Animal Husbandry

Goat Rearing : भारतातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी मायबाप शासन विविध योजना राबवत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका प्लानबद्दल सांगणार आहोत. यातून शेतकऱ्यांना मोठा नफा मिळू शकतो. ग्रामीण अर्थव्यवस्थेत पशुसंवर्धनाला खूप महत्त्व आहे. शेतीसोबतच येथील अनेक शेतकरी गाय, म्हैस, शेळी या पशुधनातून अतिरिक्त नफा कमावतात.

Updated on 02 September, 2022 8:23 AM IST

Goat Rearing : भारतातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी मायबाप शासन विविध योजना राबवत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका प्लानबद्दल सांगणार आहोत. यातून शेतकऱ्यांना मोठा नफा मिळू शकतो. ग्रामीण अर्थव्यवस्थेत पशुसंवर्धनाला खूप महत्त्व आहे. शेतीसोबतच येथील अनेक शेतकरी गाय, म्हैस, शेळी या पशुधनातून अतिरिक्त नफा कमावतात.

लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांबद्दल बोलायचे झाले तर, कमी खर्चात ते शेळीपालनाला महत्त्व देतात, कारण शेळ्यांची फार काळजी घ्यावी लागत नाही आणि त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्थाही आरामात केली जाते.

दरम्यान, शेळीपालन करण्याची इच्छा असलेले अनेक शेतकरी आहेत, मात्र साधनांच्या अभावामुळे ते हे स्वप्न पूर्ण करण्यापासून वंचित आहेत. या शेतकऱ्यांना नाबार्ड शेळीपालनासाठी भरघोस अनुदान देते. इतकेच नाही तर काही भारतीय बँका देखील आहेत, ज्या शेळीपालनासाठी सुमारे 4 लाखांचे कर्ज देतात, जेणेकरून शेतकरी आणि पशुपालकांना संसाधनांच्या कमतरतेतही चांगले उत्पन्न मिळू शकेल.

या बँकांमध्ये अर्ज करा

जरी बहुतेक बँका जनावरांशी संबंधित व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्जाची सुविधा देतात, परंतु फक्त काही बँका शेळ्यांसारख्या लहान जनावरांसाठी कर्ज देतात. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, आयडीबीआय बँक, कॅनरा बँक इत्यादींचा समावेश आहे. या बँकांशिवाय नाबार्डकडून शेतकऱ्यांना कर्ज आणि अनुदानाची सुविधाही दिली जात आहे.

शेळीपालनासाठी कर्ज घेणाऱ्या शेतकरी आणि पशुपालकांना वार्षिक 11.20% दराने कर्ज भरावे लागते. आम्ही तुम्हाला सांगतो की, ही कर्ज सुविधा फक्त उच्च श्रेणीतील शेळ्या पालनासाठी दिली जात आहे, ज्यामध्ये 10 शेळ्याचे फार्म शेतकरी सुरू करू शकतात.

नाबार्ड अनुदान पण देणार 

नाबार्डने शेतकरी आणि पशुपालकांच्या हितासाठी अनेक महत्त्वाच्या योजना राबविल्या आहेत. त्याचप्रमाणे, शेळीपालन व्यवसायासाठी, ही संस्था आपल्या शेतकरी ग्राहकांना जास्तीत जास्त 2.5 लाख रुपयांपर्यंत अनुदान सुविधा प्रदान करते.

यामध्ये अनुसूचित जाती/जमातीसह दारिद्र्यरेषेखालील प्रवर्गातील शेतकरी व पशुपालकांना 33 टक्के पर्यंत अनुदान देण्याची तरतूद आहे.

त्याचबरोबर ओबीसी प्रवर्गातील शेतकरी आणि पशुपालकांना जास्तीत जास्त 25 टक्के अनुदान दिले जात आहे.

ही सुविधा नाबार्डशी संलग्न व्यापारी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, राज्य सहकारी कृषी आणि ग्रामीण विकास बँका, राज्य सहकारी बँका, नागरी बँका, इ. मध्ये उपलब्ध आहे.

या कागदपत्रांची आवश्यकता असेल बर 

आधार कार्ड

पॅन कार्ड

रहिवाशी दाखला 

जात प्रमाणपत्र

जमीन मालकीचे प्रमाणपत्र

उत्पन्न प्रमाणपत्र

बँक पासबुकची प्रत

मोबाईल नंबर आधारशी लिंक केला आहे

पासपोर्ट आकाराचा फोटो

येथे अर्ज करावा लागणार बर 

इच्छुक शेतकरी आणि पशुपालक त्यांच्या जवळच्या बँकेत जाऊन शेळी फार्म उघडण्यासाठी कर्जाची सुविधा घेऊ शकतात.

यासाठी बँकेच्या अधिकाऱ्यांकडून अर्ज घ्या आणि त्यात विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरा.

अर्जाच्या शेवटच्या टप्प्यात, फॉर्मसोबत विचारलेल्या कागदपत्रांची फोटो कॉपी देखील संलग्न करा.

शेळीपालनासाठी अर्जदार शेतकऱ्यांच्या माहितीची पडताळणी केल्यानंतर बँक अधिकारी कर्ज पास करतात आणि कर्जाची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग केली जाते.

English Summary: goat rearing this bank is giving loan for goat farming
Published on: 02 September 2022, 08:23 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)