Lumpy Skin Diseas : देशभरात धुमाकूळ घालणाऱ्या लम्पी आजारानं धुमाकुळ घातला आहे. जनावरांमध्ये पसरलेल्या लम्पी त्वचा रोगावर गोमूत्र आणि इतर आयुर्वेदिक उपचार परिणामकारक ठरत आहेत.
नागपूर (Nagpur)जिल्ह्यातील देवलापार येथील गौ विज्ञान अनुसंधान केंद्राच्या वैद्यांचा दावा आहे की, गौमूत्रवर आधारलेल्या पद्धतीने त्यांच्या गौशाळेतील सुमारे 850 गौवंशीय प्राणी लम्पी मुक्त झाले आहेत.
गोमूत्र लम्पी रोगाशी लढण्यामध्ये मदतगार ठरणार आहे. नागपूर जिल्ह्यातील देवलापार गौ विज्ञान अनुसंधान केंद्राच्या प्रधान वैद्य डॉ नंदिनी भोजराज यांच्या मते स्वस्थ देशी गायीचा गोमूत्र उकळून थंड केल्यावर लम्पी सदृश्य लक्षण असलेल्या प्राण्यांना प्यायला दिले, तर त्यांची रोगप्रतिकारक क्षमता वाढून ते लम्पी मुक्त होऊ शकतात. तर ज्या प्राण्यांना लंपीचा प्रादुर्भाव अद्याप झालेला नाही, त्यांची रोगप्रतिकारक क्षमता वाढून ते लम्पी रोगाशी लढा देऊ शकतात.
LIC ची खास योजना; 'या' योजनेतून महिलांना 4 लाख रुपयांची मिळणार आर्थिक मदत
गौवंशीय प्राण्यांना गोमूत्र देण्याची पद्धत
एक वर्षापेक्षा मोठ्या प्राण्यांना 100 मिलीलिटर गोमूत्र उकळून द्यावे.
एका वर्षापेक्षा मोठ्या वासराला 50 मिलीलिटर गोमूत्र उकळून द्यावे.
सोबतच कडुलिंब - अढुळसा- गुळवेल - हळद - आजण(अर्जुन) या सर्वांचा अर्धा किलोचा पाला खायला द्यावा..
गोवंशी प्राण्यांच्या गोठ्यामध्ये रोज संध्याकाळी धुरणी करावी.
चांगल्या आरोग्यासाठी मिठाचे प्रमाण किती असावे? जाणून घ्या सविस्तर
भोजराज यांचा दावा आहे की, याच पद्धतीने त्यांनी 2018-19 मध्ये झालेल्या लम्पीच्या प्रादुर्भावापासून गोशाळेतील गोवंशीय प्राण्यांना वाचवले होते. यावर्षीही देवलापार येथील गो शाळेतील साडेआठशे गोवंशीय प्राणी पूर्णपणे स्वस्थ आहे.
सध्या ग्रामीण भागामध्ये लम्पी या रोगामुळे भीतीचे वातावरण आहे. शासनाने संक्रमित प्राण्यांच्या विलगीकरणाची आणि ज्या भागात संक्रमण आढळत आहे, त्याच्या पाच किलोमीटरच्या परिसरात लसीकरणाची मोहीम हाती घेतली आहे.
महत्वाच्या बातम्या
धनु आणि मकर राशींना होणार धनलाभ; जाणून घ्या आजचे राशीभविष्य
कीटकनाशकांच्या फवारणीसाठी वापरा 'हे' अफलातून जुगाड; पैशांची होणार बचत
शेतकऱ्यांनो रब्बीत कमी खर्चात पिकांचे उत्पादन दुप्पट करा; फक्त 'या' टिप्स कराव्या लागतील फॉलो
Published on: 29 September 2022, 10:02 IST