शेतीसोबत जोडधंदा उभा करणे म्हणजे शेतकऱ्यांना जास्तीचा आर्थिक उत्पन्नाचा एक चांगला स्त्रोत निर्माण होत असतो. शेतकऱ्याचा मत्स्यपालन व्यवसाय करू लागले आहेत. शेततळ्यातील मत्स्यपालन हा व्यवसाय आता चांगल्यापैकी जोर धरत आहे. आपल्याला माहित आहेच की, मत्स्यपालनाचे बर्याच प्रकारच्या पद्धती असून माशाच्या देखिल वेगवेगळ्या प्रकारच्या जातींचे पालन केले जाते.
मत्स्यपालन व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार स्तरावरून देखील विविध प्रकारच्या योजना आहेत. या सगळ्या गोष्टींचा फायदा घेत शेतकऱ्यांनी ग्रामीण भागामध्ये जर कोळंबी माशांचे उत्पादन घेतले व हा व्यवसाय सुरू केला तर मोठ्या प्रमाणावर आर्थिक नफा मिळणे शक्य आहे.
कोळंबी माशांचे पालन
जर आपण कोळंबी माशाचा विचार केला तर या माशाच्या लागवड किंवा पालनासाठी समुद्राचे खारे पाण्याची आवश्यकता होती परंतु काही वर्षांपासून कृषी क्षेत्रामध्ये जो काही तांत्रिक विकास आणि संशोधने झाली, त्यामुळे आता गोड्या पाण्यात देखील कोळंबी पाळणे शक्य झाले आहे.
कोळंबी माशासाठी लागणारे आवश्यक गोष्टी
तुम्हाला जर कोळंबी शेती करायची असेल तर सर्वप्रथम तुम्हाला योग्य तलाव व त्या तलावासाठी लागणारी जागा निवड फार महत्वाचे आहे.
आता तलावाची निर्मिती करताना माती ही चिकन माती असणे गरजेचे असून तलावातील पाणी हे स्वच्छ व प्रदूषण मुक्त असावे. जर मातीच्या बाबतीत विचार केला तर ती क्लोराईड, सल्फेट आणि कार्बोनेट सारख्या हानीकारक घटकांपासून मुक्त असावी.
तलावांमध्ये जे काही पाणी आहे त्याचा पीएच हादेखील महत्त्वाचा असून त्या पाण्याचा पीएच मूल्य राखण्यासाठी त्यामध्ये चुन्याचा वापर करत राहणे गरजेचे आहे. तसेच तलावामध्ये पाणी भरणे आणि त्याचा निचरा करणे याच्यासाठी योग्य व्यवस्था असणे गरजेचे आहे..
नक्की वाचा:Bussiness Idea: शेतीवर आधारित 'हा' उद्योग उभारा आणि कमवा प्रचंड नफा,व्हा उद्योजक..!
यासाठी रोपवाटिकेमध्ये 20 हजार मत्स्य बियाण्याची गरज असते. एप्रिल व जुलै महिना त्याच्या काढण्यासाठी योग्य असून त्यासाठी सर्वप्रथम तलावातील रोपवाटिका कोळंबी पाळण्यासाठी तयार केली जाते.
परंतु त्याआधी कोळंबी च्या बिया काढण्याची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. यासाठी कोळंबीच्या बियांची सर्व पाकिटे तलावातील पाण्याने भरून पंधरा मिनिटे तसेच ठेवावे, जेणेकरून तलावाचे पाणी व पाकिटाचे पाणी यांचे तापमान एक होईल.
त्यानंतर स्टोरेजसाठी कोळंबी लहान खड्ड्यात सोडली जातात. त्यानंतर जेव्हा हे कोळंबी तीन ते चार ग्रॅम वजनाच्या होतात, त्यावेळी त्यांना अतिशय काळजीपूर्वक हातात घेऊन मुख्य तलावात टाकावे.
हे करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवावी की, तलावांमध्ये ज्या काही कोळंबी आणाल त्यापैकी फक्त 50 ते 70 टक्के कोळंबी जगतात. साधारणतः पाच ते सहा महिन्याचा कालावधी झाल्यानंतर ते व्यवस्थित विकसित होतात.
त्यानंतर त्यांना तलावातून काढण्यास सुरुवात करावी.. एका एकर च्या पाण्यामध्ये दोन ते तीन लाखांपर्यंतचा नफा सहज मिळू शकतो, असे कृषी तज्ञांचे मत आहे.
Published on: 08 August 2022, 12:18 IST