Animal Husbandry

देशातील छोटे आणि सीमांत शेतकरी जास्तीचे उत्पादनासाठी पशुपालन करतात. कुकुट पालन व्यतिरिक्त शेळी आणि बकरी पालन अनेक शतकांपासून चालु आहे.

Updated on 13 February, 2022 6:41 PM IST

देशातील छोटे आणि सीमांत शेतकरी जास्तीचे उत्पादनासाठी पशुपालन करतात. कुकुट पालन व्यतिरिक्त शेळी आणि बकरी पालन अनेक शतकांपासून चालु आहे.

  • कुकुट पालन व्यतिरिक्त बकरी आणि शेळी पालन शेळीपालनाचे सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ती कमी जागेत आणि कमी खर्चात करता येते. या कारणास्तव, शेतकरी बकऱ्या सहजपणे पाळतात. आणि त्यांना इतर कोणतीही अडचण नसते. शेळी  यांची योग्य काळजी घेतल्यास शेळीपालनातून शेतकरी चांगला नफा मिळवू शकतात. यामुळेच गेल्या पाच वर्षात  बकऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.

 भारतातील शेळ्यांची स्थिती

2012च्यापशुगणनेनुसार पशुधनात 6.6 टक्के वाढ झाली आहे. 2012 मध्ये पशुधन लोकसंख्या 51.20 कोटी होती दोन हजार एकोणवीस च्या आकडेवारीनुसार 53 कोटी 57 लाख 80 हजारांवर पोहोचली आहे. देशातील पशुधनात एकूण शेळ्यांचा वाटा 27% आहे. म्हणजे शेळ्यांची संख्या दहा टक्क्यांनी वाढून 14.9 टक्के झाली आहे. या आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहे की, गाई आणि म्हशी पाळणारे शेतकरी शेळी आणि बकरी पालना कडे  वळत आहे.

  • गरिबांची गाय शेळी :-

 शेळीपालन वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे कमी खर्चात अधिक नफा हे सूत्र होय. शेळीचा अनेक कारणांसाठी उपयोग होतो. देशातील भूमिहीन, लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्न वाढवण्यास शेळीपालनाचा महत्त्वाचा हातभार लागतो. त्यामुळे शेळीला गरीब शेतकऱ्यांची गाय असं म्हटलं जातं.

 कमी सुपीक जमिनीत वाढणारी झुडपे आणि झाडे याची पाने शेळ्या खातात त्यामुळे सर्व प्रकारच्या प्रतिकूल वातावरणामध्ये टिकू शकतात. शेळीपालन व्यवसायात सुरुवातीला कमी करता आहे.इतर पाळीव प्राण्यांच्या तुलनेत शेळीचा प्रजनन काळ कमी आहे. कोलेस्टेरॉल कमी असल्यामुळे शेळी, बकरी आणि बोकड्या च्या मांसालाखूप मागणी असते. त्याचप्रमाणे गाईच्या दुधाच्या तुलनेत शेळीचे दूध सहज पचवता येते.

  • शेळीपालनासाठी शासनाचं अनुदान :-

 पशुपालकांनी उत्पादनाचे ध्येय ठेवून शेळीची जात निवडावी.जमुनापारी, शिरोही बार्बारी आणि जखराना जातीच्या शेळ्यांचे पालन सहजपणे केले जात. एका शेळीला अंदाजे एक चौरस मीटर क्षेत्र आवश्यक असते. 

या आधारावर आपण शेळ्यांसाठी घरीगोठातयार करू शकता.इतर पाळीव प्राण्यांच्या तुलनेत शेळीला कमी चारा लागतो. सामान्यत बकरीला दोन किलो चारा आणिअर्धा किलो धान्य देणे चांगले आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे शेळी पालन करण्यासाठी सरकारकडून ही मदत मिळते. यासाठी 25ते 33.3% अनुदान केंद्र आणि राज्य सरकारकडून ही दिलजात आहे. शेळी पालनाच्या यशस्वी व्यवसायासाठी ते निरोगी राहणे आवश्यक आहे. आजार झाल्यास त्वरित उपचार दिले पाहिजेत. बहुतेक रोग पाऊस पडल्यावरच होण्याची शक्यता असते, या काळात शेतकऱ्यांनी शेळी व बकऱ्याची विशेष काळजी घेतली पाहिजे.

English Summary: goat rearing is less investment bussiness benificial for farmer
Published on: 13 February 2022, 06:41 IST