Animal Husbandry

जनावरांमध्ये विविध प्रकारचे परजीव आढळतात. त्या सगळ्या परजीवी पैकी गोचीड ही बाह्य परजीवी मुख्य आहे.भारतामधील बऱ्याच ठिकाणी या परजीवी चा प्रादुर्भाव आढळतो. पशु वैद्यकीय शास्त्रामध्ये या परजीवी ला विशेष महत्त्व आहे. त्याचे अनेक कारणे आहेत. जनावरांमध्ये जे महत्त्वाचे जीवघेणे आजार होत असतात ते पसरवण्याचे काम गोचीड करत असते. प्रामुख्याने जनावरांची उत्पादनक्षमता आहे गोचीड याच्या प्रादुर्भावामुळे कमी होत असते.

Updated on 20 July, 2021 3:06 PM IST

जनावरांमध्ये विविध प्रकारचे परजीव आढळतात. त्या सगळ्या परजीवी पैकी गोचीड ही बाह्य परजीवी मुख्य आहे.भारतामधील बऱ्याच ठिकाणी या परजीवी चा प्रादुर्भाव आढळतो. पशु वैद्यकीय शास्त्रामध्ये या परजीवी ला विशेष महत्त्व आहे. त्याचे अनेक कारणे आहेत. जनावरांमध्ये जे महत्त्वाचे जीवघेणे आजार होत असतात ते पसरवण्याचे काम गोचीड करत असते. प्रामुख्याने जनावरांची उत्पादनक्षमता आहे गोचीड याच्या प्रादुर्भावामुळे कमी होत असते.

 गोचीड मुळे जनावरांवर काय परिणाम होतो?

गोचीड या जनावरांचे रक्त शोषण करतात. एक गोचीड साधारणतः एक ते दोन मीली रक्त पिते. गोचिडांच्या चाव्यामुळे टीक पॅरॅलिसिस हा आजार जनावरांना होऊ शकतो. तसेच गोचीड मुळे होणारी रक्तपेशी रोग  हे सर्वात महत्वाचे असतात. त्यामध्ये थायलेरि ओसीस इत्यादी प्रकारचे आजार होऊ शकतात.या आजाराचे जंतू गोचीड मध्ये असतात. गोचिडांच्या अनेक पिढ्यांमध्ये हे जंतू आढळून येतात आणि ते निरोगी जनावरा  मध्ये फैलाव  करतात. म्हणून हा आजार होऊ नये यासाठी गोचिडांचा नायनाट करणे फायद्याचे असते. गोचीड मुळे होणाऱ्या विविध प्रकारच्या आजारांमुळे जनावरे दगावतात तसेचदूध,मांस उत्पादनात घट येते. त्यामुळे पशुपालकांना प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान होऊ शकते.

 गोचीड नियंत्रण कसे करावे?

 तसे पाहिले तर गोचिडांचा पूर्णतः नायनाट करणे अशक्य असते. तरीपण काही प्रमाणात त्यांचे नियंत्रण करून जनावरांची उत्पादनक्षमता आपण अबाधित ठेवू शकतो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जनावरांच्या अंगावरील गोचीड यांचे निर्मूलन करणे. जनावरांचा गोठा स्वच्छ ठेवणे तसेच गोठ्यातील गोचीड यांचे निर्मूलन व्यवस्थित करणे. जनावरे साधारणतः ज्या ठिकाणी चरतात त्या ठिकाणी होणारा गोचिडांचा प्रादुर्भाव कमी करणे. हेही तितकेच गोचीड नियंत्रणासाठी महत्त्वाचे असते. जनावरांच्या अंगावरील गोचीड काढून जाळून टाकावे तसेच जनावरांची, गोठ्याची व परिसराची संपूर्ण स्वच्छता ठेवावी. जनावरांच्या अंगावरील गोचीड यांचे नियंत्रण करण्यासाठी विविध औषधे बाजारात उपलब्ध आहेत. त्याचा वापर योग्य प्रकारे करावा. बहुतेक करून या चा वापर कसा करायचा याचा सल्ला पशुवैद्यक यांच्या कडून घ्यावा.डेल्टामेथ्रीन, एकटोडेक्स तसेच काही प्रकारच्या आयुर्वेदिक मिश्रण जसे पेस्टोबेन इत्यादी औषधे वापरू शकतात.

( वरील औषधे पशुवैद्यकाच्या सल्ल्यानेच वापरावीत)

जनावरांची स्वच्छता

 कमीतकमी आठवड्यातून दोनदा स्वच्छ पाण्याने जनावरांना धुने आणि गोठ्याचे संपूर्ण निर्जंतुकीकरण किंवा स्वच्छता ठेवली तर गोचीड नियंत्रण यापासून आपण जनावरांचा बचाव करू शकतो. जनावरांच्या अंगावर एक जरी गोचीड  दिसली तरी तिच्यावर दुर्लक्ष करू नये. तात्काळ तिला काढून जाळून टाकावे. त्यासाठी जनावरांचे निरीक्षण सूक्ष्म रीतीने करावे. जेणेकरून जनावरांना गोचीड चा प्रादुर्भाव होणार नाही.

 गोचीड नियंत्रणासाठी काही औषधी वनस्पती

  • वेखंड:

वेखंड अथवा वखा या नावाने ओळखली जाणारी वनस्पती आहे.चेतना संस्थेच्या आजारात ही वनस्पती वापरली जाते. या वनस्पतीची पावडर उवा, गोचीड यासारख्या बाह्य कृमींच्या नियंत्रणासाठी वापरावी. ही पावडर जनावरांच्या शरीरावर लावत असताना केसांच्या उलट्या दिशेने लावावे. म्हणजे ती केसांच्या मुळांपर्यंत पोहोचते.

  • कडूनिंब:

कडूनिंब तेल हे बाह्य परजीवींचा नियंत्रणासाठी अत्यंत गुणकारी आहे. हे तेल जनावरांच्या शरीरावर लावावे. यास असणारा उग्र वास आणि चव यामुळे बाह्य परोपजीवी यांचा भूक नष्ट होते व कालांतराने ते मरतात.

  • करंज:

कडूनिंब तेल याप्रमाणेच करंज तेलामध्ये कीटकनाशक गुणधर्म आहेत. या तेलाचा वापर जनावरांच्या शरीरावर लावण्याकरता करावा. त्यामुळे बाह्य परोपजीवी मरतात.

 

  • सिताफळ:

सीताफळाची पाने व बी हे चांगले कीटकनाशक आहे. सीताफळाची पाने सावलीत वाळवून त्याची पावडर करावी किंवा बियांची बारीक पावडर करावी. पावडर जनावरांच्या शरीरावर केसांच्या उलट्या दिशेने लावावे.

  • बावनचा:

बावनचा किंवा बाऊची या वनस्पतीचे तेलकीटकनाशक म्हणून जनावरांच्या शरीरावर लावावे यामुळे कीटक मरतात.

  • कन्हेर:

 फुलांसाठी प्रसिद्ध असलेली ही वनस्पती हिची पाने अथवा मूळ परोपजीवी यांच्या विरोधात अत्यंत गुणकारी आहे. याचा वापर जनावरांच्या शरीरावरबाहेरून लावण्याकरता करावा.

  • निलगिरी तेल:

निलगिरी तेलाचा वापर अत्यंत उपयुक्त आहे. या तेलामुळे बाह्य परोपजीवी जनावरांच्या शरीरापासून दूर जातात. तसेच काही बाह्य परोपजीवी मरतात.

English Summary: gadfly control from cow,buffao,ox etc.animal
Published on: 20 July 2021, 03:06 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)