सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पाऊस बरसत आहे. पाऊस पडल्यानंतर माळरानावर विविध प्रकारचे हिरवेगार गवत उगवते.असे हिरवेगार गवत उगवल्यानंतर बरेच शेळीपालक शेळ्यांना मोकळ्या रानात चरण्यासाठी नेतात. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गवत उगवलेले असते.
यापैकी काही गवतामुळे शेळ्यांना आणि जनावरांना विषबाधा होण्याची दाट शक्यता असते. विविध प्रकारचे आजार जनावरांना होऊ शकतात.
गवतामुळे विषबाधा झाल्याने जनावरांच्या लिव्हरला हानी पोहोचते व कावीळ सारखा आजार होतो. पावसाळ्यामध्ये सर्वीकडे उगवणार्या वनस्पतींमध्ये घाणेरी आणि इतर विषारी वनस्पती देखील उगवतात. या वनस्पती जनावर चरताना जर त्यांच्या खाण्यात आल्यातर जनावरांना विषबाधा होऊ शकते.
घाणेरी ठरते शेळ्यांना विषबाधा होण्यासाठी कारणीभूत
या गवतामध्ये लेंटाडीन विषारी घटक असतो. जर चुकून ही वनस्पती जनावरांकडून खाल्ली गेली तर हा घटक जनावरांच्या रक्तात मिसळतो.
त्यानंतर असे जनावर सूर्यप्रकाशाच्या सान्निध्यात आले तर जनावरांना विषबाधेची लागण होत असते. या विषबाधेमध्ये जनावरांच्या त्वचेचा सूर्यप्रकाशाच्या सान्निध्यात येणारा भाग सुजतो.
तसेच त्या भागाला खाज येते व जनावर झाडाला किंवा भिंतींना शरीर घासतात. शरीराच्या विविध भागांमध्ये जसे की कान, नाक, डोळे आणि शेपटी कडच्या भागाला सूज येते. डोळ्यामधील श्लेष्मपटलाचा रंग पिवळा होतो.
तसेच पिवळ्या रंगाची लघवी व्हायला लागते. ज्या जनावराला बाधा होते त्याला ताप येतो व खाणे पिणे देखील कमी होते किंवा बंद सुद्धा होते, पोटाची हालचाल मंदावते. विषबाधेची तीव्रता जास्त झाली तर जनावर दगावण्याची शक्यता वाटते.
नक्की वाचा:महत्वाचे! या 'टिप्स' वापरा आणि ओळखा गोठ्यातील जनावर आजारी आहे की निरोगी
यावर उपाय
जर जनावरांमध्ये अशी लक्षणे दिसायला लागली तर जनावरे सूर्यप्रकाशापासून दूर ठेवावेत. ज्या ठिकाणी दाट सावली असेल अशा ठिकाणी ठेवणे खूप गरजेचे असते.
तसेच पशुवैद्यकांच्या सल्ल्यानेविषबाधा झालेल्या जनावरांच्या उपचार करून ही जनावरे सावलीमध्ये बांधावीत. लवकर उपचार केला तर जनावरे लवकर बरे होण्यास मदत होते. मेंढी आणि बैलांमध्ये देखील घाणेरी वनस्पतीची विषबाधा आढळून येते.
नक्की वाचा:शेळीपालनात A टू z मदत करतील 'हे' 5 मोबाईल ॲप, शेळीपालन व्यवसाय होईल यशस्वी
Published on: 20 July 2022, 12:53 IST