Animal Husbandry

शेतीसह शेतकरी पशुपालनाचा व्यवसायही करत असतो. पशुपालनातून दूध आणि शेण खतांतून पैसा शेतकऱ्यांना मिळत असतो. परंतु शेणाचा अजून एक फायदा शेतकऱ्यांना मिळणार आहे. गावात गोबर गॅसची संकल्पना आली होती बऱ्याच गावात ती राबविण्यातही आली होती

Updated on 29 June, 2020 5:43 PM IST

शेतीसह शेतकरी पशुपालनाचा व्यवसायही करत असतो. पशुपालनातून दूध आणि शेण खतांतून पैसा शेतकऱ्यांना मिळत असतो. परंतु शेणाचा अजून एक फायदा शेतकऱ्यांना मिळणार आहे. गावात गोबर गॅसची संकल्पना आली होती बऱ्याच गावात ती राबविण्यातही आली होती. आता शेणापासून अजून एक क्रिया केली जाणार असल्याने शेतकऱ्यांना आणि पशुपालकांना उत्पन्नाचा नवा मार्ग मिळणार आहे. कमी खर्चात आपण ही या व्यवसायात गुंतवणूक करु शकता आणि चांगली कमाई करु शकता. उत्तर भारतात शेणाचे लाकूड व्यवसाय केला जात आहे. उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाणामधील पशुपालक ही मशीन घेऊन लाकूड बनवून पैसा कमवत आहेत.  शेणाला आधी शेतकऱ्यांचे सोनं म्हटलं जात असे, आता उत्पादकता वाढल्यानंतर या म्हणीची प्रचिती होत आहे.

मशीनची किंमत किती आहे.

या मशीनची किंमत ६५ हजार ते ७० हजार रुपये आहे. या मशीनच्या साहाय्याने आपण शेणांच्या गवऱ्या बनवू शकता.  फक्त १५ सेंकदात २० ते ३० गोवऱ्या आपण तयार करु शकता. चुलीसाठी याचा वापर केला तर प्रदुषण कमी होण्यासही मदत होते. या मशीनच्या माध्यमातून आपण शेणाचे लाकूडही तयार करु शकतात. फक्त २० सेंकदात १ किलो लाकूड आपण बनवू शकता. बऱ्याच गावात अंत्यसंस्कार करताना मोठ्या प्रमाणात लाकूड जाळले जाते त्याला पर्याय म्हणून या शेणांच्या लाकडाचा विचार करण्यास काही हरकत नाही. वृक्षतोड अधिक झाल्यास पर्यावरणाचा ऱ्हास होईल. यामुळे शेणाच्या लाकडाचा उपयोग केल्यास पर्यावरणाचे रक्षण होणार आहे. यासह आपल्याला नव्या रोजगाराचा मार्ग मोकळा होईल.

 

लाकूड कसे बनवणार - सर्वात आधी आपण गायीचे किंवा म्हशीचे शेण मशीनमध्ये टाकावे. त्यात भुस्सा, आणि घास टाकावी. यामुळे लाकूड तयार होईल. हे लाकूड ६०० रुपये प्रति क्किंटल रुपयांपेक्षा अधिक दराने विकले जाईल. या शेणापासून बनविण्यात आलेल्या लाकडांचा उपयोग विटांच्या भट्टीसाठीही केला जातो. शेणापासून बनविण्यात आलेल्या लाकडांना देशासह विदेशातही मागणी आहे. ज्या ठिकाणी बर्फ वितळतो त्या ठिकाणी या  लाकडांचा उपयोग घरातील वातावरण गरम करण्यासाठी केला जातो.

English Summary: golden chance ! make wood from dung and earn money
Published on: 29 June 2020, 05:31 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)