Animal Husbandry

सध्या दुग्ध व्यवसायाला चांगले दिवस आले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना चार पैसे मिळत आहेत. सध्या दुधाला चांगला बाजारभाव मिळत आहे. यामुळे शेतकरी समाधानी आहे. सरकार शेतकर्‍यांना दुग्ध व्यवसायाकडे वळण्यासाठी सातत्याने प्रोत्साहन देत आहे. यामुळे याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. दुग्धव्यवसाय उघडण्यासाठी सरकार शेतकर्‍यांना आर्थिक मदतही देते.

Updated on 13 October, 2022 2:09 PM IST

सध्या दुग्ध व्यवसायाला चांगले दिवस आले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना चार पैसे मिळत आहेत. सध्या दुधाला चांगला बाजारभाव मिळत आहे. यामुळे शेतकरी समाधानी आहे. सरकार शेतकर्‍यांना दुग्ध व्यवसायाकडे वळण्यासाठी सातत्याने प्रोत्साहन देत आहे. यामुळे याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. दुग्धव्यवसाय उघडण्यासाठी सरकार शेतकर्‍यांना आर्थिक मदतही देते.

आता केंद्र सरकार देशातील प्रत्येक पंचायतीमध्ये डेअरी सुरू करण्याचा विचार करत आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह म्हणाले की, दुग्धव्यवसाय हे शेतकर्‍याच्या समृद्धीचे साधन बनवले जाऊ शकते. त्याची यंत्रणा सहकारी असावी. त्यामुळे शेतकर्‍यांची गरिबी दूर होऊ शकते. अनेकांचे जीवनमान यावर अवलंबून आहे.

त्यामुळेच केंद्र सरकारने येत्या ५ वर्षांत देशातील प्रत्येक पंचायतीमध्ये दुग्धव्यवसाय करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही पशूपालक स्टार्टअप इंडिया आणि नाबार्डच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात. दुग्धव्यवसाय उघडण्यास इच्छुक असलेल्या शेतकर्‍यांना नाबार्ड २५ टक्क्यांपर्यंत सबसिडी देते. यामुळे शेतकऱ्यांसाठी हे फायदेशीर आहे.

कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक, केले कांदा बाजार सत्याग्रह तिरडी आंदोलन

तसेच समान कामासाठी शेतकर्‍यांना ३३.३३ टक्के पर्यंत अनुदान दिले जाते. नाबार्डच्या या योजनेसाठी शेतकरी, वैयक्तिक उद्योजक, स्वयंसेवी संस्था, कंपन्या अर्ज करू शकतात. शासनाच्या नियमानुसार एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात. यामुळे आता शेतकऱ्यांना हा एक व्यवसाय फायदेशीर असणार आहे.

रब्बी पिकाच्या पेरणीपूर्वी मागणीपेक्षा डीएपी ४४ टक्के कमी आणि युरिया २८ टक्के कमी, शेतकरी चिंतेत

यामध्ये अट अशी आहे की ते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पायाभूत सुविधांसह वेगवेगळी युनिट्स उभारतील. यामुळे याबाबत माहिती घेऊन शेतकरी आपल्यासाठी चार पैसे मिळवू शकणार आहेत. यामुळे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या;
लसीकरणानंतरही जनावरांना लम्पीची लागण, शेतकऱ्यांची चिंता वाढली..
पुण्यात तीन दिवसीय डेअरी कार्यशाळेचे आयोजन, शेतकऱ्यांनो एकदा भेट द्याच
लम्पीकडे दुर्लक्ष, संतप्त शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना रक्ताने लिहले पत्र

English Summary: Government open co-operative dairies in panchayats country, Amit Shah
Published on: 13 October 2022, 02:09 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)