शेळीपालन व्यवसायातून नफा हा करडांवर अवलंबून असतो. जे की करडांची संख्या आणि बाजारात चालले असणारे दरवाढ. जे की शेळीपालन करणारा व्यक्ती हा त्यामधील नफा हा करडे विकून काढत असतो मग त्यामध्ये बोकड असेल तर बाजारात बोकडला जास्त भाव आहे. एकदा की शेळी वेली की सुरुवातीच्या २४ तासात जो येणार घट्ट व पिवळसर दूध असते त्या दुधास चीक असे म्हणतात. जो चीक असतो त्या चिकामध्ये असे काही रोगप्रतिकारक घटक असतात ते शेळीच्या पिलांच्या वाढीसाठी उपयुक्त ठरतात. शेळीच्या चिकाचा वापर इतर कोणत्या घटकासाठी न वापरता शेळीच्या पिलांना पाजण्यासाठी होतो.
पिल्लांसाठी चिकाचे महत्त्व-
१. ज्यावेळी शेळी वेली जाते तेव्हा जी नवीन पिल्ले जन्माला येतात त्या पिल्लांमध्ये कर्बोदकांच्या स्वरूपात जी साठवलेली ऊर्जा असते ती कमी प्रमाणात असते. त्या दिवसांमध्ये पिल्ले आपल्या आहारासाठी पुर्णपणे शेतीवर अवलंबून असतात. जो चीक असतो त्याद्वारे पिल्लांना मुबलक प्रमाणात अ जीवनसत्त्वे भेटतात. या चिकामुळे पिलांच्या शरीरातील तापमान हे नियंत्रणात राहण्यास मदत होते.
२. चिकामध्ये जे प्रथिनांचे प्रमाण असते ते दुधापेक्षा ३ ते ४ पटीने जास्त असते. या चिकामध्ये इम्युनोग्लोब्युलिन नावाचा एक घटक जास्त प्रमाणत असतो. तसेच चिकामध्ये अ जीवनसत्त्वे च प्रमाण हे दुधामध्ये असणाऱ्या प्रमाणापेक्षा ५ ते १५ टक्केनी जास्त असते. रायबोफ्लेविन, कोलीन, थायमिन आणि पॅन्टोथेनिक अॅसिड या घटकाचे जास्त प्रमाण चिकामध्ये असतात. पिलांच्या निरोगी वाढीसाठी या घटकांचा वापर केला जातो. चिकातील या घटकांमुळे पिलांच्या पोटामध्ये असणारी चिकट घाण ती साफ होऊन जाते. पिलांची दृष्टी सुद्धा चीक सुधारवतो.
३. ज्यावेळी पिल्लांचा जन्म होईल त्यानंतर सुरुवातीच्या २४ तासांमध्ये प्रति ३ ते ४ तासाच्या अंतराने पिल्लांच्या वजनाच्या १० टक्के चीक त्यांना पाजायला हवा. याचा अर्थ असा की जर पिल्लाचे वजन अडीच किलो असेल तर त्याला दिवसभरात २५० मिली चीक पाजायला हवा. पिल्लांचा जन्म झाला की सुरुवातीचे काही तास पिल्लांची पचनसंस्था चीक अगदी उत्तम प्रकारे पचवू शकतात. मात्र २४ तासानंतर हळूहळू पिलांची पचन क्षमता कमी होत जाते. त्यामुळे पिल्लांचा चीक लवकर पाजणे गरजेचे आहे.
४. पिलांचा जन्म झाला की त्यावेळी त्यांचे वजन तसेच हवामान यावर चीक त्यांना किती पाजावा हे ठरवला जातो. जर खराब हवामानात जर पिल्लांचा जन्म झाला तर त्यांना ऊर्जेची गरज असते. जे पिल्लांचा जन्म पावसाळ्यात झाला तर त्यांना प्रति किलो मागे २०० मिली चिकाची गरज असते तर कोरडया हवामानात पिल्लांचा जन्म झाला तर त्यांना प्रति किलो मागे १५० मिली ची गरज असते.
Published on: 22 April 2022, 01:13 IST