गीर गायचे पालन हा व्यवसाय आता अधिक नफा देणारा व्यवसाय बनला आहे. गीर गायीचे दूध प्रति लिटर ७० रुपये ते २०० रुपयांपर्यंत आहे आणि या दुधापासून बनवलेले तूप कमीत-कमी २ हजार रुपये प्रतिकिलो पर्यंत विकले जाते. गुजरातमधील सौराष्ट्र येथील गीर जंगलाच्या नावावरून गीर गायीचे नाव पडले आहे. या जातीच्या गाईंची किंमत ९० हजार रुपयांपासून साडेतीन लाख रुपयांपर्यंत आहे. या गाईच्या दुधाचा भाव हा आपण गायला कुठला चारा खायला घालतो आणि त्याची पौष्टिकता कितपत आहे त्याच्यावर अवलंबून असतो. गुजरात मधील गहू कृषी जतन संस्थानच्या गोशाळेमध्ये गाईंना जीवन्ती पावडर आणि पळसच्या फुलांची पावडर खायला दिली जाते. त्याच्यामुळे होते असे की, दुधाची गुणवत्ता वाढते. या कोरोना महामारीच्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणावर आर्थिक संकट चालू आहे, अशा परिस्थितीत गीरगाय ४५ ते ६० हजार रुपयांपर्यंत विकली जात आहे.
गुजरात राज्यामधील गीर गाय राजस्थान, मध्य प्रदेश, हरियाणा, उत्तर प्रदेशपासून तर विदेशातील ब्राझीलपर्यंत प्रसिद्ध आहे. या गायीची ओळख ही तिची शरीराची ठेवण आणि शरीराचा रंग यावरून होऊन जाते. स्वर्ण कपिला आणि देव मनी या जातींच्या गाई सगळ्यात श्रेष्ठ गाय मानल्या जातात. स्वर्ण कपिला गाय २० लिटर दूध दररोज देते तसेच तिच्या दुधामध्ये फॅट्सचा अंश ७ टक्क्यांपर्यंत असतो. देव मनी गाय ही एक करोड गाईंमध्ये एक असते. या जातीच्या गाईंना तिच्या गळ्याला असलेल्या एका पिशवीचा आधारे या गाईंची ओळख होते.राजकोटमधील जसदनच्या आर्यमान गीर गोशाळेमध्ये ४०० गाई आहेत.या गोशाळेचे संचालक दिनेश सायानी सांगतात की, गीर गाय दरवर्षी एक वासरू अनिल १० महिने दूध देते. वर्षातून फक्त दोन महिने तिला आराम द्यावा लागतो.
गीर गाय कशी ओळखावी
या गायीचा रंग लाल असतो. तिचे कान मागच्या बाजूला झुकलेल्या असतात. या गाईचे शिंगे मागच्या बाजूने वळलेले असतात. या गाईचा डोक्याचा भाग थोडा मोठा असतो. गळ्याला पिशवी सारखं लटकलेले दिसतात. या गाईचा खांदा मोठा असतो. तिची कातडी पातळ तसेच पायांचे खूर छोटे असतात. वडोदराच्या बंशीधर गोशाळेचे अजय राणा सांगतात की, गीर गाय १० ते २० लिटर दूध देते. फक्त क्रॉस ब्रीडिंग गाय ३० लिटरपर्यंत दूध देऊ शकते. या दोन्ही गोशाळापैकी कामधेनु गोशाळा दूध विक्री करत नाहीत. ते फक्त दुधापासुन तुप तयार करतात आणि या तुपाची विक्री ऑनलाइन पद्धतीने १९५० रुपये प्रति किलो या भावाने करतात.
दुधापासून वाढते गर्भधारणा क्षमता
श्री गीर गाऊ कृषी जतान संस्थान राजकोटच्या गोंडल परिसरात आहे. या गोशाळेच्या गाईंचे दूध २०० रुपये प्रतिलिटर आणि तुपाचा भाव २ हजार रुपये किलो आहे. या गोशाळेचे संचालक रमेश रूपा रेलिया सांगतात की, ते गोशाळेमध्ये गाईंना हवामानानुसार चारा, पशु आहार आणि भाजीपाला खाऊ घालतात. चरक संहितेनुसार ते गाईंना जीवन्ती पावडर सुद्धा खायला देतात. याचा फायदा असा होतो की, यामुळे गाईंचे दूध, डोळ्यांमध्ये तेजी वाढण्याबरोबरच गर्भधारणा करण्याची क्षमताही वाढते. आयुर्वेदानुसार गाईंना पलाशच्या फुलाचे पावडर खायला दिली तर गाईचं दूध हे मनाला शांती देणारे असते. शरीराला थंडावा प्राप्त होतं.
रोगमुक्तीसाठी लाभकारी पंचगव्य घी
गौ कृषी जतन संस्थान पारंपरिक पद्धतीने वैदिक ए 2 तुपाची निर्मिती करतात. हे तुप २ हजार रुपये प्रति किलो या भावाने विकले जाते. संचालक रुपेश रुपरेलिया सांगतात की, वैदिक तूप हे दही पासून बनवले जाते. मातीच्या भांड्यामधे दही जमा करून घडामध्ये त्याला चांगलं विरघळून त्यापासून तूप काढले जाते.
त्यानंतर त्याला एखाद्या काचेच्या भांड्यात मध्ये जमा केली जाते. कारण दुधाची गुणवत्ता टिकून राहते चंदन आणि सागाच्या लाकडाने घुसळ लेले तूप आरोग्यासाठी फायदेशीर असते. नीमच या झाडाच्या घुसळ लेले तूप डायबिटीज उपयोगी असते. पिंपळाच्या लाकडाचा उपयोग केला तर त्या तुपापासून शरिरामध्ये ऑक्सिजनची पातळी वाढते.
Published on: 14 October 2020, 04:46 IST