1. पशुधन

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! दूधाचे दर वाढण्याची शक्यता, 'ही' आहेत महत्वाची कारणे..

शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाकडे बघितले जाते, असे असताना या दरात अनेकदा चढ उतार बघायला मिळतात. यामुळे अनेकदा शेतकरी तोट्यात जातो. आता मात्र शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी येऊ शकते, कारण आता दुधाचे भाव वाढण्याची शक्यता आहे.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश

शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाकडे बघितले जाते, असे असताना या दरात अनेकदा चढ उतार बघायला मिळतात. यामुळे अनेकदा शेतकरी तोट्यात जातो. आता मात्र शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी येऊ शकते, कारण आता दुधाचे भाव वाढण्याची शक्यता आहे. सध्या चार्‍याच्या किंमती वाढल्या आहेत. पशूखाद्याचे दर तेजीत आहेत. यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. यामुळे येत्या काही दिवसात दूधाचे दर वाढण्याची दाट शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळू शकतो. अनेक शेतकरी सध्या दुधाचे दर वाढवण्याची मागणी करत आहेत.

केंद्रीय अर्थसंकल्पात देखील शेतकऱ्यांच्या पदरी काही पडले नसल्याचे शेतकरी नेते सांगत आहेत. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यामुळे शेतकऱ्यांना सावरले तरच येणाऱ्या काळात तो उभा राहणार आहे. दूध उत्पादन खर्चात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने त्याचा परिणाम दूधाच्या दरावर देखील पडण्याची शक्यता आहे. दरवर्षी पोषक वातावरणामुळे नोव्हेंबर ते मार्च या दरम्यानच्या कालावधीत दूध उत्पादनात वाढ होत असते. यामुळे आता देखील वाढ होण्याची शक्यता आहे.

सध्याच्या काळात उत्पादनाच्या तुलनेत चार्‍याच्या किंमती वाढल्या आहेत. पशूखाद्यामध्ये गेल्या वर्षभरात ५० ते ६० टक्क्यांनी वाढ झालेली आहे. दूध उत्पादनावरील खर्च तर वाढलाच आहे पण त्याचा पुरवठाही नियमित होत नसल्याने आता दूधाच्या दरवाढीशिवाय पर्याय नसल्याचे मत दूग्धतज्ञांकडून वर्तविण्यात आले आहे. यामुळे वरिष्ठ पातळीवर निर्णय होण्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली आहे.

तसेच इंधन दर आणि विजेचे दर वाढल्यामुळे दूध उत्पादक संघाचा देखील खर्च वाढला आहे. हे कारण देत दूध संघांकडून दूध दरांमध्ये वाढ करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांचा देखील खर्च वाढला असल्याने आता त्यांना देखील दिलासा देण्याची मागणी केली जात आहे, सध्या महागाईमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. यातच शेतकऱ्यांना केंद्रीय अर्थसंकल्पातून अनेक अपेक्षा होत्या. मात्र त्याठिकणी देखील त्यांच्या पदरी निराशा पडली असल्याने शेतकरी नाराज आहेत. तसेच भाजीपाल्याला देखील बाजारभाव नसल्याने शेतकरी तोट्यात सापडला आहे, यामुळे मदतीची मागणी केली जात आहे.

English Summary: Great relief to farmers! These are important reasons for the possibility of increase in milk prices. Published on: 02 February 2022, 11:30 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters