1. पशुसंवर्धन

हरधेनू गाय दिवसाला देते ५० ते ५५ लिटर दूध; पशुपालकांसाठी आहे उपयोगी


दुग्ध व्यवसायात गायीच्या दुधाला मोठी मागणी असते, मग गायीचे दुध असो किंवा तूप. जर आपण दुधाचा व्यवसाय करत असाल तर आपल्या गोठ्यात गायी ठेवाव्यात, पण गायी ठेवल्या म्हणजे लगेच उत्पन्न मिळण्यास सुरुवात होईल, असे नाही. यासाठी गायी घेताना कोणत्या गायी दूध उत्पादनांसाठी फायदेकारक आहेत याची माहिती असली पाहिजे. गायींची काळजी घेतली गेली पाहिजे. दरम्यान आज आम्ही आपल्याला अशाच एका गायीच्या जातीविषयी माहिती देणार आहोत. ही गाय साधरण ५५ लिटर दूध देते.

या गायीच्या जातीचे नाव आहे, हरधेनू गाय. दूध उत्पादनासाठी ही फार प्रगत जात आहे. हरधेनू गायीची जात ही हरियाणाच्या लाला लाजपत राय पशु- चिकित्सा आणि पशु विज्ञान विद्यापीठ (लुवास) च्या शास्त्रज्ञांनी तीन जातींपासून विकसित केली आहे.  उत्तर अमेरिकेतील होल्सटीन फ्रिजन , देशी हरियाणा आणि साहिवालच्या जातीच्या क्रॉस ब्रीड असलेली हरधेनू गाय ५० ते ५५ लिटर दूध देते. या जातीच्या गायीमध्ये ६२.५ टक्के होल्स्टीन फ्रीजन गायीचे रक्त आहे. यासह हरियाणा आणि साहिवाल जातीच्या गायीचे ३७.५ टक्के रक्त आहे. दरम्यान संशोधकांच्या मते, ही हरधेनू जातीची गायी हरियाणा परिसरासाठी उपयुक्त आहे.

या गायीचा पालन करून पशुपालक चांगला नफा कमावू शकतील. लवकरच ही जाती देशातील कानाकोपऱ्यात पोहचणार असून या गायीची वाढ लवकर होत असते. इतर गायींशी हरधेनूची तुलना केली तर हरधेनू गाय सरस ठरते. इतर गायी दिवसाला ५ ते ६ लिटर देत असतात. परंतु हरधेनू गाय ही दररोज साधारण १५ ते १६ लिटर दूध देत असते. एका दिवसात या गायी ४० ते ५० किलो हिरवा चारा खातात. तर ४ ते ५ किलो सूखा चारा खातात.

 


ही गाय साधरण २० महिन्यात प्रजननसाठी तयार होत असते. तर इतर गायी म्हणजे देशी गायी ३६ महिन्यांनी प्रजननसाठी तयार होत असतात.
या गायी ३० महिन्याच्या असताना वासरुंना जन्म देत असतात. तर इतर जातीच्या गायी ४५ महिन्यात वासरुंना जन्म देतात.  हरधेनू जातीच्या गायींमध्ये दूध देण्याची क्षमता अधिक असते.  या गायीच्या फॅटमध्ये अधिक फॅट असते. कोणत्याही वातावरणात राहण्याची क्षमता या गायींमध्ये असते.  पशुपालक एका दिवसाला ५० ते ५५ लिटर दूध मिळवू शकतील आणि त्यातून बक्कळ पैसा कमावू शकतील.   जर आपल्याला या गायीच्या जातीचे सीमन हवे असेल तर लाला लाजपत राय पशु विश्वविद्यालयाशी संपर्क करु शकतात. संपर्क करण्यासाठी ०१६६-२२५६१०१ किंवा ०१६६२२५६०६५ वर संपर्क करुन याविषयीची माहिती घेऊ शकतात.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters