Animal Husbandry

शेळी पालनाचे आर्थिक गणित आणि उत्पन्न हे कळपामध्ये जन्माला येणार्यात करडांवर अवलंबून असते. त्यासाठी शेळी गाभण असताना तिची योग्य काळजी घेतली गेली पाहिजे. शेळी ही दोन वर्षात तीन वेळेस व्यायली पाहिजे.शेळीपालन व्यवसायामध्ये संगोपन आला जितके महत्त्व आहे

Updated on 02 December, 2021 5:13 PM IST

शेळी पालनाचे आर्थिक गणित आणि उत्पन्न हे कळपामध्ये जन्माला येणार्‍या करडांवर अवलंबून असते. त्यासाठी शेळी गाभण असताना तिची योग्य काळजी घेतली गेली पाहिजे. शेळी ही दोन वर्षात तीन वेळेस व्यायली पाहिजे.शेळीपालन व्यवसायामध्ये संगोपन आला जितके महत्त्व आहे

त्यासोबतच तितकेच महत्त्व गाबन शेळीच्या आरोग्य व्यवस्थापन करण्याला  सुद्धा आहे. या लेखात आपण गाबन शेळीच्या गोठ्याचे व्यवस्थापन कसे करावे याबद्दल माहिती घेऊ.

गाभण शेळ्यांचे गोठा व्यवस्थापन

  • गाभण शेळ्यांना इतर शेळ्यांपासून वेगळे ठेवावे.
  • सध्याच्या हवामानात शेळ्यांचे पावसापासून तसेच आद्रता युक्त हवे यापासून बचाव करण्यासाठी गाबन शेळ्यांचा गोठ्यात ऊबदार वातावरण राहावे म्हणून साधारणतः दोन ते चार उंचीपर्यंत 100 ते 200 होल्टेज चे बल्बलावावेत.
  • रात्रीच्या वेळेला गोठ्यामध्ये वाळलेले गवत, उसाचे पाचट पसरावे जेणेकरून जमिनीतील गारवा व ओलसरपणा याचा गाभण शेळ्यांना त्रास होणार नाही.
  • गाभण असणाऱ्या शेळ्या बसण्याची जागा मलमूत्र मुळे ओली होते. अशा ओलसर ठिकाणी आठवड्यातून एक दोन वेळा चुन्याची भट्टी टाकावे. त्यामुळे गोठ्यात असलेले जीवाणू, विषाणू यांचा प्रादुर्भाव गाबन शेळ्यांवर कमी होते.
  • गाभण शेळ्यांना होणारे आजार जसे की गर्भपात,अंग बाहेर येणे, पोटफुगी,आंत्रविषार, बुळकांडी, अपचन अशा प्रकारचे आजार उद्भवतात.
  • पावसाळ्यात आद्रतेचे प्रमाण जास्त असल्यामुळे शेळ्यांना श्वसनाचे आजार होण्याची शक्यता अधिक असते.
  • गोठ्यातील जमीन ओली असेल तर खुरांमध्ये ओलसरपणा राहून शेळ्यांचा खुरांमध्ये जखमा होऊ शकतात.
  • पावसाळ्यात हिरवा ओला चारा जास्त प्रमाणात उपलब्ध असतो. त्यामुळे गाभणशेळ्यामध्ये अंग बाहेर येणे हा आजार मोठ्या प्रमाणात आढळून येतो. असे असल्यास पशुवैद्यकाकडून योग्य उपचार करून घ्यावेत.

गाभन शेळ्यांची लक्षणे

  • एक वेळ गाभणगेलेली शेळी पुढील 21 दिवसात परत माजावर येत नाही.
  • तीन महिन्यानंतर शेळीचे पोट वाढू लागते.तसेच शेळीचे वजन वाढलेले दिसून येते.
  • शेळी गाबन झाल्यावर तिची त्वचा तजेलदार होते.
  • शेळी गाभण आहे की नाही हे ओळखण्यासाठी नवीन पद्धतीमध्ये एक्स-रे, सोनोग्राफी, लॅप्रोस्कोपी या तपासण्या खूपच विश्वसनीय मानल्या जातात.
  • शेवटच्या गाभण काळात शेळीचा कास दुधाने भरलेला दिसून येतो.
English Summary: heard management of pregnant goat and management and symptoms of pregnancy
Published on: 02 December 2021, 05:13 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)