Animal Husbandry

भारतामध्ये बरेच शेतकरी शेतीला जोड व्यवसाय म्हणून पशुपालन हा व्यवसाय करतात. पशुपालन व्यवसाय हा प्रामुख्याने दूध उत्पादनासाठी केला जातो. जेणेकरून त्या माध्यमातून शेतकऱ्यांची चांगली आर्थिक प्रगती होते. जर आपण दूध उत्पादनाचे अवलंबित्व पाहिले तर ते प्रमुख्याने जनावरांच्या आरोग्य, त्यांना दिला जाणारा आहार, गोठ्याची स्वच्छता वगैरे इतर गोष्टींवर अवलंबून असते

Updated on 20 December, 2021 1:40 PM IST

भारतामध्ये बरेच शेतकरी शेतीला जोड व्यवसाय म्हणून पशुपालन हा व्यवसाय करतात. पशुपालन व्यवसाय हा प्रामुख्याने दूध उत्पादनासाठी केला जातो. जेणेकरून त्या माध्यमातून शेतकऱ्यांची चांगली आर्थिक प्रगती होते. जर आपण दूध उत्पादनाचे अवलंबित्व पाहिले तर ते प्रमुख्याने जनावरांच्या आरोग्य, त्यांना दिला जाणारा आहार, गोठ्याची स्वच्छता वगैरे इतर गोष्टींवर अवलंबून असते

जर आपण जनावरांना संतुलित आहार वेळेवर दिला तर दूध उत्पादनात निश्चितच वाढ होते.या लेखात आपण जनावरांना दिली जाणारी कडबा कुट्टी व तिचे जनावरांच्या आहारातील महत्त्व याबद्दल माहिती घेऊ.

जनावरांच्या आहारातील कडबाकुट्टी चे महत्व..

 बरेच पशुपालक जनावरांना हिरवा चारा खाऊ घालतात.ज्यामध्ये नेपियर गवत, मका इत्यादी.इत्यादी चारा हा शेतातून कापणी केल्यानंतर आपण जसे च्या तसे जनावरांना खाऊ घालतो.परंतु त्याचे होते असे की जनावरे फक्तत्याचा कोवळा भागहातात आणि चावण्यास थोडा कठीण असलेला खोडाचा भाग तसाच न खाता सोडून देतात. त्यामुळे जवळजवळ चाऱ्याचे तीस ते 35  टक्‍क्‍यांपर्यंत नुकसान होते.

तसेच या चाऱ्यातील पोषक घटकांचा विचार केला तर खोडा कडील भागात असलेले जीवनसत्वे वाया जातात. याच पद्धतीने वाळलेला चारा ज्यामध्ये प्रामुख्याने ज्वारीचे, बाजरीचा कडबा वापरला जातो.ते जनावरांना देण्यापूर्वी कडबा कुट्टी मशीन मधे बारीक करुन घ्यावे.त्यानंतर जनावरांना खाऊ घालावे. त्यामुळे पाण्याची नासाडी थांबवण्यासाठी व चारा पूर्णपणे उपयोगात आणण्यासाठी साऱ्याची नेहमी कुट्टी करूनच जनावरांना खाण्यासाठी द्यावा.

 यामध्ये हिरवा किंवा वाळलेला चारा हा एक ते दीड इंच कापून घ्यावा. 

आपल्याला माहिती आहेस की,कुट्टी करण्यासाठी आपण कोणत्या जागेवर कडबाकुट्टी यंत्राचा वापर करतो.कडबा कुट्टी यंत्र हे विजेच्या साहाय्याने मोटारीवर चालवले जाते किंवा हाताने चरखा फिरवून देखीलचाऱ्याची कुट्टी करता येऊ शकते.एकदा का जनावरांना कुट्टी केलेला चारा आवडला तर नंतर ते तसलाच  चारा खाण्यास उत्सुक असतात. अशा कुट्टी केलेल्या चारामुळे जनावरांना त्याच्या आवडीचा मऊ चाऱ्याचा भाग वेचून खाता येणार नाही. त्यासाठी सर्व दूध कार्ड शेतकरी आपल्या जनावरांच्या संख्येनुसार कडबा कुट्टी मशीन निवडावी व दररोज वाळलेला तसेच हिरवा चारा कुट्टी करूनच द्यावा.

English Summary: grass chaff is most benificial grass for animal for growth of milk production
Published on: 20 December 2021, 01:40 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)