुळे ते व्यवसाय सुरु करु शकत नाहीत. त्यामुळे अनेक बेरोजगार युवक शेतीकडे वळतात. बदलत्या काळानुसार शेती समवेत जोड व्यवसाय करणे गरजेचे बनले आहे. आज आपण शेती समवेत करता येणारा एक व्यवसाय जाणून घेणार आहोत. आम्ही ज्या व्यवसायाबद्दल बोलत आहोत तो व्यवसाय आहे कुक्कुटपालनाचा. हा व्यवसाय काही नवखा नाहीय आधीच अनेक शेतकरी बांधव कुकुट पालन करून लाखो रुपयांची कमाई करत आहेत.
आज आपण हा व्यवसाय कशा पद्धतीने सुरु करता येऊ शकतो याविषयी जाणुन घेणार आहोत.मित्रांनो जर आपल्यालाही शेतीसमवेत जोडधंदा करायचा असेल तर आपण कुक्कुटपालनाचा विचार करू शकता. हा व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देखील आर्थिक सहाय्य करत आहेत. जर आपल्याला छोट्या स्तरावरती हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर आपण पंधराशे कोंबड्या टाकून हा व्यवसाय सुरू करू शकता, यातून आपणास 50 हजार ते एक लाख पर्यंत कमाई होऊ शकते. आणि जर आपल्याकडे अधिक भांडवल असेल तर आपण हा व्यवसाय मोठ्या स्तरावर देखील सुरू करू शकता यासाठी आपणास पाच ते दहा लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.
कसा सुरु करणार कुक्कुटपालनाचा व्यवसाय
जर आपले शेत रस्त्याला लागून असेल तर आपण पोल्ट्री फार्म लागलीच सुरू करू शकता, किंवा आपण भाडेतत्त्वावर रस्त्यालगत असलेली जमीन घेऊन देखील पोल्ट्री फार्म उभारू शकता. पोल्ट्री फार्म उभारण्यासाठी अतिरिक्त पाच लाख रुपये इन्वेस्ट करावे लागतील. जर आपल्याला पंधराशे कोंबड्यांचे संगोपन करायचे असेल तर त्यापेक्षा दहा टक्के अधिक दिले ऑर्डर करावे लागतील. पिल्ले खरेदीसाठी 50 हजार रुपये खर्च अपेक्षित आहे, तसेच कोंबड्यांना खाण्यासाठी व औषधंसाठी देखील खर्च करावा लागेल.
अशी होणार कमाई
वीस हफ्ते कोंबडीना खाण्यावर सुमारे 1.5 लाख रुपये खर्च येणार. वीस हफ्त्यानंतर कोंबडी अंडे द्यायला सुरवात करते आणि वर्षभर अंडे देते, वार्षिक 300 अंडे कोंबडी घालते. 20 आठवड्यांनंतर कोंबडीच्या खाण्यापिण्यावर सुमारे 3-4 लाख रुपये खर्च होतात. म्हणजे वर्षाला सहा लाख रुपये एकंदरीत कोंबड्याना खर्च होतो आणि 1500 कोंबड्यांमधून वर्षाला सरासरी 290 अंडी मिळून सुमारे 4,35,000 अंडी आपल्याला मिळतात. 35000 अंडे खराब होतील असा अंदाज बांधला तरी 4 लाख अंडी आपण विकू शकता म्हणजे तीन रुपये जरी अंडे विकले गेले तरी बारा लाख रुपये फक्त अंड्याच्या विक्रीतुन कमविले जाऊ शकता.
Published on: 18 December 2021, 12:48 IST