जगात पूर्वीपासून पशुपालन केले जात आहे आणि ह्यातून शेतकरी चांगली कमाई करत आले आहेत. शेतीसाठी एक जोडधंदा म्हणुन पशुपालन खरे उतरत आले आहे आणि शेतकऱ्यांना ह्यातून अतिरिक्त उत्पन्न प्राप्त होत आले आहे. मित्रानो असे असले तरी पशुपालनात यशस्वी होण्यासाठी आणि चांगली कमाई करण्यासाठी पशुपालन हे शास्त्रीय पद्धतीने करणे महत्वाचे ठरते. पशुपालनात सर्वात महत्वाचे ठरते ते गाईचे पालन
गाई पालन करून पशुपालक चांगले उत्पन्न अर्जित करू शकतात. गाई पालनात सर्वात महत्वाची बाब म्हणजे गाईची जात. जर चांगल्या गाईचे पालन केले तर त्यापासून मिळणारे दुध उत्पादन चांगले मिळते आणि परिणामी गाईचे पालन फायदेशीर ठरते. भारतात काही देशी जाती आहेत ज्या गाई पालनात महत्वपूर्ण भूमिका पार पाडत आहेत ह्या देशी जाती चांगल्या दुध उत्पादन क्षमतेसाठी ओळखल्या जातात. ह्या देशी गाई जवळपास 80 लिटर पर्यंत दुध देण्यास सक्षम आहेत. मित्रांनो आज आपण अशाच काही देशी/गावठी गाईंची माहिती जाणुन घेणार आहोत तसेच त्यांच्या पालणाच्या फायद्याविषयीं जाणुन घेणार आहोत. चला तर मग कृषी जागरणच्या वाचक मित्रांनो जाणुन घेऊया देशी गाईच्या जाती आणि त्यांच्या विशेषता.
गीर गाय
आपल्या गुजरातमधील गीर गाय ही भारतातील सर्वात जास्त दुध देणाऱ्या गाईंच्या यादीत शीर्षस्थानी आहे. ही गाय दुधासाठी सर्वोत्कृष्ट असल्याचे मानले जाते. गीर गाईची कास खूप मोठी असते. गीर गाय एका दिवसात जवळपास 50 ते 80 लिटर पर्यंत दूध देते. ही गाय गुजरातच्या गीर जंगलात आढळते, म्हणून तिचे नाव गीर गाय असे पडले असावे.
साहिवाल गाय
भारतातील हरियाणा, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या जिल्ह्यांमध्ये साहिवाल गाय ही मोठया प्रमाणात पाळली जाते तसेच ह्या जातींचे पालन करून पशुपालक शेतकरी चांगली कमाई देखील करत आहेत. साहिवाल गायीचे वैशिष्ट्य म्हणजे ती एका वर्षात 2000 ते 3000 लिटर पर्यंत दूध देते. या जातीची गाय वासरू दिल्यानंतर सुमारे 10 महिने दूध देते. त्यामुळे ही देखील एक चांगली दुभती गाय म्हणुन ओळखली जाते.
लाल सिंधी गाय
लाल सिंधी गाय ही सिंध परिसरात आढळते, त्यामुळे तिला लाल सिंधी गाय असे नाव देण्यात आले असावे असे सांगितले जाते. ही जात उच्च दुध उत्पादनासाठी ओळखली जाते. या जातीच्या गायी एका वर्षात 2000 ते 3000 लिटर पर्यंत दूध देतात. ह्या जाती भारतातील पंजाब, हरियाणा, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ आणि ओडिशा राज्यात पाळल्या जातात. ह्यांचे पालन
Published on: 23 October 2021, 12:52 IST