Animal Husbandry

भारतामध्ये शेतीव्यवसायाला जोडधंदा म्हणून पशुपालन हा व्यवसाय केला जातो. त्यातल्या त्यात शेळी पालन कमी खर्चात व कमी जागेत करता येणारा फायदेशीर व्यवसाय आहे.

Updated on 06 September, 2021 1:18 PM IST

भारतामध्ये शेतीव्यवसायाला जोडधंदा म्हणून पशुपालन हा व्यवसाय केला जातो. त्यातल्या त्यात शेळी पालन कमी खर्चात व कमी जागेत करता येणारा फायदेशीर व्यवसाय आहे.

परंतु शेळी पालन व्यवसाय करत असताना आपण पाळत असलेल्या शेळ्या या कोणत्या जातीच्या आहेत व त्या पाळणे आपल्याला उपयुक्त आहे का?याचा विचार होणे फार गरजेचे असते.तशा शेळ्यांच्या भरपूर जाती आहेत. परंतु काही जाती या शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न देणाऱ्या म्हणून प्रसिद्ध आहेत. या लेखात आपण कोकण कन्याळया जाती विषयी माहिती घेणार आहोत.

 कोकण कन्याळ शेळी

 या शेळ्या प्रामुख्याने कोकणातील सावंतवाडी, दोडामार्ग तसेच कुडाळ भागातील असून काही प्रमाणात महाराष्ट्रातील विदर्भ पट्ट्यात ही आढळतात. या जातीचे वैशिष्ट्य म्हणजे ही जात मांससाठी उपयुक्त आहे. या जातीची शेळी दोन वर्षात तीनदा करडांना जन्म देते.

 या शेळीचे  प्रथम माजावर येणाचे वय आहे अकरा महीने आहे व सतराव्या  महिन्यात पहिल्यांदा विते. या शेळीच्या दोन वेतामधील अंतर हे आठ महिन्याचे आहे. या शेळीच्या दूध उत्पादन काळाचा विचार केला तर 97 दिवसात 60 लिटर दूध देते वया शेळीचा भाकड काळ 84 दिवसाचा असतो. या जातीच्या नराचा विचार केला तर एका वर्षात नराचे वजन पंचवीस किलो होते. पूर्ण वाढ झालेल्या बोकडाचे वजन 50 किलो असते.

 या शेळी चे वैशिष्ट्य

  • या शेळीच्या वरच्या जबड्यावर पांढरा आणि तांबूस रंगाचे पट्टे असतात.
  • या शेळीचे पाय हे काळा आणि पांढरा रंगाचे असून ते लांब व मजबूत असल्याने या शेळ्या डोंगराळ भागात सहज जुळवून घेतात.
  • या शेळीचे कपाळ चपटे व रुंद असते तसेच कान काळा रंगाचे असून त्याच्या कडा पांढऱ्या किंवा तांबूस रंगाच्या दिसून येतात.

 

  • या शेळीचे शिंगे टोकदार,सरळ व मागे वळलेली असतात.
  • या शेळीची कातडी मुलायम व गुळगुळीत असते.
  • या शेळ्या नियमितपणे आणि वर्षभर माजावर येतात. या शेळ्यांमध्ये  जुळ्यांचे प्रमाण 66 टक्‍क्‍यांपर्यंत असते.
  • या शेळ्या चे पाठ काळे आणि पोटाखाली पांढरा किंवा तांबूस रंग आणि त्याच रंगाच्या कानावर आणि डोळ्यावर कडा असतात.

 

English Summary: goat species kokan kanya sheli
Published on: 06 September 2021, 01:18 IST