Animal Husbandry

भारतात शेतीव्यतिरिक्त पशुपालन करण्यास अनेक लोक इच्छुक असतात, कारण पशुपालन हे उदरनिर्वाह भागवण्यासाठी एक महत्वपूर्ण पर्याय आहे. आता पर्यंत आपण पशुपालन मध्ये गाय, म्हैस, डुक्कर, बकरी, कोंबडी, मासे इत्यादी विषयी ऐकलं असेल किंवा बघितलं असेल. पण आज आपण पशुपालनाचा आणखी एक चांगला पर्याय सांगणार आहोत, ज्याला दुम्बा पालन म्हणतात.

Updated on 20 September, 2021 3:55 PM IST

भारतात शेतीव्यतिरिक्त पशुपालन करण्यास अनेक लोक इच्छुक असतात, कारण पशुपालन हे उदरनिर्वाह भागवण्यासाठी एक महत्वपूर्ण पर्याय आहे. आता पर्यंत आपण पशुपालन मध्ये गाय, म्हैस, डुक्कर, बकरी, कोंबडी, मासे इत्यादी विषयी ऐकलं असेल किंवा बघितलं असेल. पण आज आपण पशुपालनाचा आणखी एक चांगला पर्याय सांगणार आहोत, ज्याला दुम्बा पालन म्हणतात.

. होय, दुम्बा पालन हा रोजगाराचा एक उत्तम पर्याय आहे.  विशेष गोष्ट म्हणजे यात खूप चांगली कमाई करता येते, कारण बाजारात दुम्बाला मागणी असते आणि ती पटकन तयारही होते. या गुणांमुळे, दुम्बापालन हा पैसा कमावण्याचा एक उत्तम पर्याय आहे. दुम्बापालणाबद्दल अधिक माहिती जाणुन घेऊया.

 नेमकं काय आहे दुम्बा पालन

माहितीसाठी,आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की दुम्बा ही शेळीची एक जात आहे, ज्याची शेपटी गोल आणि दगडासारखी जड असते.  ईद-उल-अजाच्या दिवशी त्याची मागणी खूप जास्त असते.

ह्या जातीच्या बकरीची किंमत देखील चांगली राहते, म्हणून शेळीपालन करणाऱ्या लोकांना ही जातं खूप आवडते.  विशेषत: या जातीचा बोकड खुप महाग विकला जातो, तर त्याची करडेही विकली जातात.

 दुम्बा जातीच्या शेळीची विशेषता

माहितीसाठी,आम्ही तुम्हाला सांगू की उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील शेतकरी अनेक वर्षांपासून दुम्बा संगोपन करत आहेत.  यातून तो दरवर्षी लाखो रुपयांची कमाई करतो.  एक वर्षाच्या बोकड्याचे वजन सुमारे 100 किलो होते असे हा शेतकरी सांगतो, तो दुम्बाची करेडही विकतो. दुम्बा ही नवव्या महिन्यात पिल्लाना जन्म देते. सुरुवातीच्या 2 महिन्यांत करडे हे साधारण 25 किलोचे होते, म्हणून त्यांना चांगली किंमत मिळते.

 

दुंबाच्या करडांची किंमत किती असते

दुम्बाच्या करडांची किंमत फक्त 2 महिन्यांत 30 हजार रुपयांपर्यंत जाते, तसेच 3 ते 4 महिने होताच त्यांची किंमत 70 ते 75 हजार रुपयांपर्यंत जाते.

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की दुम्बाची चांगली किंमत नर किंवा मादीच्या आधारावर मिळत नाही, तर किंमत ही त्याच्या वैशिष्ट्यावर आधारित असते. असे असले तरी, मादी दुम्बाला चांगली किंमत मिळते, जी पिलांना देऊ शकते.

 

 दुंबासाठी आहार नेमका कसा असतो

शेतकरी आणि पशुपालक दुब्याला भुसी खाऊ घालू शकतात, तसेच ते हरभरा धान्य खाऊ घालू शकतात. यासोबतच हिवाळ्याच्या हंगामात हरभरा धान्य, बार्ली आणि बाजरी खायाला घालणे उत्तम असते.

अशा प्रकारे, तुम्ही शेळीच्या दुम्बा जातीचे पालन करून चांगला नफा कमवू शकता.  चांगल्या उत्पन्नासाठी हा एक चांगला पर्याय आहे.

 

English Summary: goat farming species of goat is dunba is benificial
Published on: 20 September 2021, 03:55 IST