फिश टॅंक किंवा काचेच्या पेटीमध्ये बागडणाऱ्या रंगीबेरंगी माशांमध्ये सोनेरी माशाचा नंबर सर्वात वरचा लागतो. त्याचा सोनेरी चमकणारा रंग मोठे मोठे डोळे, माझे झुपकेदार शेपटी आणि विलक्षण चपळाई बघण्यासारखे असते. घरात आणि हॉटेल्स मध्ये सोनेरी मासे फिश टॅंकची शोभा वाढवतात. आकर्षण सोबत त्यांना सांभाळणे फार जिकिरीचे काम असते. टँक मध्ये कृत्रिम गुहा, झाडे, शैवाल आणि समुद्रासारखे वातावरण ठेवले तर त्यातील माशांच्या लीला खूपच नयनरम्य असतात. सोनेरी मासा हा सायप्रीनिडी कुटुंबातील प्राणी असून त्याच्या प्रजातीचे प्रचलित नाव कार्प असे आहे आणि त्यांच्या प्रकारात हेच वापरले जाते. या माशाचा रंग आणि रुपा प्रमाणे अनेक प्रकार आहेत. या लेखात आपण सोनेरी माशांचे प्रकार आणि संगोपन या विषयी माहिती घेणार आहोत.
सोनेरी माशाचे प्रकार:
- कॉमन गोल्डफिश- लाल, सोनेरी, पांढरी, पिवळ्या अशा विविध रंगाचे मासे या जातीत आढळतात.
- सेलेसटिल आय- यांच्या डोळ्याचा आकार मोठा असतो व ते बाहेर आलेले असतात.
- लायन हेड – या जातीतील माशाला सिंहाप्रमाणे मानेभोवती हूड असते.
- पोमपोम – या जातीच्या नाकाजवळ सुटे मांसल वाढलेली भाग असतात. त्याला नेसल बकेट पण म्हणतात.
- टेलिस्कोप आय- या जातीचे वटारलेले बाहेर आलेले डोळे असतात. याला ड्रॅगन काय पण म्हणतात.
- व्हेल टेल-या जातीची जरा जास्त लांब शेपटी असते आणि शेवटी ती विभागलेली असते.
- कार्ड गील- याचे कल्ले उलटे असतात.
- व्हाईट ब्लॅक टेलिस्कोप- हे पांढरे आणि काळे गोल्डफिष रंगीबिरंगी गोल्डफिश मध्ये वेगळेपणाने उठून दिसतात.
- कॉमेट- धूमकेतू प्रमाणे लांबच लांब शेपटीचा फराटा असतो आणि त्यावर काटे असतात.
प्रजनन साठा-
प्रजनन साठ्यामध्ये मादीची निवड योग्य असणे आवश्यक आहे. कारण मादीचा आकार मोठा असला की अंडे प्रजनन करण्याची क्षमता जास्त असते. मादिची निवड करताना त्यांचा आकार, रंग, पंख इत्यादी तपासणी करणे आवश्यक आहे. बीजाची गुणवत्ताही प्रजनक साठ्यावर अवलंबून असते. सोनेरी माशाची लैंगिक प्रौढता ही साधारण एक वर्षाचा असते. व्यवसायिक प्रजननासाठी लैंगिक प्रौढता ही आहे दोन वर्षे असावे लागते.
सोनेरी माशाचे लिंगभेदन
सोनेरी माशाची मादी ही नरापेक्षा जरा मोठी असते.पोटाजवळ जाड असते.नराच्या कल्यावर एक पांढरा ठिपका असतो व लांब व टोकदार पेक्टरल पंख असतो. मादीचा पेक्टरल पंखा गोलाकार आणि आखूड असतो. नर मासा हा लहान आणि अंडाकृती असतो. मागील भाग हा प्रजनन वेळी नेहमीपेक्षा जरा मोठा व फुगलेला असतो.
पाणी गुणवत्ता:
सोनेरी मासा हा तसा काटक आहे. हा खरा पाण्याच्या गुणवत्तेतही राहू शकतो. प्रजनन वाढ आकर्षकता व आरोग्य हे सर्व पाणी गुणवत्तेवर अवलंबून असते. सोनेरी माशाची साधारण तापमान 18 ते 24 सेल्सियस असावे. सोनेरी मासे हे अगदी कमी म्हणजे शून्य अंश सेंटिग्रेड तापमानातही राहू शकतात. जर तापमानात सतत बदल होत असेल तर त्या माशाची प्रतिकारक क्षमता कमी करतात. तसेच वाढ कमी खाद्य कमी होत असतात. अशी लक्षणे दिसू लागतात. प्राणवायू कमीत कमी पाच एमजीएल असावा व अमोनिया 0.05 mg/l पेक्षा कमी असावा व सामू हा सात व सातच्या जवळ असावा.सोनेरी मासा हा पाच ते नऊच्या दरम्यान च्या सामूला जिवंत राहू शकतो.
प्रजनन-
सोनेरी माशाच्या प्रजननासाठी हिवाळ्यानंतर चा वसंत ऋतू उत्तम असतो. प्रजना वेळी मादी व नर याचे गुणोत्तर 1:2 असा असावा. सोनेरी माशाचे अंडे हे चिकट असतात म्हणून प्रजनन युनिट तयार करा. त्यासाठी 18 इंच लांबीची दोरी घ्या व तिला मोकळे करून म्हणजेच एक एक धागा सुट्ट्या करून घ्या व टाकीत पसरावा. अंडे चिकट असल्यामुळे ते दोऱ्यावर चिकटतील. मादीने अंडे दिल्यावर तातडीने ते दोऱ्या सहित काढून दुसऱ्या टाकीत किंवा काचेच्या पेटीत हलवा. अंडे देण्याची प्रक्रियाही सहा ते 12 तासांमध्ये पूर्ण होते. एक मादी 2000 ते 3000 अंडे देऊ शकते. सोनेरी मासा बहुतेकदा ऑक्टोबर ते डिसेंबर व फेब्रुवारी ते मे त्याकाळात प्रजनन करतात व यासाठी पाण्याचे तापमान हे 20 अंश सेंटिग्रेड असावे. उस्फुर्त प्रजनन कमी करण्यासाठी नर व मादी प्रजनन कालावधीपर्यंत वेगळे ठेवावे व प्रजनन पूर्ण झाल्यावर दोरिचे मेट टाकीतून काढून दुसऱ्या टाकीत अंडे ठेवावे. अंडाशयातून अंडे बाहेर आल्यावर दोन ते तीन दिवस खाद्य देण्याची गरज नसते. परंतु त्यानंतर एनफुसिरिया, रोटीफर, आरटेमिया द्यावा.
सोनेरी माशाचे खाद्य:
सोनेरी मासा हा वेगवेगळ्या नैसर्गिक कृत्रिम खाद्यावर जगू शकतो. या खात्यात 25 ते 32 टक्के प्रोटीन असणे आवश्यक आहे. जसजसे माशाचा आकार वाढेल तसतसा खाद्य कणांचा आकार एक ते दोन मिमी वाढवावा. सोनेरी मासात पोट हे नसते. त्यामुळे विविध प्रकारचे खाद्य ते घेऊ शकतात. तलावामध्ये माशांचे संवर्धन करताना या वेगवेगळ्या खाद्याचा खूप फायदा असतो. माशांना टाकलेल्या खाद्यापैकी काही खाद्य ते खातात व काही तलावात खत म्हणून वापरले जाते. याचा नैसर्गिक खाद्य तयार करण्यासाठी मोठा फायदा होतो.
हार्वेस्टिंग आणि ग्रेडिंग
बाजारातील मागणीनुसार सोनेरी माशाची हार्वेस्टिंग करावी. गुणवत्ता प्रजनक तयार होण्यासाठी एक वर्ष पूर्ण लागतो. पूर्ण वाढीसाठी रंग, आकार, पंख व शरीराचा आकार या सर्व गोष्टी माशांची किंमत ठरवितात.
सोनेरी माशाला येणारे आजार:
वातावरणाची स्थिती, पोषकतत्वे यांच्या कमतरतेमुळे सोनेरी मासा संसर्गजन्य व असंसर्गजन्य रोग यांना बळी पडू शकतो. रासायनिक उपचार पद्धतीचा वापर करून हे आजार आपण बहुतांशी प्रमाणावर कमी करू शकतो. वातावरणाची स्थिती जर योग्य असेल तर विषाणू, रोगजंतू यांचे प्रमाण कमी होते.
Published on: 26 July 2021, 07:12 IST