Animal Husbandry

काही वर्षांपासून पशुसंवर्धनात भरभराटी येताना दिसत आहे. शेतकऱ्यांच्या किंवा पशुपालकाच्या पशुपालनात येणाऱ्या समस्या जाणून केंद्र आणि राज्य सरकारांनी पशुसंवर्धनासाठी काही योजना आणल्या आहेत. जेणेकरून पशुपालनाच्या व्यवसायाला चालना मिळेल.

Updated on 13 May, 2020 2:44 PM IST


काही वर्षांपासून पशुसंवर्धनात भरभराटी येताना दिसत आहे. शेतकऱ्यांच्या किंवा पशुपालकाच्या पशुपालनात येणाऱ्या समस्या जाणून केंद्र आणि राज्य सरकारांनी पशुसंवर्धनासाठी काही योजना आणल्या आहेत. जेणेकरून पशुपालनाच्या व्यवसायाला चालना मिळेल. याच पार्श्वभूमीवर हरियाणा सरकारने पशुपालकांसाठी पशु किसान क्रेडिट कार्ड योजना आणली आहे. या योजनेतून पशुपालकांना मोठा फायदा होणार आहे.

हरियाणा सरकार पशु किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना १ लाख ६० हजार रुपयांची मदत देत आहे. विशेष म्हणजे हे कार्ड बँकेच्या डेबिट कार्डसारखे वापरता येते. डिसेंबर महिन्यापासून याची सुरुवात हरियाणा पशुसंवर्धन विभाग आणि कृषी मंत्री जेपी डलाल यांनी केली. दिलेल्या मर्यादेत शेतकरी किंवा पशुपालक पैसे काढू शकतो किंवा काहीही खरेदी करू शकतो. या कार्डच्या आधारे प्रत्येक म्हैशीसाठी ६०,२४९ रुपये तर गायींसाठी ४०,७८३ रुपयांचे कर्ज मिळणार आहे. दरम्यान पशुवैद्यकीयांना पशु किसान क्रेडिट कार्ड बनविण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

पशुपालक या कार्डच्या माध्यमातून १ लाख ६० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ शकतात.  सर्व बँकांकडून कार्डधारकाला वार्षिक ७% व्याज दराने कर्ज दिले जाईल. वेळेवर कर्जाचा किंवा व्याजाची भरणा केला तर सरकारकडून ३ टक्के व्याज ३ लाखाच्या कर्जावर दिले जाते. तीन लाखापर्यंतचे कर्ज केवळ १२ टक्के वार्षिक व्याजसह मिळते. पशु किसान कार्डधारक शेतकरी ३ लाखापर्यंतचे कर्ज घेऊ शकतात. जनावरांच्या प्रवर्ग आणि  आर्थिक प्रमाणानुसार दर महिन्याला जनावरांवर समान कर्ज  दिले जाते.  यासाठी आपल्याकडे कागदपत्रे असणे आवश्यक आहे - बँकेचा अर्ज, करार पत्र,(प्रतिज्ञापत्र),ओळखपत्रे, मतदान कार्ड, आधारकार्ड, पॅनकार्ड आदी. 

English Summary: Haryana government bring pashu kisan credit card for cattle farmers
Published on: 13 May 2020, 02:41 IST